Login

तिला घरी बोलवा भाग 5

तिला घरी बोलवा सपोर्ट करा

तिला घरी बोलवा भाग 5

©️®️शिल्पा सुतार

" पण आता पुढे काय ठरवलं आहे बेटा. " काकांनी शांततेत विचारल.

" मी आता आई-बाबांजवळ राहणार आहे. शिक्षण झाल आहे. काहीतरी नोकरी करेल."

"तुम्हा दोघांना काय वाटतं? " काकानी रमेश रावांना विचारल.

"राहील ती इथे. सासरी पण त्रास होतो. आता माहेरी त्रास नको. तुम्हा लोकांना पटत नसेल तर आम्ही मळ्याच्या घरात राहायला जाऊ." रमेश राव बोलले.

"चालेल तुम्ही मळ्याच्या घरातच राहायला जा. कारण आमच्या दोन्ही मुली सासरी सुखी आहेत. ही माहेरी परत आली तर त्या मुलींना त्रास नको व्हायला. " काकू कुत्सित पणे बोलली.

काकूचे विचार ऐकुन सगळेजण आश्चर्यचकित झाले होते.

या बाईचे मी इतकं केलं आणि तिला माझी मुलगी दोन तास सुद्धा सहन होत नाही. आशा ताई ही चिडलेल्या होत्या.

" ठीक आहे आम्ही उद्याच जातो तिकडे रहायला. लांब पडेल ते घर थोडं. निदान माझे मुलं तरी सुखात रहातील." रमेश राव म्हणाले.

" रमेश आशा असं काही करू नका. इथे रहा ." काका चांगले होते.

"नाही दादा मला जावंच लागेल. माझ्या मुलांना माझा आधार आहे. काय झालं काय नाही त्यापेक्षा पुढे काय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. माझ्या मुलीला वाटत आहे ना की तिकडे तिच्या जीवाला धोका आहे तिला तिथे ठेवण्यात काही अर्थ नाही. कमी जास्त काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करणार नाही. " रमेश राव बोलले.

ते दुसऱ्या दिवशी मळ्यातल्या घरात राहायला निघून गेले. रमेश राव, आशाताई, विशाल आणि सीमा छान रहात होते. सीमा आता थोडी तरी रीलॅक्स होती. तिचा आत्मविश्वास परत येत होता. आता ती स्वतः उठून थोड काम करत होती. नाहीतर आधी नुसती रडत असायची.

मोठ्या काकूंची मीनल हे सगळं ऐकून घरी आली. "रमेश काका, आशा काकू का बर मळ्यात रहायला गेले?" ती विचारत होती.

मोठी काकू सगळं सांगत होती.

" आई तू हे चुकीचं केलं आहे. तिच्या ऐवजी तुझ्या मुलींना असं झालं असतं तर तू आम्हाला सपोर्ट केलाच नसता का?" ती खूप बोलली.

"नाही ग असं नाही."

"म्हणजे आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट अस आहे का तुझं? या वागण्याला काय अर्थ आहे आई? सगळ्यांनाच माहिती होत ना सीमाला पूर्वीपासून खूप त्रास होता. लग्नातही त्या लोकांनी किती गोंधळ घातला होता. मागे सुद्धा सीमा ॲडमिट होती. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काका काकूंनी बरोबर केला आहे तिला सपोर्ट करून. आई तुझे विचार कमकुवत आहेत. " ती खूप बोलली.

मीनल सीमाला भेटायला मळ्यातल्या घरात आली. सीमा तिच्याजवळ खूप रडत होती." पुरे झाल आता. जुन्या गोष्टी विसर. नवीन सुरुवात कर. "

" शाळेत तिच्या कामाचं बघितलं आहे. " विशालने सांगीतल.

" आई तर्फे मी तुझी माफी मागते सीमा. ती नीट वागली नाही. "

" जावू दे काही हरकत नाही."

"मला तर काळजीच वाटते आम्ही दोघींना जर काही झालं तर आई अजिबात सपोर्ट करणार नाही. " मीनल बोलली.

" त्यांनी नको का सपोर्ट करेना. ही तुझी काकू आहे कायम हे लक्षात ठेवायचं आणि कुठलीही गोष्ट आपल्या जीवापेक्षा मोठी नाही. काही वाटल तर घरी नीट सांगायच." आशा ताई बोलल्या.

"हो काकू. या नवीन जमान्यात अजूनही मुलीना होणारा त्रास तसाच आहे. दुसर्‍याच्या मुली इतका सोप्या सापडतात का? "

" बघा ना. "

" आता काय ठरवल आहे. "

" काही नाही. मी परत जाणार नाही. " सीमा म्हणाली.

" अजून पंचवीस वर्षाची ही नाहीस तू. पुढचा विचार कर. "

म्हणजे.

" चांगल स्थळ मिळाल तर लग्न करून घे."

"नको मला आता त्यात पडायचा नाही. "

" अस करुन कस चालेल."

"मी बोलेल तिच्याशी नंतर." आशा ताई बोलल्या.

थोड्या दिवसांनी तिचा डिवोर्स झाला.

सीमा विशाल सोबत शाळेत गेली. तिचे गणिताचे शिक्षक सध्या हेड मास्टर होते. ती त्यांना भेटली. तिची कहाणी ऐकुन त्यांच्या डोळ्यात पाणी आलं." कठिण आहे ग मुलींच जिवन. सध्या शाळेत टीचर साठी जागा नाही. पुढच्या महिन्यात निघतील. मी तुला फोन करतो."

" चालेल सर." दोघ घरी येत होते.

"मी खूप नाराज आहे विशाल."

"ताई तुझ्या आयुष्यात अजून काही तरी चांगल होणार असेल."

ती घरी ही गप्प गप्प होती. विशाल दुसर्‍या दिवशी ऑफिस मधे गेला. येतांना फॉर्म घेवून आला." सरकारी नोकरीच्या परीक्षा दे ताई. "

" अरे पण सिलॅबस काय आहे ? मला जमेल का ते? बराच गॅप झाला आहे. " सीमा घाबरली.

"येईल. तू खूप हुशार आहेस. प्रयत्न तर कर. "


0

🎭 Series Post

View all