Login

तिला घरी बोलवा भाग 1

तिला घरी बोलवा सपोर्ट करा
तिला घरी बोलवा भाग 1

©️®️शिल्पा सुतार

मुलींना सपोर्ट करा. त्यांना त्रास होत असेल तर घरी बोलवा. आजच्या काळात ही काही काही ठिकाणी खूप सासुरवास असतो. सहन होत नाही. मुलीना सपोर्ट नसतो. मग काही तरी अनर्थ घडत. मग घरचे विचार करता आधी तरी सपोर्ट केला असता. पोरगी हातची गेली. आयुष्यभर ते दुःख सोबत घेऊन जगाव लागत. नंतर पस्तावा होण्या पेक्षा आधी त्यांना सपोर्ट करा. असा संदेश या कथेतून द्यायचा आहे. ही कथा काल्पनिक आहे. शिल्पा सुतार यांची कॉपी राइट आहे.
......

राहुल नुकतच ऑफिस मधून घरी आला. सीमाचा स्वयंपाक झाला होता. ती आत बसुन होती. तिने आतून बघितल.

"आई ताट करू का?" तिने विचारल.

त्या काही म्हटल्या नाही. तिने तीन ताट करून सासू, सासरे, राहुलला वाढल. तिला त्यांच्या सोबत जेवायची परवानगी नव्हती. त्यांच जेवण झालं. ते बाहेर जावुन बसले.

ती ताट उचलत होती. तिने घर झाडल. बाकीच आवरल. तीच जेवण बाकी होत. एकट जेवण जात नव्हतं. हे घरचे त्यांच्यात मला घेत नाही. मी कोण आहे नक्की. या घरची सून की नोकराणी. अजिबात काडीची किम्मत नाही. जावू दे त्रास करून काही होणार नाही. तिने आवरून घेतल.

ती आत जेवत होती. राहुल सासुबाई बाहेर बोलत होते. तिच्या अंगावर काटा आला. रोजच होत हे. आता नाही केलेल्या गोष्टीचा आरोप होईल. ती विचार करत होती काय काय केल आज. घर काम झाल. शेजारी थोड्या वेळ गेली होती न्यूज पेपर मागायला. त्या बस म्हटल्या म्हणून बसली.

तिला जेवण जात नव्हत. ती भांडी आवरत होती. राहुल आत आला. तिला हाताला धरून आत नेल. ती घाबरली. एकदम मागे सरकली. तो काय म्हणेल अंदाज येत नव्हता. ती त्याच्या कडे बघत होती.

" आज शेजारी गेली होतीस का?" त्याने विचारल.

"हो. मी काही नाही केल. " ती निरागस चेहरा करून म्हणाली.

" हो का एवढी साधी आहे का तू? काय सांगितल शेजारी आई बद्दल?" त्याने रागात विचारल.

"काही नाही."

"खर बोल."

"मी न्यूज पेपर घ्यायला गेली होती. त्या बस म्हटल्या. त्यांनी चहा केला. त्यांच्या मुलीला थोड गणित शिकवलं."

"एवढी हुशार आहे का तू. तुला का विचारतील ते अभ्यासाबद्दल. काहीही सांगशील मला खर वाटेल."

" अहो असच झाल. खरच." ती हळूच म्हणाली.

" घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. सांगितल होत ना. लक्षात नाही ठेवता येत का?" त्याचा आवाज वाढला होता.

"मी काहीही सांगितल नाही. तुम्ही त्या काकूंना विचारा वाटल तर. "

" माझ्याशी मोठ्या आवाजात बोलते का." त्याने तिला कानामागे मारली.

ती रडत होती. काहीतरी सांगत होती. बाहेर पर्यंत दोघांचा आवाज जात होता. सासुबाई सासरे ऐकत होते. त्यांना बर वाटल.

सीमा त्यांनी आवाज दिला. ती डोळे पुसत बाहेर आली. गालावर बोट उमटलेले होते.

" गादी घाल. "

ती आतून गादी पांघरुण घेवून आली. तिच तिच काम शांततेने करत होती. पाण्याचा तांब्या ग्लास आणून ठेवला. ती आत निघून गेली.

राहुल बाहेर येवून बसला. त्याच्या चेहर्‍यावर उर्मी होती. मी मर्द आहे. बायकोला कस ताब्यात ठेवतो. माझ्या समोर तीच काही चालत नाही. वेळ पडली तर मी हात चालवतो. ती माझ्या समोर घाबरते. जेवायला वाढतांना ही तिचे हात कापतात. त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होत.

सीमा तिच्या रूम मधे बसुन रडत होती. नेहमीच होत हे. रोज रात्री सासू सासरे तिच्या बद्दल राहुलला काहीबाही सांगायचे. तिच्या कडून काय काय चुका झाल्या याचा पाढा वाचायचे. तो चीडायचा. तिच्याशी भांडायचा. तिच्यावर हात उचलायचा.

सुरुवातील तिने खूप प्रतिकार केला. पण काही उपयोग झाला नाही. सासू बाई बद्दल एक शब्द जरी तोंडातून काढला तर दुप्पट मार मिळायचा. ती धास्तावली होती. काही म्हणत नव्हती.

एक दिवस ही नीट जात नव्हता. ती निमुटपणे सहन करत होती. मागे तिने आईला थोड सांगितल होत. आई टेंशन घेते. जावू दे. होईल नीट ती आशेवर होती. पण आता सहनशीलतेच्या पलीकडे झाल होत.

थोड्या वेळाने राहुल आत आला. तिने डोळे पुसले. तो तिच्या बाजूला येवून झोपला. ती एकदम बाजूला सरकली. तो तिच्या गालावरून हात फिरवत होता. "लागल का? मग तू चुका नको ना करत जावू." तो प्रेमाने बोलत होता. हळू हळू त्याचा हात तिच्या साडीवर आला.

तिला समजल याला काय हव ते. ती एकदम बाजूला झाली. त्याने थोड पुढे होवुन तिला ताब्यात घेतल. तिने प्रतिकार केला. काही नको तुमच जवळ घेण स्वत पुरत आहे. काम झाल की बाजूला करतात.

"काय झाल? " त्याने विचारल.

" मला या पुढे हात लावायचा नाही. दिवस भर नीट वागायच नाही. रात्री बरी मी लागते." तिने हिम्मत करून सांगितल.

"काय बोललीस. तुझ तोंड खूप चालत. तुला हात लावायचा नाही? मग काय करायच. बायको आहेस ना तू माझी. उगीच पोसतो का मी तुला." त्याने आक्रमक भूमिका घेतली. तिला एका हाताने जवळ ओढल. ती त्याच्या अंगावर जावून पडली. तशी उठली. तिने त्याला ठकलल ती बाहेर पळून गेली.

तो रागाने बाहेर आला." आई.. आई, कशी वागते ही बघ जरा. काही सांग हिला. "

" काय झालं?" त्या बाहेर आल्या. तो सांगत होता.

" जा पोरी आत झोप."

"मी जाणार नाही." ती परत म्हणाली.

"बघितल का आई . माझ्या खोलीत झोपायच नसेल तर इथे रहायच नाही समजल ना. नीघ इथुन. अश्या छप्पन पोरी करून आणेन मी." त्याचा इगो दुखावला गेला होता.


0

🎭 Series Post

View all