Login

तिला समजून घेताना भाग ३(अंतिम भाग)

तिला समजुन घेताना भाग ३(अंतिम भाग)
" या बायकांचं लॉजिक हे हे वेगळंच असत.त्यांच्या बोलण्याचे अर्थ हे त्यांच्या सोयी नुसार बदलत असतात."

" म्हणजे काय हो ? "

अभि ने विचारलं. त्याला लोकांचे सल्ले ऐकून थोडी थोडी भीती वाटू लागली होती. बोलण्याचे अर्थ सोयी नुसार बदलतात ? हे काय नवीन प्रकरण आहे.

"  आता हेचं बघ हा, मी एकदा तिला भेटायला गेलो होतो. तेंव्हा त्यावेळी आमचं नुकतच लग्न ठरंल होत. मला कंपनी मध्ये अर्जेंट मीटिंग साठी थांबावं लागलं. नंतर एक जुना मित्र भेटला.तर त्याच्या सोबत पाच मिनिट थांबून बोललो.

खरं तर दोघांना ही वेळ नव्हता बोलायला.त्याचा फोन वाजला.नी आम्ही एकमेकांना बाय बाय केलं.या गडबडीत उशीर झाला.तर मला मूव्ही थेटरला पोचायला पंधरा मिनिट उशीर झाला. तर हिने ऐकवल होत.

तुम्हाला यायला पंधरा मिनिट उशीर झाला, अस होणारं होत तर आधी कळवायला काय झालं होतं.तर वाट पाहणं किती कठीण असतं ? असं विचारताना चेहरा असा काही केविलवाणा करायचा की आपल्याला वाटतं आपण किती मोठी चुक केली आहे."

" बापरे ! हे अस काही पण असतं ? " अभिजित ने विचारलं.

" हो असच असत. आता तू याचं गोष्टीची याचीच दुसरी बाजू बघ. तिला एकदा येता येता काहितरी काम करायला जायचं होत. तर ते काम झाल्यावर तिला तिची जुनी मैत्रिण भेटली. मग त्या दोघी पाच मिनिट बोलतं होत्या. म्हणून तिला उशिर झाला. अन् आपण काही कंप्लेंट केली तर त्या दुसऱ्या बाजूने बोलतात.

मला यायला उशीर झाला, तर मुलींना होतो असा उशीर ! आज मैत्रीण भेटली. मग ती तिच्या बद्दल सांगत होती. नंतर अजुन काही इतर मैत्रिणीचे हाल हवाल विचारण्यात वेळ लागतो.
किती काही विचारायच होत. पण आपण भेटणार होतो म्हणून तिने पाचच मिनिटात बोलणं आवरत घेतल. तुम्हाला काही समजत नाही. मुलींना उशीर होतोच."

" मग तिची वाट बघत तुम्ही थांबलात. तुमचा पुतळा झाला तरी चालेल. त्या कधी चुकतच नाहीत."

" हे सगळं असं असतं बघ अभिजित."

" अभी तुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ फुकट घालवता."

" खरं की काय ? "

" हो आपण कधी आपल्या मित्राला भेटायला गेलो, कोणत्या कामाला गेलो, तर ते काम तिच्या दृष्टीने फालतू, वेळ घालवणार असतं."

" जसं की,"

" आपण आपल्या नाते वाईक, जूने संबंधी यांना भेटायला गेलो, आणि त्या लोकांचे आणि तिचे तार जुळले नसतील तर ती लोक आणि त्यांना भेटणं, बोलणं वगेरे फालतू या कॅटेगरीत मोडत.

पण जर तिच्या बाबतीत अस काही असेल तर तिने त्यांना भेटणं , त्यांच्याशी बोलणं हे कम्पल्सरी असतं. मग तुम्हाला त्यांना भेटायची इच्छा असो अथवा नसो, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही पाहिजे."

"  हे म्हणजे ती जर कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं. आणि आपण भेटलो तर ते बिनकामी, फालतू, वेळ वाया घालवणार काम असतं ? "

" हो असच असतं. अर्थ हे त्यांच्या सोयी नुसार बदलत असतात."

" मुलींच्या सोबत वागताना बोलताना वेगवेगळे नियम असतात बरं."

" जसं की रस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर तुमच्याकडे एथिक्सच नाहीत ! तुम्ही तिचा हात धरण हे अनिवार्य असत. ते काय म्हणतात ना, "

" स्त्री दाक्षिण्य "

" हा हा तेच ते.. स्त्री दाक्षिण्य "

" आणि जर का चुकून तुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श करण्याची संधीच शोधत असता. "

" मग रस्ता पार करताना तिचा हात धरायचा का नाही धरायचा ? हे कसं समजणार ? " अभिजित ने विचारलं.

" ते परिस्थिती नुसार बदलत असत. आपण फक्त तिचा चेहरा बघून समजुन घ्यायचं . तुला म्हणून सांगतो, आता लग्नाला दहा वर्ष उलटून गेली आहेत तरी मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही." तो म्हणाला.

"  अभि तिच्या सोबत फिरायला जातांना अजुन एक गोष्ट लक्षात ठेवायचं. तिच लक्ष जरी आजू बाजूला काय चालु आहे या कडे असल तरी आपण काय बघत आहोत.हे तिला बरोबर समजत.तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट करता ! अस ती हमखास म्हणणारच." 

" तिच्या सोबत फिरत आहात. किंवा कोणत्या तरी प्रोग्रॅम मधे आहात.आणि तुमच्या लक्षात आलं तिच्या कडे कोणी तरी निरखून बघत आहे. तुम्ही तिला त्या बद्दल सांगितल. तर तिचं म्हणणं असतं,
दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो."

" तुम्ही कॅफे मध्ये कॉफी आणि स्नॅक्स एन्जॉय करत आहात.तुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं तिला वाटतं ! ती काहितरी तिच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार पण आपल्या मते कॉमन गोष्ट असणार का असेना , पण समोरच्याने मनात असो अथवा नसो तिचं म्हणणं लक्ष पूर्वक ऐकून घेणं गरजेचं असतं.

नाही तर परिमाण भोगावे लागतात. अरे ती बोलतं असताना तिचं आपण किती ऐकतो हे अधून मधून चेक करत असते. मध्येच एखादा प्रश्न विचारते. ज्याचं उत्तर दिलं नाही तर तिचा राग काढणं हे आपल्याच खिशाला भुर्दंड बसतो."

" हो बरोबर बोलत आहेस तु, या बायकांना आपण किती त्यांचं बोलणं ऐकतो आहोत ते बघण त्यांना आवश्यक वाटतं.त्या हमखास प्रश्न विचारणारच.  तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं तिला वाटतं. "

" हो बरोबर बोलत आहेस. मुलींना समजुन घेणं सर्वात अवघड काम असत ! "

" कदाचित त्या विधत्याला देखील ते जमलं नसेल."

" पण काहीही असल तरी एक गोष्ट पक्की,अशा या साध्या, नखरेल , नटखट, तरीही समजून घ्यायला कठीण अशा मुली. यांना समजून घेणं कितीही कठीण असलं, तरी हव्या हव्याशा अशा याच मुलीच का असतात हे मात्र कधीही न उलगडणार कोड आहे ! काय बरोबर बोलतं आहे ना ! "

समाप्त.

©® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पहिल्यांदा पुरुष तिला समजून घेताना काय विचार करतो ? त्याच्या मनातील प्रश्न यावर विनोदी लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास तुमचं मत नक्की सांगा. चुक असल्यास नजरेस आणुन दया.

तुम्हाला काय वाटतं तिला कसं समजुन घ्यायचं ?

तिला समजून घेणं हि कसरत असते का ?