तिला मुरायला जरासा वेळ द्या ना..भाग 2

Tila murayal jarasa wel dya na
तिला मुरायला जरासा वेळ द्या ना..भाग 2

एक दिवस शिल्पी कॉलेजला गेलेली असताना आशिष घरी एकटाच होता, या संधीचा फायदा घेऊन सासू आशिषच्या खोलीत गेल्या.


"आशिष काय रे तुझी बायको स्वतःचीच मनमानी करत असते."

"आता काय केलंय तिने?"

"काय केलं, तू तिला सांगितलंस ना आईकडून सगळ शिकून घे, तर ती सगळं स्वतःच्याच मनाने करते. मला एकही काही विचारायला येत नाही. तिने मला विचारलं तर मी तिला सांगणार नाही का?"


"आई ती ओक्वॉर्ड होत असेल ग, तू एक पाऊल पुढे टाक ना, तू स्वतः जाऊन बोल ना तिला मी तुला छान शिकवते."

"हो, ती सून आहे या घरची मी सासू आहे, तिने माझ्याजवळ यायचं मी का तिच्याजवळ जायचं."


"ठीक आहे.."

"ती मोबाईल वरून बघून बघून काय काय पदार्थ बनवत असते."

"आई छान असतात पदार्थ."

"तू ही तिचीच बाजू घे."

"तिची बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये गं."

सासू नाक मुरडून खोलीतून निघून गेली.

शिल्पी कॉलेजमधून आल्यानंतर आशिष आणि शिल्पीमध्ये नॉर्मल बोलणं सुरू होतं. आशिषने तिला सहज विचारलं.


"काय मग शिल्पी आता सगळं बनवता येते ना तुला? जमतंय ना सगळं?"


"हो हो जमतंय."

"कॉलेज आणि घर दोन्हीही छान सांभाळतेस, कौतुक वाटतं तुझं."


"मी टाईम मॅनेज केला आहे. त्यामुळे सगळं जमतंय"

"काय ग आईकडून किती पदार्थ शिकलेस तू? काय शिकतेस की नाही."


"नाही अहो मला ना आईला विचारायला थोड ओक्वॉर्ड वाटतं, म्हणजे थोडी भीती पण वाटते म्हणून मी मोबाईल वरून बघून बघूनच पदार्थ बनवते. पण होत आहेत ना चांगले हळूहळू. मी बोलेल त्यांच्याशी म्हणजे शिकेल काही पारंपारिक पदार्थ सणावाराचे ते त्यांच्याकडूनच शिकणार आहे. हो पण त्याला थोडा वेळ लागेल तुला चालेल ना."

"अग मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तू कर. घर आणि कॉलेज हे दोन्ही गोष्टीत अड्जस्ट करतेस यातच सगळं आलं आणि मला त्याच्याबद्दल तुझं खरच खूप कौतुक आहे."

शिल्पीची एक्झाम तोंडावर आली म्हणून ती जास्तीत जास्त वेळ रूम मध्ये असायची. रूम मध्ये बसून अभ्यास करायची.
एक दिवस संध्याकाळी ती अभ्यास करत होती. संध्याकाळ झाली दिवा लावायचा आहे तिच्या लक्षातच आलं नाही.

आशिष घरी येताच

"तुझी बायको अजूनही खोलीतून बाहेर आली नाही आहे,
तिला सांगून ठेव हे असं काही चाललं नाही. दिवे लावणीच्या वेळेस ती तिच्या खोलीत बसलेली आहे." आशिष काही न बोलता तिथून निघून गेला.

क्रमशः

🎭 Series Post

View all