तिला ही स्वाभिमान आहे भाग १

तिला ही स्वाभिमान आहे भाग १
" आज काय चहा नष्टा मिळणार आहे का नाही.?." वनिता बाई सोफ्यावर बसुन बडबडत होत्या.

" सकाळचे आठ वाजून गेले आहेत तरी देखील आज अजून कोणत्याही कामाला सुरवात झालेली दिसत नाही आहे. आज काय सगळ्या कामांना सुट्टी आहे का ? " पेपरच पान जरा जास्त जोरात झटकत त्या म्हणाल्या.

तरी देखील शीतल अजुन बेडरूम मध्ये बेडवर झोपली होती. तिचा नवरा प्रतीक नुकताच बाथरूम मधून फ्रेश होवून बाहेर आला होता.

" शितल, अग ए शितल, अग उठ की ग. आई किती वेळ झाला तुला हाका मारत आहे. जा उठ लवकर. मला मस्त पैकी गरम गरम चहा करून दे." मोबाइल फोन बघत प्रतीक ने शितलला सांगितलं.

काल रात्री खूप काम होत. पाहुणे आले होते. त्यांचं सगळं करून तिला झोपायला उशीर झाला होता. म्हणून ती आज उशीरा पर्यंत झोपली होती.
तसही आज रविवार असल्याने घरात कामाची गडबड नव्हती. म्हणून ती पण जरा आरामात उठणार होती.

पण सकाळी सकाळी नवऱ्याने चहा ची फरमाईश केली. त्यामुळे मनात नसताना देखील तिला उठा वच लागलं होतं.

ती उठली. फ्रेश होवून किचन मध्ये गेली. ती किचन मधे पाऊल टाकत नाही. तोच वनिता बाई आपल्या तार सप्तक काच्या वरच्या आवाजात तिला ऑर्डर देत म्हणाल्या.

" अग घरच्या बाईने कस लवकर उठाव. चट चट काम करावी. पण नाही. या आजकालच्या मुलींना काही शिस्तच नाही."

"शितल. माझ्यासाठी आलं घालुन चहा कर. बाबांना कमी साखरेचा कर. आणि त्यांच्या रूम मध्येच नेऊन दे. ते योगा करत आहेत.गौरव ला त्याच्या रूम मध्येच चहा नेऊन दे."

शितल ने फक्त मान हलवली. तिने एकीकडे चहाच आधण ठेवलं. दुसरीकडे मिसळ बनवण्यासाठी कुकर लावला. मटकीची उसळ, बटाटे कुकरला लावले. मग चहा केला. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये नेऊन दिला.

तो पर्यंत मुल उठली. त्यांना दूध प्यायला दिल. तो पर्यन्त तिची धाकटी जाऊ रचिता पण फ्रेश होवून आली. तिने शितलला नाष्टा बनवण्यासाठी मदत केली. तिने मिसळी साठी पोहे आणि बटाट्याची भाजी बनवली. तर शीतल ने उसळ बनवली. मिसळीचा कट बनवला. कांदा लिंबू कोथिंबीर वगेरे चिरून ठेवलं. बाकीच सामान म्हणजे फरसाण तर घरात होतच. रचिता ने पाव ऑर्डर केला.
सगळ्यांचा नाष्टा आवरण्यात संपूर्ण सकाळ शीतल बिझी झाली होती.

दुपारी रचिताला बाहेर जायचं होत. त्यामुळें ती तिच आवरून निघून गेली. ते तिघ बाहेर गेले होते. तर बाहेरून जेवण करून येणार होते. प्रतीक पण रविवारी त्याच्या मित्रांच्या सोबत सोसायटीच्या क्लब हाऊस मधे मॅच खेळायला जात असे.

तो पण नाष्टा करून निघून गेला. रविवारी मुलं देखील क्लब हाऊस मधे खेळायला जमत तर आज ती पण खाली खेळायला गेली. सासू बाई सकाळ पासून टिव्ही वर पिक्चर बघत बसल्या होत्या. सासरे त्यांचं वाचन करत होते.

