चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन
जलद लेखन
"रोहिणी अगं हे कायं अजून कोशिंबीर केली नाहीस तू? शशांकराव यायची वेळ झाली, कधीही येतील ते. आता ते आल्यावर कोशिंबीर करणार आहेस का तू? एकतर जावईबापूंची फ्लाईट आहे ते नव्हतेच तयार जेवायला तरीही मी आग्रह धरला म्हणून तयार झाले, आता उशीर नको व्हायला अजून" मालती ताई आपल्या सूनबाईला बोलत होत्या.
" आई कोशिंबीर पाच मिनिटांत होईल.. सगळी तयारी झाली आहे. " रोहिणी तितक्याच शांत स्वरांत म्हणाली, पण मालती ताईंची बडबड चालूच होती, रोहिणीने मग दुर्लक्ष केले. ती तिचे काम करायला लागली.
आज मालती ताईंची कन्या निकिता तिच्या नवर्यासोबत घरी येणार होती. निकिताचा नवरा काही कामानिमित्त दुबईला जाणार होता त्यामुळे निकिता चांगली पंधरा - वीस दिवस आता इकडेच माहेरी राहणार होती म्हणून मालती ताई लेकीच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. खरंतर शशांक निकिताला माहेरी सोडण्यासाठीच येणार होता परंतु मालती ताईंच्या आग्रहामुळे तो जेवणासाठी तयार झाला होता. मालती ताईंनी आज स्वतःच्या जावयासाठी सगळा आवडीचा स्वयंपाक रोहिणीला करायला सांगितला.
खरंतर देसाई कुटुंबात येऊन रोहिणीला अगदी एक महिना देखील झाला नव्हता तरीही लग्नानंतर अगदी काही दिवसांतच तिने सगळी जबाबदारी घेतली होती घराची. आजही ती सकाळपासूनच कामात गुंतली होती. एक एक गोष्टी आठवणीने करत अगदी पंचपक्वान्नाचा तिने घाट घातला होता परंतु मालती ताईंची भुणभुण चालूच होती काही ना काही कारणाने. आत्ताही कोशिंबीर हे निमित्त ठरले होते. बाहेर मालती ताईंचे पती, रोहिणीचे सासरे सदानंद राव सगळे ऐकत होते शेवटी ते न रहावून बोललेच.
"अगं मालती रोहिणी करतेय ना सगळे जरा शांतता ठेव." यावर मालती ताई काही बोलणार इतक्यात दाराची बेल वाजली. मालती ताईंनी दार उघडले.
"आईss" म्हणतच निकिता आईच्या गळ्यात पडली तसे मालती ताईंनी तिला दूर केले आणि जावईबापूंचे स्वागत करायला सुरूवात केली.
"या शशांकराव आत या" शशांक आणि निकिता दोघेही घरात येतच होते इतक्यात रोहिणीने त्यांना थांबवले आणि तुकडा ओवाळून दोघांचे औक्षण केले.
"निकिता ताई, शशांक दादा आतमध्ये या आता" रोहिणीने हसतमुखाने दोघांनाही बोलावले.
"आई बघं तू विसरली पण माझी वहिनी ती नाही विसरली तुकडा ओवाळायचे "
"अगं मीच सांगितले होते हिला पण म्हटलं ही विसरली असेल आणि जावईबापूंंना उशीर नको व्हायला म्हणून" मालती ताई बोलल्या तशी रोहिणी गप्प बसली. या
महिन्याभरात तिला मालती ताईंचा स्वभाव चांगलाच कळून आला होता. जुजबी बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली आणि जेवणाची तयारी करू लागली. एक एक करत रोहिणीने सगळे डायनिंग टेबलवर मांडले.
महिन्याभरात तिला मालती ताईंचा स्वभाव चांगलाच कळून आला होता. जुजबी बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली आणि जेवणाची तयारी करू लागली. एक एक करत रोहिणीने सगळे डायनिंग टेबलवर मांडले.
" बापरे! वहिनी तुम्ही तर कमालच केली!" शशांक पंचपक्वान्न पाहत बोलला तशी रोहिणी हसली.
"वहिनी खरचं गं कमाल आहे तुझी. दादा कुठे आहे पण?" वहिनीचे कौतुक करतच निकिताने तिच्या भावाबद्दल विचारणा केली.
"आलोच मीss" रोहिणी काही बोलणार इतक्यात तिचा नवरा नितीन घरी आला. फ्रेश होऊन त्याने शशांक आणि निकिताची भेट घेतली. सर्वांनी अगदी जेवणाचा आस्वाद घेतला.
"वहिनी कायं मगं पुढचा कायं विचार तुमचा? ऑफिस जॉईन करणार ना की नाही?" जेवण झाल्यावर शशांकने विचारले.
"अहो जावईबापू आत्ताच तर लग्न झाले आहे आणि घरात एवढे सगळे सुख असताना ऑफिसला जायची कायं गरज?" शशांकच्या प्रश्नावर मालती ताईंनी उत्तर दिले. रोहिणीचा शांत चेहरा मात्र निकिताला अस्वस्थ करून गेला.
क्रमशः
©®ऋतुजा कुलकर्णी ✍️