तिला ही स्वाभिमान आहे भाग ६ (अंतिम भाग )

तिला ही स्वाभिमान आहे भाग ६( अंतिम भाग)
केर फरशी केली नव्हती. जेवण बनवलं नव्हत. भांडी घासायला पडली होती. तर त्यांचा ढीग तयार झाला होता. मुलांचा अभ्यास बघुन त्याचे डोळे मोठे झाले होते. त्यांचा अभ्यास करून घेणं त्याला प्रचंड अवघड काम वाटलं होतं.

नेहमी अंघोळ करून आल्यावर त्याला त्याच्या सगळ्या वस्तू बेड वर आयत्या मिळत. आज त्याला त्याची एक वस्तू जागेवर ठेवलेली मिळाली नव्हती.

शितलच्या प्रश्नाने त्याची मान खाली झुकली होती.

" आई बाबा दादा सौरभ आज वहिनी माझ्या सोबत होती. दिवस भर." रचिता म्हणाली.

" काय " प्रतिक म्हणाला.

" हो. वहिनींच् काम खुप चांगलं आहे. त्यांना एक्सपी रियन्स पण आहे. तर आमच्या सरांनी तिला जॉब ची ऑफर पण दिली आहे." रचिता म्हणाली.

आई दादा तुम्हीं वहिनीनां नेहमी त्या वर्किंग वुमन नाही. म्हणून हिणवत होता. आई तुम्ही तर घरात बाहेर नातेवाईक शेजारी वगेरे सगळ्यांच्या कडे माझं कौतुक करता तसचं वहिनींना नेहमी कमी लेखता.

तिला काय काम असत. अस म्हणता. आज एक दिवस वहिनी घरात नव्हत्या तर घराची अवस्था बघा. तुमची सगळ्यांची अवस्था बघा. आता मला सांगा घरात काय काम असतात.?" रचिता ने विचारलं.

" वहिनी घर सांभाळतात म्हणून आपण सगळे बिंधास्त बाहेरच काम करू शकतो. बाहेरच काम मर्यादित वेळा पुरत असत. पण घरातलं काम चोवीस तास सात दिवस चालूच असत.

पैसे देउन तुम्ही सगळ्या कामांना नोकर ठेवु शकता. पण त्यावेळी तुम्हाला त्यांच्या सोयी प्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं. प्रत्येक वेळी गरम गरम जेवण नाही कोण बनवून देणार. ती सवय सोडावी लागेल. कामवाल्या मावशी ज्या वेळीं येतील तेव्हाच तुम्हाला गरम जेवण खायला मिळेल. नाही तर थंड जेवण जेवाव लागेल. त्या तर त्यांच्या सोयी प्रमाणे येऊन काम करून जातील ना. !

त्यांना देखील महिन्यातून दोन सुट्टी हवी असते. पैशाचा मोबदला तर देतो आपण. पण घरची सून प्रेमाने आदराने सगळ काही करते त्याचं कौतुक नाही केलं जात."

" वहिनीच्या कामाला कधीच हल्क्यात घेऊ नका. आई. नाहीतर तुमची काम तुम्हाला स्वतः ची स्वतः करावी लागतील." रचिता म्हणाली.

" आई वहिनी आहेत म्हणून मी श्र्लोकला घरी ठेवून जॉब करू शकते. नाहीतर डे केअर मध्ये त्याला ठेवून मी जॉब करूच शकले नसते. सतत मन त्याच्या भोवती घुटमळल असत. श्र्लोकला जन्म मी दिला असला तरी त्याचं संगोपन वहिनी करतात. त्यांनी कधीच या तिन्ही मुलांन मध्ये फरक केला नाही."

" आई मी वर्किंग वूमन नाही. पण त्या पेक्षा कमी पण नाही. घर सांभाळणं हे सोप काम नाही. मी वर्किंग वूमन नाही म्हणूनच तुम्ही माझ्या आई वडीलांचा मान ठेवत नाही. हि गोष्ट मला समजत नाही असं नव्हत. पण जेंव्हा तुमच्या सुरात प्रतिक पण सूर मिळवु लागले तेव्हा ठरवल जॉब जॉईन करायचा. मला ही माझा स्वाभिमान आहे.आज त्यासाठी च गेले होते. आणि आज आता माझ्या हातात ऑफर लेटर पण आहे." शितल म्हणाली.

