Login

तिच्या कामाची बरोबरी कुठे करता!!

Tichi
तिच्या कामात कला असते
निगुती असते
चव असते
मेहनत असते
सांगड असते
कोरीवकाम असते
ध्यान असते
लगन असते
सुबत्ता असते
रंग असतात
रेषा असतात
तप असते
भाव असतात
आखीव रेखीवता असते
जोड घड असते
जपणूक असते
अलगदता असते
प्रेम असते
परमय असते
तरी म्हणणारे सहज कसे म्हणतात तिला काही येत नाही...तिचे फार काही मोठे काम नाही..आता सांगा जो असा म्हणतो त्याच्या कामात इतके गुण असतात का..? नक्कीच नाही त्याचा आणि गुणांचा कुठेच मेळ नसतो..पण ती एकटी हे सगळे सहज करून जाते ,ते ही नौकरी करत असतांना...
©®अनुराधा आंधळे पालवे