त्याचं सिलेक्शन तर झालंच होतं. पण ट्रेनिंग आणि त्यानंतर जॉइनिंग याला थोडा वेळ लागणार होता आणि त्यानंतर तर खरी ड्युटी सुरू होणार होती. म्हणून सिलेक्शन च्या नंतर लगेचच लग्न करून घेतले होते.
तसंही तिची इच्छा पूर्ण झाली होती. अजून तिला काही नको होतं. आत्ता फक्त त्याला वर्दी मध्ये पहायचं होतं. थोड्याच दिवसात ट्रेनिंग पूर्ण करून तो जॉईन झाला.
सुट्टीत तो घरी येत असे. तेव्हा मिळणारा वेळ ते एकमेकांसोबत एन्जॉय करतात घालवत असत. ती तिच्या घरच्यांसोबत त्याच्या घरच्यांची सुद्धा तितकीच आपुलकीने काळजी घेत असे.
बघता बघता त्यांच्या लग्नाला चार वर्ष झाली होती. आणि त्याला जॉईन होऊन आत्ता तीन वर्ष होत आलेली.
सध्या बॉर्डर वर हाई अलर्ट बसवण्यात आलं होतं. शत्रूच्या हालचाली वेगाने वाढत होत्या. म्हणून सर्वच्या सर्व टास्क फोर्स कामाला लावली होती.
अश्यातच त्याच सुट्टी घेऊन घरी येणं बंद झालं होतं. दोघंही एकमेकांना खूप मिस करत होते. त्याच्याकडे तिने केसात मळलेली चाफ्याची फुलं होती. त्याने एका पुस्तकात जपून ठेवली होती. जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा त्या फुलांवरून हात फिरवायचा तो. पण इकडे ती फक्त त्याने लिहिलेली पत्र वाचत बसायची.
आठवड्यातून एकदा फोन वर बोलणं व्हायचं त्यात पण घरातील सर्व आजूबाजूला असल्याने त्यांना मोकळेपणाने बोलता येतंच नव्हतं.
पण हल्ली तिचा आवाज त्याला वेगळा वाटू लागला होता. ती फक्त एकच गोष्ट त्याला सांगत असायची काहीही झालं तरी तुमचं पाहिलं कर्तव्य हे देशाची रक्षा करणं हेच असलं पाहिजे.
खरंतर तिने त्याच आयुष्य ३६० डिग्री मध्ये बदलून टाकला होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो फॅमिली बिझनेस जॉईन करणार होता. पण आज एक रिस्पेक्टेड आर्मी ऑफिसर होता.
पाठी वळून पाहताना कधी कधी त्याच त्यालाच आश्चर्य वाटायचं. की एवढा बदल आपल्यात कसा झाला आणि मग एकच चेहरा डोळ्यांसमोर उभा राहायचा. तिचा जर तिने तेव्हा तिची इच्छा सांगितली नसती तर कदाचित आज तो सुद्धा एक सामान्य माणूस म्हणूनच समाजात वावरत असता.
आज जेव्हा तो तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रेम, आदर पाहतो ना तेव्हा त्याने घेतलेल्या निर्णयच चीज झालं असं त्याला वाटतं.
.........
.........
वर्तमानकाळ....
तो हातात चाफ्याची फुलं घेऊन त्यांच्या बेडरूम मध्ये येतो. पूर्ण रूम मध्ये अंधार असतो. त्याचे हात थरथरत असतात. तश्याच थरथरनाऱ्या हाताने तो लाईट च बटन ऑन करतो. आणि त्याच्या नजरेस पडतो तिचा तोच हसरा चेहरा. तो त्याच्या हातातील फुलं त्या फोटोफ्रेम च्या जवळ ठेवतो. आणि त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवतो.
"रागावली आहेस ना माझ्यावर. माहित होतं मला म्हणून तर तुझ्यासाठी ही चाफ्याची फुलं आणली आहेत. तुला आवडतात ना म्हणून.
आत्तातरी जाईल ना तुझा राग? कधी येशील पुन्हा मला भेटायला आज बरोबर एक वर्ष झालं तू माझ्यावर रागावून निघून गेलीस.
