#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५
शीर्षक:- तिची काय चूक?
विषय:-अकस्मात
भाग:-३ (अंतिम)
"बेटा, तू आजपासून आमची मुलगी आहेस. तू आमच्या सोबत राहा." मनोहर यांची पत्नी शीतल क्षिप्राला कुशीत घेत म्हणाली.
तिला खूप भरून आलं. ती त्यांना बिलगून खूप रडली.
ज्या परिस्थितीत तिला तिच्या घराच्यांनी साथ द्यायला हवी होती त्यांनी तिची साथ सोडली; पण ज्यांचा आपल्याशी काहीही संबंध नाही फक्त त्यांना मदत केली म्हणून त्यांनी आपल्याला साथ दिली. असा विचार तिच्या मनात खोलवर उमटला.
दोन दिवस ती एकदम शांत होती, ना खाणं ना पिणं, कोणाशी बोलणं नाही, शून्यात नजर लावून बसायची.
मनोहर यांना ते पाहावले नाही.
ते तिच्या जवळ जात म्हणाले,"क्षिप्रा, अजून किती दिवस अशीच बसणार तू? तुझ्याबरोबर जे झालं ते खूप वाईट आणि अन्यायकारक होतं. पण त्या नराधमाला असंच सोडणार आहेस का? आज तुझ्या बाबतीत झालं, उद्या हे दुसऱ्या कोणासोबतही तो असेल करेल. त्याला असेच मोकाट सोडायचे का? जी क्षिप्रा मी पाहिली होती, तिला पुन्हा जागे कर. आपण पोलिसांकडे जाऊ तक्रार करू. चल उठ, तुला लढायचे आहे. आम्ही सर्व आहोत तुझ्यासोबत. मी चांगला वकील हायर केला आहे."
मनोहर यांनी तिच्यातल्या धाडसी, निडर क्षिप्राला पुन्हा आवाज दिला. त्यांच्या बोलण्याने तिच्या अंगात गेलेले बळ पुन्हा आले.
ती चमकून त्यांच्याकडे पाहत म्हणाली,"काका, तुम्ही बरोबर बोललात. जो विचार मी करायला हवा होता तो तुम्ही केलात. त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. थॅंक्यू, काका. माझ्यातल्या त्या धाडसी क्षिप्राला जागे करून देण्यासाठी.
माझ्यासाठी खूप काही करत आहात."
माझ्यासाठी खूप काही करत आहात."
"तसं काही नाही, बेटा! तू जे माझ्यासाठी केलेस, त्यापुढे हे काहीच नाही. खरं तर माझ्यामुळे तुला हे सर्व सहन करावे लागले. त्यासाठी मला.." ते हात जोडत उदास चेहऱ्याने म्हणत होते तोच तिने त्यांचे जोडलेले हात हातात घेत म्हणाली,"अहो काका, असे हात जोडून मला लाजवू नका. तुमच्यामुळे काही झालं नाही. नियतीत जे लिहिले होते ते झाले. चला जाऊ पोलीस स्टेशनला."
त्यांनी होकारार्थी मान डोलावली. त्या नंतर त्यांनी पोलिसांना सर्व काही सांगितले. त्यांनी तिची तक्रार नोंद केली.
क्षिप्रा हळूहळू त्या घटनेतून सावरू लागली.
पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्यावर खटला दाखल केला. वकिलांनी त्याच्याविरूद्ध कोर्टात सर्व पुरावे सादर केले. ज्यामुळे त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि कोर्टाने त्याला कठोर शिक्षा सुनावली. ज्याचा क्षिप्राला खूप आनंद झाला. तिला न्याय मिळाल्याचे समाधान मनोहर आणि त्यांच्या कुटुंबाला मनापासून झाले.
त्यांनी आणि त्याच्या कुटुंबाने क्षिप्राला मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे भक्कम आधार दिला. तिच्या खचलेल्या मनावर त्यांनी मायेची, आपुकलीची फुंकर घातली. त्यामुळे तिच्या जखमा भरून आल्या आणि अकस्मात झालेल्या या घटनेतून ती लवकर सावरली.
ती पुन्हा आत्मविश्वासाने उभी राहिली. नंतर ती नोकरी करत तिच्या सारख्या पिडितांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला, ज्यात तिला पुन्हा मनोहर व त्याच्या कुटुंबाने खंबीर साथ दिली.
समाप्त -
एक अकस्मात घटना एखाद्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. पण मायेची आणि आपुकलीच्या माणसांची साथ मिळाली की त्या घटनेतून त्याला त्या बाहेर पडण्यासाठी बळ मिळते आणि तो पुन्हा नव्याने आयुष्य जगतो.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील पात्र, स्थान व घटना पूर्णतः काल्पनिक आहेत. वास्तवाशी, जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा