Login

तिला ही स्वाभिमान आहे भाग३

तिला ही स्वाभिमान आहे भाग ३
हा गोडोबा लाडोबा पण त्याच्या आई वडिलांच्या सोबत झोपला असता. आणि ओटा पण असा पसरला नसता.

इतक्यात रचिता तिच फोन वरचं बोलणं संपवून आली. तिन पटकन किचन मधलं पसरलेल सामान आवरून ठेवलं. मग श्लोकला घेऊन झोपायला गेली. रचिता आणि शीतल दोघी चांगल्या मैत्रिणी असल्या प्रमाणे वागत. शीतल घर सांभाळत तर बाहेरची आघाडी रचिता सांभाळत होती. त्यांचं एकमेकींना मदत करण कुठं तरी वनिता बाईना खट कट होत.त्या नेहमी शीतल समोर रचिताच कौतुक करत.

ही गोष्ट रचिता आणि शीतल दोघींना माहित होती. दुसऱ्या दिवशी पासुन शीतलच रूटीन लाईफ सुरू झालं. सकाळीं उठल्या नंतर सगळ्यांचा चहा नाष्टा, या तिघांचे डबे. ऑफिस मध्ये जाणाऱ्या मंडळीचे वेगळे. मुलांचे वेगळे डबे. मधल्या सुट्टीत खाण्यासाठी कोरडा खाऊ. दररोज एक फळ. दोन भाज्या. हे सगळं करण्यात वेळ जाई.

तो पर्यंत मुलांना उठवून त्यांची शाळेची तयारी करून देणं. घरातील वरची कोरडी काम करून देण्याची जबाबदारी रचिता कडे असत. रेवा आणि वरद दोघांच्या अभ्यास आणि शाळेची तयारी याची जबाबदारी रचिताची असत.

त्या दोघी एकमेकींना सांभाळून घर गृहस्ती चालवत होत्या. सगळं काही सुरळीत चालु होत. एक दिवस वनिता बाईच्या कडे आत्या बाई आल्या होत्या. अचानक न सांगता आल्या होत्या. सोबत त्यांचे यजमान. वनिता बाई नी शीतलला त्यांच्या साठी कोथिंबिरीच्या वड्या करायला सांगितल्या. तिने पण केल्या. पण तिला त्या बनवण्यासाठी मदत केली नाही.

शिवाय त्या आत्या बाई समोर रचिता च कौतुक करत होत्या. वर एक विशेष टीपणी पण जोडत. शीतल काय घरीच असते. तिला काय काम असत. ऐशो आरामात राहते. शीतलला ते सगळ सहन होत नव्हत. पण मोठ्यांना उलटून बोलायचे संस्कार नव्हते तिचे. सासू बाईंच्या विशेष टीपणीचा तिला राग येत होता.

त्या आठवड्यात शनिवारी रचिताचे आई वडील तिला भेटायला आले होते. तर सासू बाईनी त्यांना घरी आलाच आहात तर जेवूनच जा असा आग्रह केला.

आधीच दुपारी त्यांची भिशी होती. त्यामुळे भिशी पार्टीला तीस बायका आल्या होत्या. त्यांच सगळ शीतल ने केलं होतं. सगळ्यांच्या साठी इडली सांबार चटणी शिवाय गोड म्हणून गुलाबजाम.
आता दिवस भर मुलांना सांभाळून हे एक्स्ट्रा चे काम म्हणजे तिच्या पायाचे तुकडे पडले असते. अजुन किमान दोन तास तरी तिला किचन मध्येच थांबावं लागणार होत.

आई बाबा आले हे समजल्या मुळे रचिता ऑफिस मधून लवकर घरी आली होती. तर सासू बाईनी तिला तिच्या आई वडिलांच्या सोबत बोलण्या साठी पाठवल. थोडा वेळ आई बाबान सोबत बोलून रचिता शीतलला मदत करायला किचन मध्ये गेली.
रात्री जेवण झाल्यावर तिचे आई वडील त्यांच्या घरी परत गेले.

आज शीतल पुन्हा एकदा नाराज झाली होती. तिला काम करण्याचं वाईट वाटतं नव्हत. जितकं तिला तिच्या सासू बाई येणाऱ्या जाणाऱ्या मंडळीचे समोर ती काय करते. घरीच असते. तिला काय काम असतात. छान राणी सारखी राहते. अस म्हणत असतात. त्याचं वाईट वाटतं होत.

" वहिनी तुम्ही पुन्हा आईंच्या बोलण्याचा विचार करत आहात." भांडी घासायला नेऊन ठेवत रचिताने विचारलं.

" नाही ग. आता तर सवय झाली आहे.त्यांच्या बोलण्याची. मी काय घरी राणी सारखी राहते. मला काय काम असत. मला कुठं बाहेर जाऊन पैसे कमावता येतात." खिन्न मनाने शितल म्हणाली.

" वहिनी स्वतः साठी स्वतः आवज उठवावा लागतो. नाहीतर सगळे आपला गैर फायदा घेतात."

" जाउ दे ग. मी तर विचार करणं सोडुन दिलं आहे." मायुस स्वरात शीतल म्हणाली.

" वहिनी आता या सगळ्यांना काही गोष्टीची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे." खांद्यावरची ओढणी एका बाजूला घेउन त्याला काठ मारत ती म्हणाली.

" अग माझी झाशीची राणी. काय ग काय झालं. इरादा काय आहे. कुठं लढायला जाणारं आहेस का काय ?" तिच्या त्या जोश संचारलेल्या अवताराकडे बघत शीतल ने हसुन विचारलं.

" लढाई नाही. उठाव करनार आहे. वहिनी इकडे या. कान करा इकडे."

अस म्हणून तिने शीतलच्या कानात काहीतरी सांगितल.

" काय..? " शितल एकदम ओरडली.

" वहिनी, शुक्.. हळू. ओरडू नका. गाव नाही गोळा करायचा आपल्याला ?" शीतलच्या तोंडावर हात ठेवून रचिता म्हणली.

" मला हे सगळं नाही जमणार."

" काय.. वहिनी प्लिज एकदा. माझ्यासाठी तरी करा. मी आहे तुमच्या सोबत."

तिचे दोन्हीं हात हातात घेउन रचिता शीतलला म्हणाली. त्या नंतर त्या दोघी झोपायला गेल्या.

रविवारी सकाळी

" शीतल ss.. अग ए शीतल. कुठं आहेस. अजुन झोपल्या आहेत का महाराणी " वनिता बाई किरकिऱ्या आवाजात म्हणाल्या.

" अरे प्रतिक, शीतल कुठं आहे? "

" आई मला नाही माहीत मी आता जॉगिंग करून येत आहे."

" सौरभ, रचिता कुठं आहे.?"

" आई रचिता तर कंपनीच्या ऑडिटच्या कामासाठी सकाळीच निघुन गेली." प्रतिक म्हणाला.

" काकु, आजी" अस म्हणत आतल्या खोलीतुन श्लोक दुडकत दुडकात चालत आला.

समोर काका आणि आजी बोलत होते तर हा पटकन पळत येऊन आजीच्या पायाला मिठी मारून उभा राहिला. आजीने पण त्याला उचलून कडे घेतल. त्याचे लाड केले.