" अरे नाही रे काही त्रास वगेरे नाही."
" पण मग आता हे जे काही झालं . तू नजरेनं सांगितल म्हणून मी आत काही बोललो नाही."
" सौरभ तु टेन्शन नको घेऊ. तूझ्या स्टडी वर लक्ष दे. माझी काळजी नको करू."
" पण ताई आत."
" सौरभ माझ्या लेव्हल वर मी आधी हॅण्डल करते. नाही जमलं तर बघु. तु काळजी नको करू."
" बर."
" आणि हां सौरभ, हे बघ, आता आत जे काही झालं तर घरी कोणालाही सांगु नकोस. नाहीतर सगळ्यांना काळजी वाटेल."
" बरं. तु म्हणतेस म्हणून. पण तायडे काही टेन्शन असेल तर लगेचच सांगा हा."
" हो रे. मी चुकीची गोष्ट सहन नाही करणारं. विश्वास ठेव."
" आता जा क्लासला उशिर होईल."
सौरभला समजावून तिने त्याला पाठवून दिलं. नंतर ती घरात आली. ती हॉल मधुन तिच्या रुम मध्ये गेली. पण जाताना तिच्या कानांवर या माय लेकरांच बोलणं पडलच.
" आई चांगला शो दाखवला या लोकांना."
"ट्रेलर जर असा असेल तर पिक्चर कसा असेल ! "
" मग बघच आता मजा तू "
" ही ही ही."
अस सुषमा बाईं म्हणाल्या. नंतर ते तिघ हसले. त्यांचं अस हसणं तिच्या जिव्हारी लागल होत. आधीच सौरभ चा अपमान झालेला बघून मन नाराज झाल होत. दुखलं होत. राग अनावर होत होता.आताच हे माय लेकारांच बोलणं ऐकून तर रागात भरच पडली होती.
" हे असच चालु राहिल तर बघ एक दिवस मी तिच्या आई वडीलांना इथ बोलावून घेते का नाही. बघच तू." सुषमा बाई आपल्या लेकीला म्हणत होत्या
" लग्न झाल्यावर माहेरचा मोह कमी ठेवायचा असतो. आता लग्न झालं तर आपण एक सासुर वाशीण आहोत याचं किमान भान तरी ठेवायचं असत. हे देखील आजकालच्या मुलींना समजत नाही. सगळं काही शिकवावं लागतं. पण आज कालच्या मुलींना ते समजेल तेंव्हा ना ! " सुषमा बाईंनी स्वरालीला तिच्या रुम मध्ये जातांना बघून सुन वून घेतल.
हे सगळं ऐकून तर स्वरालीच्या रागाचा फुगा फुटला होता. तरी मनातल्या मनात दहा अंक मोजून तिने स्वतःला शांत केले. मग शांत पणे वळून त्या तिघांच्या समोर उभी राहिली. हातची घडी घालून तिने तिच्या नणंद कडे बघितल.
" प्रिती ताई तुम्हाला समजलं नाही का सासू बाई काय म्हणत आहेत. लग्न झाल्यावर सूनेन सासरी राहायचं असतं. सासुर वाशीण सासरी छान दिसते माहेरी नाही. लग्न झाल्यावर मुलीने माहेरचा मोह आवरायचा असतो."
" हे सगळं तुमच्या मातोश्री म्हणत आहेत. तरी देखील तुम्हाला समजलं नाही. सासुर वाशीण ने सासरी असायला हवं ! आणि तुम्ही अजुन इथ काय करत आहात ? इथ बसुन वडे काय खाताय. "
" तुम्ही पण माझ्या सारख्याच आहात का जिला काही समजत नाही अशा ? "
स्वरालीच्या अशा बोलण्यानं सगळ्यांना धक्काच बसला. सुषमा बाईंना आपल्या लेकीला कोणी काही बोलतं आहेत याचा राग आला. त्या झटकन उठून तिच्या कडे रागाने बघत तिला ओरडल्या. जरा मोठ्या आवाजात तिला म्हणाल्या,
" स्वराली तु काय बोलते ते समजत का नाही. जरा भान ठेव तु कोणाला बोलत आहेस याचं ! "
" खबरदार माझ्या मुलीला काही म्हणलीस तर ! " त्या तिच्या वर ओरडल्या.
" स्वतःला काही समजत नाही. कडे वागायचं कस बोलायचं याची अक्कल नाही. स्वतःच्या वागण्याचं बघ. उगीचच माझ्या मुलीला बोलायचं कारण नाही. तिला कशाला टार्गेट करते. लेकी बहिणीच माहेरी येणं जाणं चागलं दिसत." सुषमा बाई म्हणाल्या.
" हो का सासू बाई, प्रिती ताई तुमची मुलगी आहे तर ती माहेरी येते ते चांगलं आहे. मग माझं काय ? "
" मी पण कुणाची तरी लेक आहे. बहिण आहे. माझं माहेरी येणं जाणं कस काय चुकीचं दिसतं ? "
" माझं तर एकत्र कुटूंब आहे. सगळ्यांचे जवळचे नाते संबंध आहेत. त्यामुळे वरचे वर कार्यक्रम असतात. माझं सासर आणि माहेर एकाच शहरात आहे. त्यामुळे जाणं येणं तर होतच.
पण ताईंच तर छोट कुटूंब आहे. तरी देखील ताई वरचे वर येतात. दर आठ पंधरा दिवसांनी या कशा साठी माहेरी येतात ? " स्वराली ने विचारलं.
" अग बाई..! वहिनी अग काय बोलतं आहेस. तु कोणाशी बोलत आहेस याचं तरी भान असु दे. थांब तु आज दादा आला ना की त्याला सांगते तुझं वागणं. आईला कशी उलटून बोलतं आहेस ते . तोच तुला सरळ करेल." प्रिती चिडून म्हणाली.
