Login

तिला घरी बोलवा भाग 2

तिला घरी बोलवा सपोर्ट करा

तिला घरी बोलवा भाग भाग 2

©️®️शिल्पा सुतार

" काय ग पोरी तुला समजत नाही का नवर्‍याच मन सांभाळायच. नीट वागायच. जा आत. रात्रीच गोंधळ नको आहे." सासुबाई ओरडल्या.

" अशी करते ती. रोज नखरे असतात . "

" म्हणून इतके दिवस पाळणा हलला नाही. बोलाव हिच्या आई बापाला जावु दे हिला घरी. "त्या ओरडल्या.

"तेच योग्य राहील. ना काही येत ना जात तिला. "राहुल आईला तिच्या बद्दल सांगत होता.

ती आत निघून गेली. इथे अजून वेळ घालवण्यात अर्थ नाही. नाहीतर माझ काय होईल सांगता येत नाही. मी इथे रहाणार नाही. रोज वेगळा हा त्रास असतो. गाल खूप दुखत होता. काल मारल होत ते वळ अजून पायावर होते. हिम्मत करावी लागेल. आता सहन होत नाही. नाहीतर एक दिवस हा राहुल मला मारून टाकेल. तिने फोन हातात घेतला. वडलांना फोन केला.

रमेश राव, आशा ताई तिचे आई बाबा झोपलेले होते.

"कोण आहे हो?" आशा ताई काळजीत होत्या.

"सीमाचा फोन आहे."

"इतक्या रात्री ?"

"हो बघू तर दे काय म्हणते आहे ती. बोल बेटा."

" बाबा तुम्ही मला घ्यायला या. लगेच मला आता इथे रहायचं नाही. " ती रडत होती.

" काय झालं आहे सीमा? "

" मला जास्त बोलता येणार नाही. तुम्ही लगेच निघा. दोन तासात या इकडे बाबा. मी अगदी सिरीयसली सांगते आहे. लगेच या. नाहीतर माझ काही खर नाही. काहीही होईल. " ती अजून ही रडत होती.

" बेटा शांत हो धीर धर मी येतो लगेच." रमेशराव उठले शर्ट घालत होते.

"काय झालं आहे हो?" आशाताई त्यांच्या मागेच होत्या.

" सीमाचा फोन होता लगेच घ्यायला या म्हणत होती. "

" काय झालं आहे नक्की? " त्या काळजी करत होत्या.

" आता तिकडे जावून बघतो."

"थांबा चहा घ्या. मग जा. " आशा ताई चहा करत होत्या. ते दोघ किचन मधे बोलत होते.

त्यांचं खेड्यातलं खटल्याच घर. मोठी काकू उठून आली ती ऐकत होती." कुठे? सीमा कडे चालले का?"

"हो वहिनी. ती रडत होती. "

" भांडण झाल का? तिने या म्हटलं म्हणून लगेच जायचं का? पोरीच्या जातीला थोडी सहनशीलता हवी. छोट्या मोठ्या कुरबूरीं कडे दुर्लक्ष करायच. त्यांच्या प्रत्येक भांडणात आपला सहभाग नको. नाहीतर तुम्ही तिकडे जाल आणि ती तिच्या कामात बिझी असेल. " त्या बोलल्या.

" ती ठीक असेल तर चांगल आहे पण पोरगी रडत होती. माझ मन रहात नाही. "रमेश राव बोलले.

" आटपा हो निघा." आशा ताई बोलल्या.

वहिनी चिडलेल्या होत्या. त्यांना दोन मुली होत्या. दोघींच लग्न झालेले होत. त्या स्वभावाने कडक होत्या. त्यांना वाटत होत ही सीमा घरी आली तर माझ्या मुलींना त्रास नको व्हायला.

" तुम्हाला काय माहिती वहिनी तिकडे काय झालं आहे ते. काही करता काही झालं तर पोरीला. हे बरोबर निर्णय घेत आहेत. जा हो जावून घेऊन या तिला. मला हुरहुर लागली आहे. आपल्याला माहिती आहे ना आपल्या मुलीच विशेष चुकत नाही. साधी आहे ती. ती रडते आहे." आशा ताई बोलल्या.

" आपल्या दोघींनाही या घरात किती त्रास होता. राहिलो ना आपण दोघींही. अस रात्री अपरात्री माहेरी निघून गेलो का?" त्या खूप बोलत होत्या.

" तसच काही कारण असेल वहिनी. नाहीतर इतर वेळी ती असा फोन करत नाही. आपले नवरे चांगले होते. आपली बाजू घेत होते. इथे तिचा नवरा तिला त्रास देतो. बघू तर द्या काय झालं आहे. " आशा ताई बोलल्या.

"तुम्हाला काय त्रास आहे ती इकडे आली तर? तिला कोण आहे आपल्या शिवाय? बाजूच्या मीनाचे उदाहरण ताज आहे ना. घरच्यांचा सपोर्ट नव्हता शेवटी काय झालं तिने आत्महत्या केली. काय महत्त्वाच आहे आपल्याला? आपली पोरगी की इज्जत? माहेरच्या लोकांनी असं केलं तर ती जाईल कुठे." रमेश राव चिडले.

काकूंनी खूप विरोध केला पण या दोघांनी ऐकलं नाही. रमेश राव लगेचच सीमाच्या गावाला पोहचले. तिच्या घरी गेले. राहुल समोर चहा घेत बसला होता." बरं झालं तुम्ही आले मामा मी तुम्हालाच फोन करणार होतो. काय वागणं आहे तुमच्या पोरीचं. तिला अजिबात अक्कल नाही. चार समजुतीच्या गोष्टी शिकवा. तिला घेऊन जा सोबत आणि नीट वागायच असेल तरच पाठवा. नाहीतर यापुढे इकडे घेऊन यायचं नाही."

"काय झालं आहे?" रमेशराव बारीक आवाजात बोलले. नाही तरी मुलीच्या वडिलांचा आवाज कमीच असतो अशा प्रसंगात.

सासूबाई सासरे बाहेर येऊन बसले. ते तिचे गार्‍हाणे सांगत होते. नवर्‍याचा मान ठेवत नाही. आजुबाजूला चुगल्या करते. हे करत नाही. ते करत नाही. काही येत नाही. शिक्षण नाही. नीट वागत नाही. घरी आलेल्या गेलेल्यांच्या पाया पडत नाही. पाणी देत नाही. मानपान सांभाळत नाही. बरेच पॉईंट्स होते त्यांचे.

तस बघितल तर विशेष अस काही नव्हतं. डोळेझाक करता आली असती किंवा प्रेमाने सांगता आल असत. पण नाही सून म्हणजे तिचा छळ झाला पाहिजे.


0

🎭 Series Post

View all