Login

तिच्या वाट्यालाच परकेपणा का? भाग १

परकेपणा नात्यातील अंतर वाढवतं.
"आई, बुंदी घ्या ना. खूप छान झाली आहे?" मधू सासूला म्हणाली.

"नको मला, जास्त गोड आवडत नाही." सरला.

मधूला माहीत होतं सरला का नको म्हणतेय. तिच्या माहेरवरून आणली होती.

दुसऱ्या दिवशी नणंद सुमेधा आली. तिच्या आईला म्हणजे सरलाला गोड आवडायचं म्हणून येतांना तिने जिलेबी आणली होती.

ते पाहून सरलाला लेकीचं खूप कौतुक वाटलं.

"खरंच बाई लेक असावी, लेकीलाच आईची माया असते. तिच्या आवडनिवडी लेकच जपते. मला काय आवडतं हे सुमेधाला चांगलं माहीत आहे."

मनसोक्तपणे जिलेबी खाल्ली.


ही गोष्ट मधूच्या मनाला लागली. तिच्या मनाला ही ही गोष्ट खूप लागली, कारण आईकडून येतांना ती आईला म्हणाली होती
"माझ्या सासुबाईना गोड खायला खूप आवडतं." आईने जास्तीची बुंदी दिली होती, पण सरला अशी वागली.

'कुठे मी कमी पडते? मीच जास्त पूढे पूढे करते हीच चूक आहे. मी माझं माझं करते आणि मलाच परकेपणाची वागणुक दिली जाते.'

तिच्या लग्नाला एकच वर्ष झाले होते. महेश आणि तिचं लव्ह मॅरेज होतं. महेश तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिला समजून घ्यायचा.

आज असं झाल्याने तिचा चेहरा उतरला होता.

महेशच्या लगेच लक्षात आले.

"मधू, काय झालं? आज शांत आहेस? बरं वाटत नाही का?"

"ठीक आहे मी."

"खरंच ठीक आहेस का? तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय."

"महेश, सून आणि लेकीमध्ये भेदभाव का केला जातो?"

त्याला कळून चुकलं नक्कीच काहीतरी झालंय.

"काय झालं? आई काही बोलली का?"

"तसं काही बोलल्या नाही, पण वागणुक पाहून तर तेच वाटतं."

"मधू, आता स्पष्टपणे सांग."

"मी आईकडून काल बुंदी आणली होती. आईंना दिली तर म्हणाल्या जास्त गोड आवडत नाही आणि आज ताईंनी जिलेबी आणली तर आवडीने खाल्ली आणि म्हणाल्या लेकीलाच माया असते."

"ओहह, हे असं झालं."

"मला फार वाईट वाटलं. माझ्या माहेरवरून आणली होती आणि मी आणली होती म्हणून असं का? मी सून आहे ना सूनच राहणार."

"मधू, मी बघतो काय करायचं. तू जास्त विचार करू नको."

त्यालाही माहीत होतं आईचा बहिणीवर किती जीव आहे, पण मधू जे करत होती ते देखील त्याला माहित होतं. मधूचा सर्वांना आपलंसं मानन्याचा स्वभाव त्याला माहीत होता. ती भावनिक होती. असं काही झालं तर गोष्टी मनाला लावून घेत.

त्याने मनोमन ठरवलं. जे आई मधूसोबत वागली त्याची जाणीव करून द्यायची. कसा जाणीव करून देणार होता तो?
पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
अश्विनी ओगले.
0

🎭 Series Post

View all