तुला नाही का येत माझी आठवण. मी तर रोज रात्री तुझ्याच आठवणीत घालवतोय. एक ना एक दिवस नक्कीच भेटशील ना पुन्हा? की पुन्हा नकार देऊन जाशील ग मला एकट्याला सोडून जसं आत्ता गेलीस...." पुढे त्याच्याने काहीही बोललं जात नाही. तो तसाच तिच्या फोटोला हातात घरून छातीशी कवटाळून रडत बसतो.
............
एक वर्षापूर्वी
दोन दिवसांपूर्वीच त्यांचं बोलणं झालं होतं फोन वर तो येणार म्हणून ती खूप खुश होती. तिला जागेवरून उठता सुद्धा येत नव्हतं आत्ता. पण चेहऱ्यावर एक आनंद होता.
दोन दिवसांपूर्वीच त्यांचं बोलणं झालं होतं फोन वर तो येणार म्हणून ती खूप खुश होती. तिला जागेवरून उठता सुद्धा येत नव्हतं आत्ता. पण चेहऱ्यावर एक आनंद होता.
घरतल्यांनी खूप समजावलं होतं तिला की एकदा त्याला तुझ्या तब्येती विषयी कळवूया. पण तिने साफ नकार दिला होता. त्याला समजलं तर तो नक्की तिला भेटायला येईल हे तिला माहीत होतं पण तिचं एकच मत होतं आत्ता त्याची गरज तिच्यापेक्षा जास्त आपल्या देशाला आहे.
सर्वांना शप्पत घालून त्याला काहीही कळता कामा नये असं सांगितलं होतं. तब्येतीच्या कुरबुरी मागच्या तीन चार महिन्यात खूप वाढल्या होत्या पण तिने जास्त लक्ष दिलं नव्हतं. आणि आत्ता तब्येत खूपच खालावली होती तिची. डॉक्टर च्या ट्रीटमेंट ला शरीर साथ देत नव्हत.
आत्ता तिला फक्त त्याला भेटायचं होतं. आपणाला अश्या अवस्थेत पाहून तो खूप रागावणार हे तिला माहीत होतं पण त्यासाठी मनाची तयारी केली होती तिने.
उद्या सकाळी तो येणार होता.
या टाईम ला ती त्याला घ्यायला स्टेशन वर गेली नव्हती याचच आश्चर्य वाटत होतं त्याला. कदाचित वेगळं काहीतरी सरप्राइज प्लॅन करत असेल ती असं वाटलं त्याला. तरी थोडा वेळ स्टेशन वर वाट पाहून तिच्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन तो घरी आला.
दरवाज्यात खूप गर्दी होती. नक्की काय झालंय हे त्याला कळलं नाही पण हृदयची धडधड वाढली होती नको नको ते विचार मनात येत होते. तो त्या गर्दीतून वाट काढत आत आला. तर समोर ती होती शांतपणे झोपलेली. तेही कायमची.
त्याच्या हातातील फुलं खाली तिच्या पायावर पडली. आणि तो तसाच खाली बसला. त्याच्यासाठी तर संपूर्ण जग थांबलं होतं. डोळे लाल झाले होते पण त्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता. सरप्राइज तर तिने दिलं होतं त्याला कधीही न विसरता येणार.
जितके दिवस तो इथे होता त्याच्या रूम मधून बाहेर पडला नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त तिच्याच आठवणी नाचत असायच्या. जेवायची सुद्धा सुद्ध नव्हती त्याला.
शेवटी पंधरा एक दिवसांनी तो रूम बाहेर आला. दाढी आणि केस वाढलेले होते. तो केस कापून आला दाढी करून अंघोळ करून स्वतःची तयारी करून बॅग भरून पुन्हा निघाला होता.
तिने तिचा शब्द पाळला होता शेवटच्या श्वासापर्यंत तिने त्याला साथ दिली होती आत्ता त्याला त्याचा शब्द पाळायचा होता. देशासाठी आपलं सर्वस्व वहायच होतं.
इथून पुढचा प्रत्येक दिवस देशाच्या नावावर केला होता त्याने. ज्याप्रमाणे तिने तिचा प्रत्येक श्वास त्याच्या नावावर केला होता...
समाप्त.
.............
लघु कथा लिहिण्याचा एक पहिलाच प्रयत्न केला आहे. कशी वाटली आवर्जून सांगा.
खूप खूप धन्यवाद..
©® अबोल चाफा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा