तिची तपश्चर्या - भाग ५४
मानस नंदिनीला भेटायला आल्यामुळे नंदिनीच्या
भावविश्वात खळबळ मजली होती पाहूया पुढे..
भावविश्वात खळबळ मजली होती पाहूया पुढे..
आता नंदिनीच्या घरातले सर्वजण उमा आणि मानसला भेटले होते आणि बराच वेळ झाला होता. संध्याकाळ
सरून गेली होती म्हणून मानस आणि उमा निघण्याची तयारी करत होते. मानस तसे सर्वांना म्हणाला की आता आम्ही निघतो. मानसचे एक मन सांगत होतं की निघताना तरी नंदिनी त्यांच्या प्रेमाबद्दल काही बोलेल. तरीपण का कोण जाणे त्याला नंदिनीने आता आपल्याबरोबर यावं असं वाटत नव्हतं. जयंतची आई, चित्राताई आणि मुख्य म्हणजे जयंत हे सर्व नंदिनी आता काय सांगते ह्याकडे कान लावून बसले होते. उमाच्या मनात तर विचारांचं काहूर माजलं होतं. उमा आणि मानस दोघेही उठून उभे राहिले. दोघांनी आईला आणि चित्राताईंना नमस्कार केला. ते निघणार हे पाहून नंदिनी उभी राहिली आणि म्हणाली,

"अरे तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायचीच राहिली. आता काही दिवसातच मी आणि जयंत आम्ही लग्न करणार आहोत. तुम्ही दोघांनी लग्नाला नक्की या."
हे शब्द ऐकल्यावर नाही म्हटलं तरी मानसला कोणीतरी आपल्या कानात शिश्याचा रस ओततंय असं वाटलं. चित्राताई आणि जयंतला मात्र खूप हायसं वाटलं. त्यांच्या डोक्यावरील खूप मोठा ताण दूर झाला होता. सर्वात जास्त आनंद तर उमाला झाला होता. तिच्या मनातील मोरपीसे तिला मऊ रेशमी स्पर्श करत होती. उमाला वाटत होतं की हे शब्द ऐकण्यासाठीच आपले कान आतुर झाले होते. ती, मानस आणि नंदिनी एकत्र येण्याचा प्रयत्न जरी करत असली तरी तिला मनातून नंदिनी आणि मानसने एकत्र येऊ नये असंच वाटत होतं. तिच्या प्रबळ
इच्छाशक्तीचा विजय झाला होता. असं असलं तरी मानस पुढे त्याच्या आयुष्यात तिला काय स्थान देईल हे अजून गुढच होतं. काही हरकत नाही. मानस बरोबर आपण आता राहतोय तसंही राहायला तयार आहोत. मानसचा सहवास आपल्यासाठी परमप्रिय आहे. आतासुद्धा तो आपल्याशी प्रेमानेच वागतो. त्याने आपल्याला कधीही तुच्छ लेखले नाही किंवा आपला दुस्वास केला नाही. नेहमी आपला आदरच केला आहे. योग्य तो मान दिला आहे. मानसच्या घरातील सर्वच खास करून आई आपल्याला जीवापाड जपतात. आपले किती लाड करतात. आपल्याला काय हवं नको त्यांना बरोबर कळतं. कोणती सासू नव्या सूनेसाठी स्वतः हून कपडे खरेदी करेल, साड्या खरेदी करेल. त्या बाबतीत आपण खूपच भाग्यवान आहोत.

मानसने वरवर हसत नंदिनीला म्हटलं,
"नंदिनी खूप खूप अभिनंदन. जयंतसारखा काळजी घेणारा नवरा तुला मिळतोय हे तुझं भाग्यच म्हणायचं."
उमा पण म्हणाली,
"नंदिनीताई अभिनंदन आणि तुम्हाला पुढील आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा."
उमा आणि मानस त्यांच्या घरातून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर उमाने मानसच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला वाटत होतं मनातून मानसला नक्कीच खूप वाईट वाटलं असेल म्हणून ती म्हणाली,
"आता आपण महाबळेश्वर कॅन्सल करून सरळ घरीच जाऊया का?"
"उमा तुला असं वाटते ना की नंदिनीने जयंतशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला वाईट वाटतंय. अगदी असंच काही नाही मला थोडं फार वाईट वाटलं परंतु आता तिने योग्य निर्णय घेतला आहे. आपण ठरवलं आहे तसं आपण महाबळेश्वरला जाऊया. तुला महाबळेश्वरला फिरायचं आहे, स्ट्रॉबेरी खायचीय आहे माझ्या लक्षात."
मानसच्या या शब्दांनी उमा सुखावली. उमाच्या मनात आलं कदाचित आपल्या सहवासाने मानसच्या मनात आपल्याबद्दल काही भावना निर्माण झाल्या असतील का. आज जर आपल्याला सांगणारा 'मी तुला माझ्या आयुष्यात कधीच पत्नीचा दर्जा देऊ शकणार नाही' हा तेव्हाचा मानस असता तर आज कदाचित तो सरळ घरी जाऊया असंच म्हणाला असता. नंदिनीच्या घरी फक्त चहा आणि बिस्किटच खाल्ले असल्यामुळे मानसला भूक लागली होती तो उमाला म्हणाला,
"उमा मला प्रचंड भूक लागली आहे आपण एखादे छानस रेस्टॉरंट बघून आधी काहीतरी खाऊन घेऊया आणि मग पुढे जाऊया. तुला पण भूक लागली असेलच ना." उमा निरागसपणे म्हणाली,
"इतका वेळ मी तहानभूक सगळच विसरले होते. पण आता मला तहान पण लागली आणि भूक पण लागली आहे."
"उमा तुला टेन्शन आलं होतं का की नंदिनी आता काय निर्णय घेईल. तसं मला सुद्धा टेन्शन आलं होतं. माझे एक मन सांगत होतं की नंदिनीने आपल्याबरोबर यावं पण माझ्या मनात तुझा विचार आला आणि वाटत होतं की जे आहे ते तसंच चालू राहावं. एक लक्षात ठेव आपलं नातं कुठलंही असलं तरी मी तुला कधीच अंतर देणार नाही."
उमा मनात म्हणाली हा किती कुचकट आहे. सरळ सरळ त्याने म्हणायला हवं होतं ना की तू माझीच आहेस. मी तुला कधीही अंतर देणार नाही. आपलं नातं कुठलंही असो असं कशाला म्हणायला हवं त्याला. उमाला क्षणभर मानसचा राग आला. नंतर तिने विचार केला की रागावून काय उपयोग. आता पुढे काय होईल ते बघत
राहण्यावाचून आपल्याला काही पर्याय नाही कारण मानसने आपल्याला लग्नाआधी स्पष्ट कल्पना दिली होती. आपण त्याला कोणताही दोष देऊ शकत नाही.
राहण्यावाचून आपल्याला काही पर्याय नाही कारण मानसने आपल्याला लग्नाआधी स्पष्ट कल्पना दिली होती. आपण त्याला कोणताही दोष देऊ शकत नाही.
एक छानस रेस्टॉरंट बघून मानसने गाडी थांबवली. तो उतरून उमाच्या बाजूचा मागचा टायर बघायला येत होता इतक्यात उमा उतरताना धडपडली. मानसने लगेच तिला हात दिला. तिच्या मनात आलं मानसचा हात असाच कायम माझ्या हातात राहू दे देवा. कायम मला आधार देण्यासाठी तरी मानसने माझा हात धरावा. इतक्यात मानस तिला म्हणाला,
"अग उमा हळू मी सावरलं नसतं तर पडली असतीस ना."
"कुणीतरी सावरायला असल्यावर धडपडण्यात पण एक आगळीच मजा असते नाही का?"
"वा छान काव्यात्मक बोलण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही. मी तुला सावरेन म्हणून मुद्दाम धडपडू नकोस बरं का." मानस गमतीने म्हणाला.
"कसं असतं ना पडणार्या व्यक्तीला कोण ना कोणतरी आधार देतोच किंवा पडल्यावर तरी उठवतोच."
उमाचे हे वाक्य ऐकल्यावर मानसच्या मनात आलं बापरे हिला काय सुचवायचं आहे. तू सावरलं नाहीस तर मला सावरायला इतर कोणाचा हात येईल असे हिला म्हणायचे आहे का. उमाच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणी यायला नको. अरे पण आपण हीच्यावर एवढा अधिकार कसा काय गाजवू शकतो. अधिकार आपण त्याच्यावरच गाजवू शकतो ज्याला आपण त्याचे योग्य स्थान देतो. उमाजवळ आपण कितीतरी वेळा नंदिनी बद्दल बोललो, कितीतरी वेळा तिच्याबद्दलचे उत्कट प्रेम आपण उमा जवळ व्यक्त केलं. इतकं असूनही उमाने आपला कधी तिरस्कार केला नाही किंवा तिला नंदिनी बद्दल पण मत्सर वाटला नाही. उलट यावेळी तर आपल्यापेक्षा तीच जास्त प्रयत्न करत होती की मी आणि नंदिनीने भेटावं. उमाच्या मनात आपल्याबद्दल नक्की काय भावना असतील. एकदा तिच्या मनात डोकावून बघायलाच हवं.
(मानस आणि उमा यांची महाबळेश्वर ट्रिप त्यांच्यातील अंतर कमी करू शकेल का? पाहूया पुढील भागात. कृपया यापुढील भाग न चुकता वाचत रहा)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा