तिला सहज घेऊ नकोस

Shaj Gheu Nkos
तिला सहजच घेऊ नका

ती....ए ऐक ना एक विचारायचे होते

तो..काय विचारणार आहेस आता तू ?

ती...नको विचारू तर राहिले.

तो..ठीक आहे नको विचारू .?

ती..किती रे तू वेडा ,मला म्हण ना काय विचारणार आहेस ?

तो..रोजचे असणार अजून काय !!

ती...पण मनात काय आहे ते ही जाणून घेणार नाहीस का तू!!

तो...हे बघ मला वेळ नाही , मी busy आहे तू उद्या बोल..!

ती..मी आतापर्यंत नशीबवान समजत होते की तुझ्यासारखा नवरा मिळाला मला म्हणून..

तो...आता हो emotional ,आणि रड.. आणि रुसून बस ,येत काय तुला दुसरे.

ती..नाही रडत मी,ना ही तुला इमोशनल करणार तुला ,ना रुसून बसणार मी कधी.

तो...छान !!

ती...किती कोडगा झाला आहेस तू अगदी.

तो...मला काम करू दे मग बोलू.

ती..मला कालपासून खूप चमक निघत आहे ,आणि मन ठीक नाही वाटत पण हिम्मत नाही झाली तुला सांगायची

तो..त्या गोळ्या घे आणि पड निवांत जरा ,ऍसिडिटी असेल होईल बरी

ती... मी गोळ्या ही घेतल्या आहे पण चमक मारत आहे ती आहेच..डाव्याबाजूला

तो..तू कमाल करतेस, तुला साधी चमक ही सहन होत नाही

ती..हृदयाशी निगडित असेल तर टेन्शन येते रे म्हणून म्हणते डॉक्टर कडे जाऊ का आपण..?

तो..मी कामात आहेत समजून घे ,हे साधे दुखणे ही सहन करत नाहीस तू

ती..मला खूप चमक निघते रे ,अगदी काही ही सहन होत नाही बघ तर

तो..जा तू ये जाऊन ,मी म्हणतो तसे डॉक्टर ही हेच सांगेन तुला मग विश्वास पटेन

ती न राहून एकटी जाते

दवाखान्यातून फोन येतो...तुमच्या मिसेस हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावल्या आहेत ,तुम्ही कृपया तातडीने दवाखान्यात या

त्याच्या हातातून आता फोन पडतो ,आणि त्याला आता कळते ती खरे सांगत होती आणि मी ऐकले नाही..तिला वेळ दिला नाहीच पण तिला काय होते हे वेळीच समजले असते तर ही वेळ आली नसती..

©®अनुराधा आंधळे पालवे