Login

तिला वेगळे नियम भाग २

तिला वेगळे नियम भाग २
माहेरी कोणताही कार्यक्रम असेल तर ती तिची सासरची काम करून मगच माहेरी जायची. सुनेच्या कर्तव्यात कसूर ठेवत नव्हती. माहेरी जरी गेली तरी त्या कार्यक्रमा पुरती जायची. नंतर घरी परत यायची. म्हणजे कोणाचीही गैर सोय व्हायची गरज नाही.

सुरवातीला तिच्या  माहेरी जाण्या बद्दल सुषमा बाईंना काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आता त्यांना सुनेचं वरचे वर माहेरी जाणं. मग ते कोणतही कारण असू दे. त्यांना तिचं माहेरी जाणं खटकत होतं.

आज काय आजीचा वाढदिवस आहे. आज काय आत्याच्या घरी पूजा आहे. आज काय भाचीला बक्षिस मिळालं म्हणून पार्टी आहे. आज काय भावाच प्रमोशन झालं म्हणून पार्टी आहे. एक से बढकर एक कारण.

आज पण स्वराली एका कार्य क्रामासाठी तिच्या माहेरी गेली होती. जातांना घरातील सगळी कामं पूर्ण केली होती. पण जेंव्हा ती सासू बाईंच्याकडे माहेरी जाण्याची परवानगी घेण्यासाठी आली तेव्हा मनात नसताना त्यांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी तर दिली. पण त्या नेहमी प्रमाणे तिला ऐक वायला विसरल्या नाहीत.

" स्वराली आता लग्न झालं आहे. तुझा पाय सासरी कमी आणि माहेरी जास्त राहायला लागला आहे. इतकं पण मोहजळात अडकण बरं नाही.

यावेळी जाण्याची परवानगी देत आहे. पण सारखं सारखं तुझं असं माहेरी जाणं मला पटतं नाही. तु आता जरा सासरी असल्याचं भान असू दे."

पण त्या बोलणार तरी किती. स्वरालीला जेव्हा कधी माहेरी जायचं असेल तेव्हा अमोल स्वतः तिला तिच्या माहेरी सोडून यायचा. आपलंच नाण अस आहे म्हणाल्यावर त्यांना देखील जास्त काही बोलता यायचं नाही.

आईनं कितीही बडबड केली तरी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अमोल तिला माहेरी सोडून मग त्याच्या ऑफिसला जायचा. स्वराली माहेरी जरी गेली तरी तीन चार तासांनी घरी परत यायची. संध्याकाळचा कार्यक्रम असेल तर अमोल ऑफीस मधून येताना तिला घेऊन यायचा.

आता घरात बसुन प्रिती आणि प्रतिक बटाटे वडे आणि चटणी एन्जॉय करत होते. समोर कोणती तरी सस्पेन्स वेब सीरिज चालु होती. सुषमा बाई किचन मध्ये वडे तळत होत्या.

संध्याकाळी स्वराली घरी आली तेव्हा ते दोघं वडे खाण्यात मग्न होते. स्वरालीला सोडायला तिचा भाऊ सौरभ आला होता. त्याला त्याच्या कोचिंग क्लासला जायचं होत.त्याच्या कोचिंग क्लास पासुन जवळच स्वरालीच सासर होत.

तर सौरभ तिला सोडायला आला होता. तो आत आला. प्रतीक आणि प्रिती त्याच्या पेक्षा पाच एक वर्षांनी मोठे होते. सौरभ आत आला. आल्यावर त्याने त्या दोघांना बघुन हॅलो केलं.

त्यांनी मानेंन हाय केलं. बाकी सगळं लक्ष तर टीव्ही आणि वडे खाण्यात ठेवलं होत. निदान तस् चित्र तरी नक्कीच उभ केल होत.

स्वराली घरात आल्यावर दोन मिनिट सोफ्यावर बसली होती. तोच वड्याची प्लेट घेऊन सुषमा बाई हॉल मध्ये आल्या. समोर बसलेल्या सौरभला बघून म्हणाल्या,

" अरे तु आलास का ! बर बर ये."

" आज काय तुझी ड्युटी का बहिणीला सासरी सोडण्याची ? नाहीतर म्हणलं हे काम नेहमी माझ्या मुलाचं असत ना ! सून बाईंना माहेरी नेण आणणं.
आज तु आलास बहिणीला सोडवायला. तर आश्र्चर्य वाटतं. म्हणून विचारलं. " चेहऱ्यावर बॉक्स टाईप स्माईल ठेवत सुषमा बाई म्हणल्या.

