तिला ही स्वाभिमान आहे भाग २

तिला ही स्वाभिमान आहे भाग २
ते नाही त्याला दिसल. पण आईला आज वेळेवर चहा नाही प्यायला मिळाला हे लगेचच समजलं.

संध्याकाळी रचिता तिन्ही मुलांना घेउन बाहेर गेली होती. सासू सासरे त्यांच्या सीनिअर सिटीझन ग्रुप मधल्या एका काकांच्या घरी गेले होते. शीतल एकटी घरी होती. तर सौरभ आणि प्रतिक ने आज सगळ्यांच्या साठी जेवण बाहेरून ऑर्डर केलं होतं.

रात्री आई बाबा उशीरा घरी आले. तर बाहेरून जेवण ऑर्डर केलं. शीतल किचन मधलं काम आवरत होती उद्याची स्वयंपाकाची तयारी करत होती.मुलांना डब्याला मुगाचे डोसे करायचे होते.तर ती मूग आणि तांदूळ भिजत घालत होती.सासू बाई लोटी भांड न्यायला किचन मध्ये आल्या होत्या. त्यांनी समोरचे पार्सलचे डबे बघीतले..म्हणून त्यांनी शीतलला खुप सुनावलं.

" शितल काय झालं ग की बाहेरून जेवण ऑर्डर केलं. तुला करायला काय झालं होत. मुलं कमावतात तर असे पैसे खर्च करते."

" आई आज सगळ्यांची इच्छा होती. बाहेरून ऑर्डर करायची. कधी तरी चालतं."

" हो तुला बोलायला काय जातंय. तुला थोडी पैसे कमावला बाहेर जावं लागतं. जरा बाहेर पड. म्हणजे कळेल. पैसे कमवायला काय करावं लागतं. हे अस खर्च केलं तर साचणार काय ? "

" आई मी घरी असते. कारण सगळे जर बाहेर पडले तर घराकडे कोण बघणार ? "

" तू काय बघते घराकडे. घरात तर काय काम असतात. धुण भांडी केर फरशी करायला मदत आहे. त्यांचे पैसे माझा मुलगाच देतो. तुला काय काम असत. चार पोळ्या तर लाटायच्या असतात. एक डाळ भाताचा कुकर लावला. काम झालं. बाकी असत काय "

" अहो आई अस कस बोलता. घरात स्वयंपाक करण्याशिवाय काय काम असत ? "शितल म्हणाली.

" ते तू मला नको सांगु. मी पण सगळं काही करून संसार केला आहे. तेव्हा कुठं आज हे वैभव तुला दिसत आहे."

" आई पण.."

" राहू दे. तुला सांगणं म्हणजे जाऊ दे. न बोलणं उत्तम. मला दूध गरम करून आणून दे. आज जरा जेवण जळजळीत झालं आहे." अस म्हणत आईनी पाणी लोटी मध्ये भरून घेतल.

" उदया हे पाण्याचं पिंप धुवून भरायला हवं आहे. शीतल उदया धुवून भर ग पाणी."

जाता जाता वनिता बाईनी सूचना दिली. त्या निघुन गेल्या. त्यांचं बोलण ऐकून शीतलच्या डोळ्यात पाणी आलं.

हे सगळ रचिता बाहेर उभी राहून ऐकत होती. शितल ताईला रडताना बघुन तिला खूप वाईट वाटलं. ती पटकन तिच्या जवळ गेली. पटकन मिठी मारली.

" शु . वहिनी शु. चूप. रडायचं नाही. अजिबात नाही. हे मोती वाया घालवायचे." शितलचे असू पुसत ती म्हणाली.

" रचिता. घरी काही काम नसतात का ग? "

" वहिनी कोण म्हणत घरी काम नसतात. बाहेरची काम निदान ठराविक वेळ पर्यंत मर्यादित असतात. घरातील काम चोवीस तास सात दिवस कायम चालूच असतात.

त्यांना ना सुट्टी असते. ना त्यांचं कधी मोजमाप केले जात. जगातील सर्वात मोठा टास्क म्हणजे घर सांभाळणं आहे."

" रचिता तु माझं मन राखण्यासाठी बोलतं आहेस ना." शितल म्हणाली.

" नाही वहिनी. मी तुमचं मन राखण्यासाठी बोलतं नाही आहे. मी खरं काय ते सांगत आहे." रचिता तिच्या गालावर हात फिरवून म्हणाली.

" शितल, अग दूध झालं का गरम. जरा आणून दे. मला औषध घ्यायचं आहे." वनिता बाई तिला हाक मारत किचन मध्ये आल्या. येता येताच बोलतं होत्या.

" रचिता अग हा श्लोक बघ रडतो नुसता. त्याला आधी घे बर." सौरभ श्लोक ला कडेवर घेऊन किचन मध्ये आला.

" रचिता घे ग याला. मला झोप येत आहे. उद्या सकाळी कंपनी आहे. हा काही झोपत नाही. नी मला ही झोपून देत नाही." सौरभ श्लोकला रचिता कडे सोपवत म्हणाला.

" मला पण उदया ऑफिस आहे. मला पण झोप येत आहे. तु बघ ना जरा त्याला. मी त्याच्या साठी दूध गरम करत आहे." रचिता किरकिरत म्हणाली.

" वहिनी प्लिज जरा श्लोक कडे बघ ना. जायचं ना काकू कडे." अस म्हणत त्याने श्लोक ला शीतल कडे सोपवल.

वनिता बाई आत आल्या होत्या. त्यांनी ग्लास मध्ये त्यांच्या साठी दुध ओतलं. त्यांना साय आवडत नाही दूधात तर त्यासाठी गाळण वापरल. ते तसचं ओट्या वर ठेवलं. दूध पातेल्यात बऱ्या पैकी भरलेलं होतं. तर ग्लास मध्ये ओत ताना ते थोड खाली सांडल होत. पातेल्या वरच झाकण काढून बाजुला ठेवलं होतं. ते तसचं ठेवून त्यांनी दुध ग्लास मध्ये ओतलं होत. ते त्या घेऊन गेल्या. नाहीतर श्लोक

" आजी मना गोष्ट सांग ना"

म्हणत त्यांना चिटकला असता. त्या भीतीने त्यांनी स्वतः साठी दूध घेणं पसंत केले. पण बाकीचा पसारा तसाच ठेवून त्या निघून गेल्या. शीतल दोन वर्षाच्या श्लोक कडे बघत होती. त्याला कप मधून दूध प्यायला लावत होती. इतक्यात रचिताचा फोन वाजला. ते बघायला ती किचन मधुन बाहेर गेली.

दूध पिऊन झाल्यावर श्लोकला झोप आली. काकूच्या खांद्यावर मान टेकवून तो झोपी गेला. शीतल त्याला कडे वर घेउन हॉल मध्ये चकरा मारत होती. समोर पसरलेला ओटा दिसत होता.
तिच्या मनात एक विचार आला.

मी जर श्र्लोक आणि सासू बाईंच्या साठी दूध काढून ठेवलं असत तर आता पर्यंत मी झोपायला गेली असती. हा गोडोबा लाडोबा पण त्याच्या आई वडिलांच्या सोबत झोपला असता. आणि ओटा पण असा पसरला नसता.

क्रमशः


🎭 Series Post

View all