शितल एकटी या सगळ्यांचा स्वयंपाक करण्यात गुंतली होती. दुपार झाली तशी सगळी मंडळी घरी आली. शीतल ने सगळ्यांना जेवायला वाढलं. नंतरची आवरा आवरी पण केली. दुपारी साडे तीन नंतर रचिता आणि सौरभ घरी आले. श्लोक ला भूक लागली होती. त्याला बाहेरचं खाणं आवडत नाही. त्याला घरी आल्यावर वरण भात लागतोच. शीतल ने त्याच्यासाठी वरण भात बनवला. त्याला खाऊ घातलं.

शितल आणि प्रतीक च्या लग्नाला सात वर्ष उलटून गेली होती. त्यांना दोन मूल होती. मोठी मुलगी रेवा आणि धाकटा मुलगा वरद. तिला एक दिर आणि जाऊ पण होते. रचिता आणि सौरभ च्या लग्नाला चार वर्ष झाली होती. त्यांना दोन वर्षांचा मुलगा श्लोक आहे. रचिता आणि सौरभ नोकरी करतात. तर प्रतीकच स्वतःच दुकान आहे. शीतल एक गृहिणी आहे. तिची सासू वनिता आणि अशोकराव आता रिटायर झाले होते.

शितल पण रेवा च्या जन्माच्या आधी नोकरी करत होती. पण मग लहान मुलगी आणि घरची जबाबदारी यामुळे तिने नोकरी सोडली.रचिताने मात्र श्लोक सहा महिन्याचा झाल्यावर नोकरी पुन्हा जॉईन केली होती.

त्यामुळें सासू बाई यांचा रचिता कडे जास्त ओढा होता. तिच जास्त कौतुक.ती बाहेर जावून नोकरी करते. म्हणजे तिलाच काम असतात. शीतल घरी असते. घर सांभाळते. तर तिला काही फार काम नसतात. घरात तर धुण भांडी केर फरशी करायला कामासाठी हेल्पिंग हॅण्ड होता. तर शितलला घरी बसुन काय काम असत. ती तर घरीच असते. त्या तिला सगळया कामांच्या बाबतीत गृहीत धरत होत्या.

आजही तसचं झालं. यांचं घर शहरात आहे.बऱ्यापैकी नातेवाईक इथेच स्थायिक झाले होते.मग कधी तरी येणं जाणं, भेटण होत असे.
काल वनिता बाईच्या माहेरचा भाऊ वहिनी आले होते.

तर दररोजच्या लोकांच्या व्यतिरिक्त आणखी चार माणसं वाढली. ऐन वेळी जेवायला. त्यात राचिताला घरी यायला उशीर झाला. ती अगदी जेवणाच्या वेळी आली. त्यामुळे तिची काहीच मदत नाही झाली.

दिवस भर आई भेटली नाही. म्हणून आई आल्यावर श्लोक आईला चिटकून बसला. तिला सोडेनाच. शीतलला सगळी काम कारवी लागली. त्यामुळे आज सकाळी तिला उठायला उशीर झाला होता. रविवार आहे. म्हणून घरातील लोक आरामात आवरत होती. पण वनिता बाई ना शीतल लवकर उठली नाही. याचा राग आला होता.

इतकचं काय कमी होत. की तिचा नवरा प्रतिक देखील तिलाच म्हणाला.आई तुला किती वेळची उठवत आहे. जा आधी बघ तिला काय हवं आहे. तिला प्रतिकचा राग आला होता. त्याला त्याच्या आईची काळजी आहे. पण तिची नाही. काल रात्री पर्यंत ती काम करत होती. ते नाही त्याला दिसल. पण आईला आज वेळेवर चहा नाही प्यायला मिळाला हे लगेचच समजलं.

क्रमशः


🎭 Series Post

View all