तिला ही स्वाभिमान आहे भाग ५

तिला ही स्वाभिमान आणि भाग ५
" ते आज मला कामावर यायला जमणार नाही. हेच सांगायला फोन केला आहे."

" का ? काय झालं. आज का नाही जमणार तुला कामावर यायला ?"

" ते माझ अंग दुखत आहे. पायात पण गोळे येत आहे. चालता येत नाही. तर तो निरोप तेवढा शीतल वहिनींना दया." सुधा बाई म्हणाल्या.

" बरं सांगते शीतलला." अस म्हणत त्यांनी फोन ठेवला.

आता त्यांच्या राग सहन करण्याची क्षमता संपली होती. नातवंड तर मॅगी खाण्यात रमली होती. बाकिच्या मंडळींनी हा फोन ऐकला होता. पण कोणताही प्रश्न विचारून फटाक्याची वात लावण्याची हिंमत कोणा मध्येच नव्हती.

" आई मी मुलांना बघतो."अस म्हणत प्रतिक ने वरद आणि रेवा ची जबाबदारी उचलली.

" आई आज जेवण ऑर्डर करतो." सौरभ म्हणाला.

अस म्हणत त्याने श्र्लोकला दुध पिण्या साठी कप त्याच्या हातात पकडला. त्याला हळु हळू दुध पिण्या साठी सांगत होता. प्रतिक ने रेवा आणि वरद कडे लक्ष केंद्रित केले. त्यांच् खाणं पिणं झाल्यावर त्यांना घेउन त्यांची आंघोळ वगेरे करायचं होत.

सगळं आवरायचं होत. झोपेतून उठून तसेच बाहेर आले होते. त्यामुळे त्यांचा बेड वर आवरून ठेवायचा होता. पांघरूण घडी करून ठेवायचं होत. अभ्यास् वगेरे पण बघायचा होता. अस म्हणत त्याने स्वतःला बाकीचं काम यापासून वाचवलं.

दुपारी बाहेरून जेवण ऑर्डर केलं होतं. पण आज घराची साफ सफाई झाली नव्हती. भांडी तशीच ठेवली होती. चहा नाष्टा बनवला होता. तर किचन मध्ये वादळ येऊन गेल्या सारखं वाटतं होत. सिंक खरकट्या भांड्यांनी भरलेला होता. जेवणाच्या पार्सल चे डबे पिशव्या कागद तसेच टेबल वर पसरलेले होते.

दुपारी बाहेरच जेवण ऑर्डर केलं होतं. तर अशोक ना त्रास झाला होता. तर त्यांनी रात्री साधी खिचडी बनवायला सांगितली वनिता बाईना. तर सौरभ आणि प्रतिक ने पण आम्ही खिचडी खाणार हे सांगितल. तर मुलांना वरण भात खायचा होता.

आज दिवस भर शीतल घरात नव्हती. तर घर म्हणजे उतरकरू सारखं पसरल होत. मुलांनी तर पसारा घालुन ठेवला होता. आज तर मुलं पोटभर जेवली पण नव्हती. सौरभ आणि प्रतिक मुलांना सांभाळून थकून गेले होते. कधी एकदा शीतल परत येते. याचीच वाट बघत होते.

आज पहिल्यांदा समजलं होतं. शीतल घरी आहे म्हणून तो बाहेरची काम टेन्शन फ्री होऊन करू शकतो. ती घरात असते तर ती किती काम करते. काय काय काम करते. ते आज त्याला समजलं होत.

तो पैसे कमावून वस्तू आणून देतो. पण त्या वस्तूंचा वापर करून सुग्रास जेवण बनवण्याच कसब शीतल कडे आहे.

वॉशिंग मशिन कपडे धूत पण त्यांना सुकवून पुन्हा घडी करून कपाटात ठेवण्याचं काम शीतल करते.

घरात वरची काम करायला हेल्पिंग हॅण्ड आहे. पण ती काम सोडुन इतर छोटी छोटी काम पण असतात.

मुलांना सांभाळून घेणं हे सोप काम नाही. त्यांचा अभ्यास शाळा क्लास प्रॉजेक्ट हे सगळं काही दिसायला सोप वाटतं असल तरी प्रत्यक्षात अवघड काम आहे. मुलांचा अभ्यास घेताना त्यांना बाकिच्या गोष्टी साठी शिस्त लावावी लागते. कधी रागावून कधी प्रेमाने कधी समजावून सांगत खुप अलवार पणे परिस्थिती हाताळावी लागते.

रात्री उशीरा रचिता आणि शीतल दोघी एकत्र घरी आल्या. आधी तर वनिता बाई सकट सगळ्यांनी तिला खूप काही प्रश्न विचारले. त्यांची चिड व्यक्त केली.

" जा आता आलीच आहेस ना घरी तर सगळ्यांच्या साठी काहीतरी जेवायला कर. भुका लागल्या आहेत. बघितलंस माझी काय अवस्था झाली आहे. काम करून. त्यात या मुलांनी दिवस भर त्यांच्या पाठी पळवल आहे." वनिता बाई फणफणल्या.

" मी कोणतही काम करणार नाही आहे. रादर आज पासुन मी काहीचं काम करणार नाही आहे. मी जॉब जॉईन करणारं आहे." शितल म्हणाली.

" का काय गरज आहे जॉब करण्याची ?" प्रतिक म्हणाला.

" हा प्रश्र्न कोण विचारत आहे. तुम्ही.?. तुम्हीच तर म्हणता ना पैसै कमावण म्हणजे सर्व काही आहे."

" आणि आई तुम्ही तर कायमच म्हणता मला घरात काय काम असत. अगदी महाराणी सारखी राहते मी. बाहेर जाऊन पैसे कमावता आले पाहिजे.त्याच्या शिवाय पैशाची किंमत कशी समजणार ? "

" म्हणून तु दिवस भर बाहेर गेली होती. तु काय आम्हाला धडा शिकवत होती काय ?"  प्रतिक ने विचारलं.

" मी काय शिकवणार. मला कुठ काय समजत. ही तुमचीच वाक्य आहेत पती देव." शीतल म्हणाली.

" तुला पैसे कमवायचे आहेत ना तर जा कमव. तुला अस वाटतं ना तुझ्या शिवाय या घरात कोणाचं काय अडणार. तू विसरु नकोस. पैसे मोजून काम करण्यासाठी नोकर ठेवता येतात." प्रतिक म्हणाला.

" हो का ? पैसे मोजून नोकर ठेवता येतात. मग आज काय झालं. जरा डोळे उघडुन घर भर नजर फिरवून सांगा. पैसे मोजून काम करून घेता येतात."

घराची अवस्था बघून प्रतिकला कससं झालं. सगळं पसरेल होत घर. मुलांनी खेळणी तशीच टाकली होती पाणी प्यायलं तर उष्ट भांड तसचं कोपऱ्यात पडल होत. चहाचे कप तसेच पडले होते.

क्रमशः

🎭 Series Post

View all