" आय एम सॉरी शीतल. आम्ही तुला गृहीत धरले. नेहमी म्हणालो घरात काय काम असत. पण खरं आहे रचिता म्हणते ते. तु घराची सगळी जबाबदारी एक हाती संभाळ ते म्हणून आम्ही बिन घोर आमची बाहेरची काम करू शकतो." प्रतिक ने माफी मागितली.

" खरं आहे शीतल. तू घरात आहेस म्हणुन घर सुरळीत चालु आहे. रचिता बरोबर बोलत आहे. ती घरातील आघाडी एक हाती सांभाळते म्हणून बाकीचे सगळे त्यांची काम बिनधास्त पणे करू शकतात. मला माफ कर. मी तुला खूपच गृहीत धरलं." वनिता बाई म्हणाल्या

" वहिनी रचिता खरचं आम्ही कधी या गोष्टीचा विचार केला नाही. घरात हेल्पिंग हॅण्ड आहे तर बाकी काय काम असत घरात. हि विचार सरणी खुप चुकीची आहे. घरातील स्त्री ची काम सतत चालु असतात. घड्याळाच्या काट्या प्रमाणे." सौरभ म्हणाला.

" शीतल आम्ही तुला तुझ्या कामात मदत करू."

" शीतल आम्हाला तुम्ही दोघी सूना अगदी सारख्या आहात. शीतल तुला जॉब जॉईन करायचा असेल तर तू करू शकते. आम्ही आमच्या कडून तुला आमच्या कडून होणारी मदत करू." अशोक म्हणाले.

" बाबा जॉब करण्यासाठी नाही मी हे केलं. मला कौतुकाची पण अपेक्षा नाही. पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागू देऊ नका. हि अपेक्षा आहे." शीतल म्हणाली.

" शीतल जॉब जॉईन करायचा का नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. त्यात माझा तुला सपोर्ट आहे." प्रतिक म्हणाला.

" या आनंदात आज आपण बाहेर जाऊ."रचिता म्हणली.

" नको त्या पेक्षा शीतल तु सगळ्यांच्या साठी मस्त पैकी कोल्ड कॉफी कर." सवई ने वनिता बाई म्हणाल्या. बाकीचे सगळे त्यांच्या कडे भुवया उंचावून बघत होते.

" सॉरी."

त्या सगळ्यांचे चेहरे पाहून निरागस आवाजात म्हणाल्या. आणि घर सगळ्यांच्या हसण्याने भरून गेल.

नंतर झालेला बदल

सौरभ मुलांना बस स्टॉप पर्यंत सोडवत. नंतर रचिताला तिच्या कंपनीत ड्रॉप करून पुढं त्याच्या ऑफीस मध्ये जात. लहान श्र्लोक सकाळीं आजोबांच्या सोबत मॉर्निंग वॉक करायला जात. प्रतिक साडे नऊ वाजता जात. तो सकाळीं मॉर्निंग वॉक करायला जात येताना दुध आणि भाजी घेऊन येत. शीतल ने जॉब जॉईन केला. पण आता तिच्या कामात घरातील इतर मंडळी मदत करत.

सकाळीं शीतल आणि रचिता दोघी घरची काम करून जात. तर वनिता बाई त्यांना घरची छोटी छोटी काम करायला मदत करत.

श्लोक ची प्रि स्कूल सूरू झाली होती. तर आजी आजोबांनी त्याची जबाबदारी घेतली होती. रेवा आणि वरद दोघांची शाळा सकाळीं साडे आठ ते दुपारी चार होती. त्यांना बस ने यायला पाच वाजत. साडे सहा पर्यन्त शीतल घरी येत. तो पर्यंत आजी आजोबा या तिघ नातवंडांना सांभाळत.

" वहिनी आज गाडी तुम्ही चालवा."

शीतलच्या डोक्यावर हेल्मेट ठेवत रचिता म्हणाली.

" अग मी कशी चालवू.?"

" वहिनी मी आहे ना." रचिता हसत हसत म्हणाली.

शीतल ने तिला घट्ट मिठी मारली. आज तिच्या पुढाकार घेण्या मुळे शीतल ने तिचा स्वाभिमान जपला होता. दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

©® वेदा

कॉमेंट मध्ये सांगा.


🎭 Series Post

View all