Login

तिच्या मधील ती... भाग 3

मनातील भावनांचा गुंता
संजनाच्या मनाची अजिबात तयारी नव्हती... म्हणून शरीराने जरी तिथे उपस्थित असली तरी मनाने अजिबात ती तिथे नव्हती...
आपल्यावर काहीतरी अत्याचार होत आहे असं तिला वाटत होत...
म्हणून डॉ. निलम यांच्या प्रत्येक प्रश्नावर ती मोजकच बोलायची...
परतीच्या प्रवासात आणि दोघेही अबोल होते... दोघांकडेही खूप प्रश्न होते... पण सारं काही डोळ्यांतून वाहत होत...
ती रात्र म्हणजेच... निव्वळ निशब्दता....
ते म्हणतात ना... " शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले "

आता दोघांमधील बोलणं पण खूप कमी झालं होत...
म्हणजेच फक्त हावभाव... शब्द जणू गायबच झाले होते.
पुढच्या फेरीस संजना थोडी मोकळी होऊ लागली...
थोड्या गप्पा रंगू लागल्या...
आता घरी येताना संजनाची कळी हळू हळू लागली....
पण ह्या वेळी मात्र संजनाचं डॉ. च्या केबिन मध्ये होती....
डॉ. निलम विशाल ला म्हणाल्या... " वेळ च औषधं आहे "
दिवस पुढे जात होते तस संजना नॉर्मल होत चालली होती... काही बोलायची नाही पण तीच हसू सार काही सांगून जात होत ....
पुन्हा एके दिवशी डॉ. निलम यांचा विशाल ला फोन आला म्हणाल्या वेळ काढून भेटायला या जरा बोलायचं आहे...
हे सार ऐकून विशाल थोडा धास्तावला....
आणि मनाची आणि विचारांची जुळवाजुळव कुरुन त्यांना भेटायला गेला...
त्या भेटीत त्याला समजलं..
की, संजना डिप्रेशन मध्ये आहे...
आणि याच कारण म्हणजे तिला व्यक्त होता येत नाही.. म्हणजे ती रडत नाही, हसत नाही आणि बोलत देखील नाही.... हे काही आताच नाही... अगदी लहानपणापासून....

तिच्या सोबत बोलत असताना डॉ. निलम यांना समजलं की, तीच लहानपण खूप छान गेलं... पण एकदा सुट्टी मध्ये ती मामा कडे गेली असताना... तिचा लहान मामा नदीत पोहताना मरण पावला....तेव्हा ती लहान असल्यामुळे तिला धड रडता आले नाही... पण अवतीभोंवती चाललेली रडारड तिला अस्वस्थ करत होती... हे सार ऐकताना विशाल ला तिला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ उमजू लागला.... तिला पडत असलेली सारी स्वप्न म्हणजे तिला वाटणारी भीती आहे ...
हे एक उदाहरणं झाले...
असे अनेक प्रसंग तिच्या आयुष्यात आले...
तिला शिक्षण पूर्ण करायचं होत. पण आई वडील म्हणाले लग्न कर म्हणून ती लग्नासाठी तयार झाली...
वाईट झालं असे नाही... विशाल खरंच खूप चांगला होता... पण तिच्या मनाची तयारी नव्हती हे मात्र खरं.
नवीन जबाबदारी नवीन जागा... ह्यात तिला कधी व्यक्त होता आले नाही....
हे सार ऐकताना... विशाल ला वाटत होत.. खरंच किती महत्वाच असत व्यक्त होणं...
जखमा खोलवर असतात... वर फक्त खपली असते... आणि आपण समजतो जखम भरली.
आज तो समाधानी वाटत होता... काही तरी मिळाल्याच सुख होत.. प्रश्नांची उकल सापडली होती.

घरी गेला.... संजना काही तरी आवरत होती...
त्याला पाहून हळूच हसली...
विशाल म्हणाला... " आज राणीसरकार भलत्याच खुश आहेत" हे ऐकून फक्त गालावरील कळी खुलली.

त्या रात्री विशाल ने ठरवलं... संजनाला वेळ द्यायचा....

दुसऱ्या दिवशी पासूनच विशाल तिला बोलत करू पाहू लागला..
तिची आवड प्रकर्षाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला.... सोबत डॉ. निलम होत्याच...

हळू हळू संजना बोलू लागली होती...
आणि हे सार पाहून विशाल खूप खुश होत होता... कारण आज त्याला खऱ्या अर्थाने तिच्या मधील ती समजली होती....

🎭 Series Post

View all