Login

तिची मिठी म्हणजे स्वर्गसुख

Kavita

तिची मिठी म्हणजे थांबलेला काळ,
शांततेत दडलेला शब्दांचा जाळ,
हृदयाला सावरतं, वेदनांना हरवतं,
तिच्या मिठीत जगणं पुन्हा उमलतं.

त्या मिठीत होतं एक आभाळाचं शीत,
जणू दुःखांचं लुप्त होणं आणि आनंदाचं गीत,
स्पर्श जणू वाऱ्याचा हलका झोत,
मनाच्या कोपर्‍यात साठलेल्या वेदनांना थोपवत.

तिची मिठी म्हणजे जगण्याचं उत्तर,
प्रत्येक अश्रूसाठी एक कोमल आधार,
त्या मिठीत हरवलं सारं काही,
स्वप्नं अन् वास्तव जणू एकत्र मिळून जाई.

तिची मिठी म्हणजे स्वर्गाचा निवास,
मनाच्या गाभार्‍यात गूंजलेला विश्वास,
त्या मिठीत जगणं शांत होतं,
आणि आयुष्य पुन्हा नव्यानं सजतं.


🎭 Series Post

View all