सौरभ तर त्यांच्या अशा तिरकस बोलण्याने गांगरून गेला. त्याला त्यांच्या बोलण्याला काय उत्तर द्यावं ते समजलं नाही. त्याने गोंधळलेल्या नजरेने स्वराली कडे बघितलं. सौरभ घरातील धाकटा मुलगा होता. तिच्या छोटया काकाचा मुलगा होता. आता तो बहिणीच्या सासरी आला होता. तिच्या सासू बाई असं काही बोलतं आहेत. तर त्यांना काय उत्तर द्यायचं. हे त्या बिचाऱ्याला समजत नव्हत. म्हणून आधारा साठी त्याने आपल्या ताई कडे बघितलं.

ते दोघ काही बोलणार त्या आधीच प्रतिक सौरभ कडे बघत म्हणाला,

" खरं आहे रे लोक म्हणतात ते बाबा ! हे नेहमीचे तमाशे बघता मी तर ठरवून टाकलं आहे. मी तर माझी बायको दुसऱ्या शहरातीलच करणारं. एकाच शहरात सासर आणि माहेर असं काही नकोच."

" आज काल माहेर जवळ असल की वरचे वर येणं जाणं होतच. कितीही छोट कारण पुरत माहेरी जाण्यासाठी. आज काय काकुच्या पोटात दुखत आहे. आज काय काकला सर्दी झाली आहे."

" खरं आहे रे लोक म्हणतात ते बाबा ! हे नेहमीचे तमाशे बघता मी तर ठरवून टाकलं आहे. मी तर माझी बायको दुसऱ्या शहरातीलच करणारं. एकाच शहरात सासर आणि माहेर असं काही नकोच."

" आज काल माहेर जवळ असल की वरचे वर येणं जाणं होतच. कितीही छोट कारण पुरत माहेरी जाण्यासाठी. आज काय काकुच्या पोटात दुखत आहे. आज काय काकला सर्दी झाली आहे."

" जरा काही निमित्त मिळालं काय सून चालली माहेरी."

" आता हेच बघ ना , सून बाई आली तरी देखील माझ्या आईलाच सगळी कामं करावी लागतात."

दोघं बहिण भावंडं बोलत होते. सोबतीला तोंडी लावायला गरम गरम बटाटे वडे आणि चटणी होती. अपमान करायला सौरभ आला होताच. त्या दोघांचं बोलणं ऐकून स्वरालीला राग येत होता. तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बघून ते सौरभच्या पण लक्षात येत होत. ते दोघं त्याचा अपमान करत आहेत. हे न कळण्या इतका तर तो लहान नव्हता ना !

" जाऊ दे रे प्रतीक. तु नको लक्ष देऊस. काय गोष्टी घेऊन बसला आहेस. सगळ्या लोकांना खरं बोलणं ऐकून घेणं जमत अस नाही ना ! खरं नेहमी कडू असतं. प्रत्येकाला रुचेल असं नसतं ना ! "

" अरे किती दिवसांनी सौरभ घरी आला आहे. निदान त्याला विचार तरी. त्याला काय खायचं आहे. निदान चहा पाणी तरी विचार की " प्रीती शिष्टाचार दाखवत म्हणाली.

स्वरालीलान आपल्या नणंद आणि दिराचं अस वागणं आवडलं नव्हत. त्यांच्या बोलण्या वागण्याचा तिला राग आला होता. इथलं अस वातावरण बघून सौरभला ताईची काळजी वाटतं होती. पण ताईने त्याला नजरेने धीर दिला होता.

आता त्याच्या कोचिंग क्लासला जाण्याची वेळ झाली होती. शिवाय स्वराली वर त्याचा पूर्ण विश्वास होता. इथ थांबणं योग्य नाही. तर त्याने सगळ्यांना नमस्कार करून जाण्याची परवानगी मागीतली. त्याच्या क्लास ची वेळ होत आली होती.

स्वराली त्याला सोडवायला बाहेर पर्यन्त आली होती. तर सौरभ ने तिला सर्वात आधी विचारलें,

" तायडे तुला सासरी काही त्रास तर नाही ना ? आई बाबांना पाठवू का तूझ्या सासू साऱ्यांशी बोलायला ? "