Login

तिला घरी बोलवा भाग 3

तिला घरी बोलवा सपोर्ट करा

तिला घरी बोलवा भाग 3

©️®️शिल्पा सुतार

रमेश राव ऐकत होते. त्यांना काही पटल नाही. "शिक्षण नाही असं कसं म्हणता तुम्ही? ग्रॅज्युएट आहे पोरगी. नंतर बी एड केल. लग्नाआधी शाळेत टीचर होती ती. हुशार आहे. "

" व्यवहारी ज्ञान नाही. तिला काही समजत नाही. दुकानात जाऊ शकत नाही. वागण्या बोलण्यात नीट नाही." राहुल सांगत होता.

"असं काही नाही. तिकडे आमच्या कडे सगळ करत होती. नवीन गावात गडबडून गेली असेल. पोरांच्या शिकवण्या पण घ्यायची. "

" हो का एवढी हुशार होती का ती तुमच्याकडे? तिकडेच घेऊन जा मग. तिला इथे परत आणायचं नाही. " तो चिडून बोलला.

" काय झालं आहे? बोलून बसून सोडवता येणार नाही का? असा टोकाचा निर्णय नका घेवू. " रमेश राव शांततेने घेत होते.

" तुमची पोरगीच म्हणते तिला नांदायचं नाही इकडे. तुम्ही तिला विचारा. कस वागते ते. तिला आम्ही लोक गोड लागत नाही. नवर्‍या जवळ रहात नाही. रात्रीतून बाहेर पळून येते. " सासुबाई बोलल्या. वडलांनी खाली मान घातली.

" सीमा बाहेर ये. " त्यांनी आवाज दिला.

ती वडिलांसाठी चहा करून घेऊन आली.

" आता बरा जमल हिला चहा करायला. आम्ही मागतो तर जागेवरून उठत नाही. "राहुल चिडला.

सीमा बाबां जवळ आली. ती रडत होती." बाबा इथून जायच. "

" हो जावू थांब थोड मी बोलतो आहे ना. काय झालं नीट सांग. काय म्हणत आहेत हे. तू काही काम करत नाही का? " त्यांनी तिला शांततेने विचारल.

"बाबा मी करते. माझ काही चुकलं नाही. मी शेजारी काहीही सांगितल नाही. हे लोक माझ्याशी भांडतात .मला मारतात. वाटेल ते बोलतात. दिवस भर काय झाल ते आई बाबा रात्री यांना सांगतात. ते माझ्या वर चिडून असतात. मला इथे राहायचं नाही बाबा. मला घरी यायचं आहे. मला नाही वाटत ही परिस्थिती नीट होईल. मी येऊ शकते ना. " ती भराभर सांगत होती. तिने तिचा गाल दाखवला.

" हो येऊ शकते का नाही तुझच घर आहे ते. "

" हे अस आहे. पोरीला समजवायच तर हे तिला न्यायला तयार आहेत. "सासुबाई चिडल्या.

" ती रडते आहे. विचारू तर द्या मला काय झाल ते. मग ठरवू जायच की नाही. हे काय आहे अश्या प्रकारे मारतात का तिला ? " रमेश राव विचारत होते.

राहुल काही म्हटला नाही. उलट तो सीमा वर परत चिडला.

" निघा मग आता लगेच. सीमा तुला काही मिळणार नाही या घरातन. सामान, कपडे नाही. गळ्यातली सोन्याची पोत काढून दे. "

तिने दोन मिनिट ही विचार न करता गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्याच्या कडे दिल. त्यांने हात उगारला.

रमेश राव पटकन पुढे झाले. तिला एकदम जवळ घेतलं. "हे करू नका जावई. एका बापा समोर त्याच्या पोरीला मारू नका. झाली असेल काही चूक माझ्या पोरीची. अल्लड आहे ती. मी व्यवस्थित बोलतो तिच्याशी आणि नंतर फोन करतो."

"काही फोन करू नका. तुमच्या पोरीचे लक्षण काय आहे ते समजलं. आता आपली भेट कोर्टातच होईल." तो रागाने बोलला.

" एवढ टोकाच बोलू नका. तिला समजून घ्या. राहील ती दोन दिवस. मग मी सोडून देईल. "

"आत्ता इथून गेलीस तर परत येता येणार नाही. " राहुल तिच्या कडे बघत बोलला.

सीमा त्याच्या कडे बघत होती. एवढच प्रेम आहे का आमच्यात. म्हणजे यांना काही घेण नाही माझ्याशी. जाते तर जा. त्यांना त्यांचा इगो महत्वाचा. तिचा कंठ दाटून आला होता. एवढा त्रास होता तरी तीच पाउल निघत नव्हत. एक आशा होती नवर्‍या कडून. तो काही म्हटला नाही. ती आत मध्ये गेली नाही. वडिलांबरोबर मोटरसायकलवर बसली. निघतांना ही त्याच्या कडे बघत होती. तो आत चालला गेला.

दोघ घराकडे निघाले. ती रडत होती. रमेश राव गप्प होते. त्यांनी तिला काहीही विचारलं नाही. घरी आल्यानंतर ती एकदम आईच्या गळ्यात पडली. खूप रडत होती. ती रडल्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी होत त्या तिला समजावत होत्या. विशाल तिचा भाऊ बाजूला उभा होता.

काकूची अखंड बडबड सुरू होती. घरचं झालं थोड अजून व्याह्याने धाडलं घोड.

"वहिनी तुम्ही बोलू नका तिला. ती आत्ताच आली ना दुःखात आहे. तिकडे काय कमी त्रास होता. अजून आपणही अस करा. कुठे जाईल ती." आशा ताई म्हणाल्या.

"कसली दुःखात आहे. कान धरून दोन समजुतीचे बोल सांगून सासरी पाठवून द्यायचं. हे असे फालतू लाड काय कामाचे." त्यांच तोंड सुरू होत.

" अजून आपल्याला माहिती नाही तिकडे काय झालं."

" माहिती आहे ना मला काय झालं ते. सीमा तिकडे काही काम करत नाही. नीट वागत नाही. तिची सासू माझ्या काकूच्या नात्यातलीच लागते. कालच फोन आला होता. ति मला सगळं माहिती होतं. " काकू बोलल्या.

" तुम्हाला सगळं माहिती होतं तरी तुम्ही सांगितलं का नाही? " आशा ताई आश्चर्य व्यक्त करत होत्या.

या सगळ्या गडबडीत सीमा रडत होती." बाबा या काकूंना मी इथे राहिलेल नको आहे. "

" अस काही नाही बेटा शांत हो. रडू नकोस. "

" तुम्ही दोघी जरा गप्प बसा. सीमा समोर अस काही बोलू नका. आशा हिला घेऊन जा. आत मध्ये आपल्या खोलीत बसा. सीमा आराम कर. " रमेशराव वहिनी वर चिडले होते.


0

🎭 Series Post

View all