" मोठयांशी कसं बोलायचं याचे संस्कार तरी आहेत का नाहीत ? हे कसलं निर्लज्ज पणे वागणं ! "
" माझे संस्कार, हुं. त्याच्या विषयी तर तुम्ही काही बोलूच नका ताई."
" निर्लज्ज कोणाला म्हणता ? माझे संस्कार काय काढता ? मला असं वागायला भाग कोणी पाडलं ? "
" जेव्हा कधी मी माहेरी जाते तेंव्हा सासू बाई एक चान्स सोडत नाहीत मला ऐकवण्याचा ! आज पर्यंत मी पण सगळं काही ऐकून घेतलं. कधी उलट उत्तर दिलं नाही. चुपचाप ऐकून घेतलं
कारण ते माझे संस्कार होते. पण तुम्ही तर माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावलात.
कारण ते माझे संस्कार होते. पण तुम्ही तर माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावलात.
आज तर माझ्या छोट्या भावला सून वायला पण कमी केलं नाहीत ? अशा वेळी माझ्या कडून काय अपेक्षा करता मी गप्प बसायला हवं ! "
" ते शक्य नाही. मी चुकीची गोष्ट कधीच खपवून घेणार नाही. तुम्हाला हौस आहे ना माझ्या आई वडीलांना इथे बोलावून घेण्याची तर खुशाल बोलवा. माझी काहीच हरकत नाही."
" पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझे आई वडील इथे येतील त्या दिवशी आपण तुमच्या सासू सासऱ्यांना देखील इथे बोलावून घेऊ.त्यांच्या समोरचं सगळी बोलणी करू."
" कसं आहे ना वन्स बाई, जरा त्यांचं हि म्हणणं समजुन घ्यायला हवं ना ! सासुर वाशीण ने कसं वागायला हवं. सुनेचे नियम हे लेकी साठी वेगळे आणि सुने साठी वेगळे असे थोडीच असतात ? त्यांना देखील हे सगळं समजायला हवंच ना ! "
" बरोबर बोलतं आहे ना मी सासू बाई. त्यांचं हि मत ऐकून घेणं गरजेचं आहे. सासुर वाशीण आणि मुलगी यांचे नियम काय असावे या बद्दल . " स्वराली सुषमा बाईंच्या नजरेला नजर देत ठणकावून म्हणाली.
त्या तिघांच्या प्रती क्रिये कडे दुर्लक्ष करत ती तिच्या रुम मध्ये निघून गेली. स्वरालीच असं वागणं त्यांना अपेक्षित नव्हत. त्यांचं बोलणं बंद झालं.
शेवटी बोलणार तरी काय ?
त्यांची लेकचं दर आठ पंधरा दिवसांनी माहेरी येत असायची. स्वराली कडे निदान माहेरी जाण्याचं निमित्त तरी होत. पण प्रिती !
ती तर सासरची काम टाळून आराम करायला माहेरी निघून येतं होती. या बाबतीत तिच्या सासू बाईंनी अनेक वेळा सुषमा बाईंच्या कडे तक्रार केली होती. पण सुषमा बाईंनी त्यांना आपल्या लेकीला कामाची सवय नाही सांगून वेळ मारून नेली होती. थोडक्यात लेकीला पाठीशी घातलं होतं.
प्रिती परवाच सांगत होती, तिच्या सासू बाई तिला तिच्या वहिनी कडून चार गोष्टी शिक म्हणत होत्या.
अशा परिस्थितीत जर स्वराली ने प्रितीच्या सासरच्या मंडळींना बोलवलं तर आपलंच पितळ उघडं पडेल. या भीतीने त्यांनी गप्प बसणं त्यांच्या हिताचं समजलं होतं.
त्यांची सुन तिच्या कर्तव्यात कसूर ठेवत नव्हती. त्यामुळे अमोल तिच्या पाठीशी उभा होता. त्यामुळे त्या त्याला बायकोच्या ताटा खालचं मांजर म्हणायच्या.
वहिनीच अस निर्लज्ज पणे बोलण्याने प्रिती चिडली होती. आपला मान आपल्या वहिनीने ठेवला नाही याचाच तिला राग आला होता.
तशीच अवस्था प्रतिकची झाली होती.
तशीच अवस्था प्रतिकची झाली होती.
पण तो थोडा शहाणा होता. त्याला प्रितीच्या सासरच्या लोकांची कल्पना होती. तो तिच्या सासरी गेला होता. ज्यावेळी तिच्या सासू बाईनी आईला तिच्या वागण्या बद्दल तक्रार करायला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याला चांगलीच कल्पना होती. प्रितीच्या सासरच्या मंडळींना इथ वहिनीच्या माहेरच्या लोकांन समोर बोलवलं तर काय घडू शकेल याची.
या माय लेकीच्या भांडणात न अडकता त्याने त्याचा मोबाइल उचलला आणि त्याची रूम गाठली.
प्रिती आई कडे वहिनीची तक्रार करत होती. तिच्या उलट बोलण्याचा राग आला होता. ते सांगत होती. पण सुषमा बाई काहीच बोलत नव्हत्या.
शेवटी बोलणार तरी काय , आपलंच नाणं अस आहे म्हणल्या वर !
स्वराली ने चुकीचा प्रश्र्न तर नव्हता ना विचारला ,
सासुर वाशिणींचे नियम हे लग्न झालेल्या लेकीला आणि घरच्या सुनेला वेग वेगळे कसे असु शकतात ?
समाप्त.
©® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सासुर वाशिणींचे नियम हे लग्न झालेल्या लेकीला आणि घरच्या सुनेला वेग वेगळे कसे असु शकतात ?
तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा