तिला मुरायला जरासा वेळ द्या ना..भाग 3 अंतिम
आशिष खोलीत गेला.
"अरे आलात तुम्ही, मी कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी."
"नाही नको मी बनवेल माझ्यासाठी, तू अभ्यास कर."
आशिषने दोन कप कॉफी बनवली, त्याने घेतली आणि तो शिल्पीसाठी खोलीत घेऊन गेला. सासूबाईला हे दिसलं आणि त्या त्याच्याकडे रागाने बघत होत्या.
हळूहळू दिवस सरकत होते, शिल्पीच लास्ट इयर संपलं. परीक्षा संपली.
आता तिने घरातल्या कामात राबावं अशी सासूची इच्छा होती. शिल्पी सगळं करायची पण तरी सासूबाई तिच्या छोट्या छोट्या चुका शोधायच्या आणि आशिषला जाऊन सांगायच्या.
आशिष ऐकायचा पण काहीच बोलायचा नाही. घरात वाद नको म्हणून तो त्याच्या आईला काही बोलत नव्हता.
आशिष ऐकायचा पण काहीच बोलायचा नाही. घरात वाद नको म्हणून तो त्याच्या आईला काही बोलत नव्हता.
एक दिवस मात्र आशिष संतापला आणि आईला धडधडा बोलला.
"आई काय प्रॉब्लेम आहे ग तुझा? मला सांग तिचं वय किती आहे? वीस बावीस वर्षाच्या सुनेकडून तू चाळीस पन्नास वर्षाच्या बाईसारखी अपेक्षा कशी काय ठेऊ शकतेस? आई तिला वेळ दे तिच्या अंगावर एका वेळी इतक्या जबाबदार येतील तर त्या पार पाडायला तिला वेळ लागेल की नाही? माहेरी बिनधास्त असलेली मुलगी जेव्हा सून बनून सासरी येते तेव्हा अचानक तिच्यावर जबाबदाऱ्या पडतात. जबाबदारीच्या ओझ्याखाली कधी कधी त्यांच्याकडून चुका होतात. आपणही थोडं समजून घ्यायला हवं ना? ती तिचं घर सोडून आपल्या घरी आली, नवीन घरी तिला ऍडजेस्ट करायला थोडा तर वेळ लागेल ना? मग आपण तिला समजून घ्यायला नको का?
कैरीचं लोणचं बनवल्यानंतर त्यालाही मुरायला वेळ लागतो आई.
कैरीचं लोणचं बनवल्यानंतर त्यालाही मुरायला वेळ लागतो आई.
तिने सगळ झटपट शिकावं अशी सासरच्या माणसांकडून अपेक्षा केली जाते."
त्यांचं बोलणं सुरू असताना त्याचे बाबा तिथे आले.
"आशिष तू त्या मुलीसाठी तुझ्या आईला बोलतोयस."
"बाबा मी कुणालाच काही बोलत नाहीये, सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. ती या घरची सून आहे म्हणून तुम्ही तुमच्या अपेक्षाच ओझं तिच्यावर लादू नका. तिलाही मुरायला जरासा वेळ द्या.
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा