तिला घरी बोलवा भाग 6 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
सीमा परीक्षा चांगल्या मार्काने पास झाली. लगेच नोकरी मिळाली. आज पहिला दिवस होता. रमेश राव, आशा ताई, विशाल खूप खुश होते.
कॉटनच्या साडीत सीमा खूप छान दिसत होती. आई बाबा मी निघते. तिने पाया पडल्या.
"खूप मोठी हो. तुला खूप यश मिळू दे."
ती ऑफिस मधे छान रमली. थोड्या दिवसांनी व्यवस्थित काम जमत होत.
ती आज थोडी उशिरा ऑफिस मधे पोहोचली. रजिस्टर आत साहेबांकडे गेल होत. ती घाबरत आत गेली. "साहेब येवू का."
"का उशीर झाला?" कडक आवाज आला.
" रिक्षा ट्रॅफिक मधे अडकली होती. उद्या पासून अस होणार नाही." तिने शांत पणे सांगितल.
"सीमा तू."
तिने नीट बघितल. तिच्या वर्गातला हुशार मुलगा विजय होता.
"विजय ना. तू इथे? सॉरी म्हणजे तुम्ही." तो तिथे वरच्या पदावर अधिकारी म्हणून काम करत होता.
"विजय म्हण. बस. " तो तिच्या बद्दल विचारत होता. गळ्यात मंगळसूत्र नाही. तिने काही सांगितल नाही. त्याला वाटल काही तरी झाल आहे.
लंच ब्रेक मधे ती डबा खात होती. विजय आला. "अरे वाह काकूंच्या हातची गवारची भाजी. "
"घे ना. ती उठून उभी राहिली."
"बस ग तू वेगळच वागू नकोस. "
आता बर्याच वेळा ते सोबत डबा खात होते. नंतर चहा घेत होते. एकमेकांबद्दल बोलत होते. तिचा चांगला स्वभाव त्याला खूप आवडला.
सहा वाजले ती घरी यायला निघाली. ती बाहेर आली. मागून विजय कार मधून आला. "कुठे सोडू का सीमा? "
" नाही माझा भाऊ घ्यायला येणार आहे. "
विशाल आला. तिने ओळख करून दिली. तिघांनी सोबत चहा घेतला. विजयने विशालचा फोन नंबर घेतला. रात्री त्याने फोन केला.
"विशाल मला सीमा बद्दल सांग थोड. ती दुःखी वाटते आहे."
तो सांगत होता.
"खूप सहन केल हिने. "
" हो ना. बेकार लोक होते ते. आता कुठे ती ठीक आहे."
"विशाल एक बोलू का? मला सीमा सोबत लग्न करायच आहे. मला ती आवडते." त्याने सांगितल.
त्याला खूप आनंद झाला. दोघ बर्याच वेळ बोलत होते. विशालने घरी सांगितल. रमेश राव, आशा ताई बोलत होते तेव्हा सीमाने ऐकल. ती आश्चर्य चकित झाली. आत जावून बसली.
रमेश राव तिच्या जवळ येवून बसले. "बाबा मला हे जमणार नाही. "
" बेटा आयुष्यात पुढे जाव लागेल ना. अस करता का."
"बाबा मी लग्न करणार नाही. माझ्या मनात धडकी भरली आहे."
" सगळे लोक सारखे नसतात. एक अनुभव खराब होता म्हणून काय झाल. नेहमी अस होत नाही. ही चांगली संधी आहे विचार कर."
ती ऑफिस मधे आली. लंच ब्रेक मधे आतून बोलवण आल. ती आत गेली विजय खुर्चीवर बसला होता. तिला कसतरी वाटत होत." सीमा तुझ्या घरचे बोलले ना तुझ्याशी. "
"हो. तू लग्न का नाही केल विजय? "
" कॉलेज मधे असतांना माझ एका मुलीवर प्रेम होत. तिच्या घरच्यांना आमच प्रेम मान्य नव्हतं. त्यांनी तीच दुसरीकडे लग्न केल. म्हणून इतके दिवस मी लग्न केल नाही."
सीमा ऐकत होती.
"आता तू इथे दिसली. खूपच समजूतदार चांगली आहेस. मला असाच जोडीदार हवा होता . माझ्याशी लग्न करणार का? " त्याने विचारल.
" तुला माझ्या बद्दल माहिती आहे ना. माझा डिवोर्स झाला आहे. खूप वाईट अनुभव आला. आता लग्नाची माझी हिम्मत होत नाही. मला माफ कर. मी तयार नाही." ती म्हणाली.
" मी अस कधीच करणार नाही मी चांगला आहे. माझ्या वर विश्वास ठेव तुझ्या साठी नाही माझ्या साठी हो म्हण." तो रीक्वेस्ट करत होती.
"माहिती आहे. तू खूप चांगला आहेस. "
" मग का विचार करतेस. हो म्हण, माझ्याशी लग्न कर . आपण सुखात राहू. "
" तुझ्या घरचे तयार होतील का? "
" घरी आई आहे. ती शिक्षिका होती. नवीन विचाराची. तिला काही फरक पडत नाही. मी खुश तर ती खुश. "
"अरे पण तु एवढा मोठा अधिकारी. माझ्या पेक्षा चांगल्या मुली मिळतील."
"समजून घेणार कोणी तरी हव ना . लग्न करेन तर तुझ्याशी." तो डायरेक्ट म्हणाला.
ती काही म्हटली नाही. ती विचार करत होती. विशाल तिला समजावत होता. तिने होकार दिला.
विजय त्याची आई घरी येवून भेटले. पसंती झाली. रमेश राव घरी जावून भाऊ वहिनीला सगळं सांगुन आले.
काका खुश होते. काकू काही म्हटली नाही. विजय सीमाच लग्न झाल. ऑफिस जवळ त्यांचा मोठा फ्लॅट होता. दोघ खूप खुश होते. सीमा आधी पासून समजूतदार होती तिने लगेच सगळं सांभाळून घेतल.
आज सीमा घरी येणार होती. मोठ्या कार मधून ती आणि विजय आले. चेहर्यावरून समजत होत ती किती खुश आहे ते.
रमेश राव. आशा ताई खूप खुश होते. विशाल विजयशी बोलत होता. जेवण झाल.
"आई बाबा आम्ही निघतो."
"ठीक आहे ना तिकडे. काही अडचण नाही ना? " रमेश राव विचारत होते.
" आई बाबा हे खूप समजूतदार आहेत. आधी सारख काही नाही." तिने सांगितल.
"खूप सुखी रहा." त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला.
सीमा विजय सोबत आनंदाने घरी गेली.
आयुष्यात दुसरा चान्स ही येतो. तो घ्यायला काही हरकत नाही.
