Login

तिलाही तिचे मत आहे : भाग २

एका सुनेची व्यथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन

जेवणानंतर थोड्याफार गप्पा मारून शशांकने सर्वांचा निरोप घेतला. नितीन, निकिता दोघेही एअरपोर्टवर शशांकला सोडायला गेले होते. ते जेव्हा घरी परतले तेव्हा निकिताने पाहिले की तिची आई आणि वडील दोघेही टीव्ही पाहत आहेत.

"कायं गं फ्लाईट वेळेत आली ना?" मालती ताईंनी विचारले.

"हो आईss" असे म्हणतं निकिता स्वयंपाकघरात गेली तर रोहिणी नुकताच भांड्याचा ढीग आवरताना दिसली.

"अगं वहिनी राहू द्यायचे ना. तुला बोलले होते ना मी आपण दोघी मिळून करूयात म्हणून मगं का केले तू एकटीने?" निकिताने रोहिणीला जाब विचारला.

"अहो ताई तुम्ही आजच तर आला आहात आणि मी असताना तुम्ही काम करायचे कशाला? तुम्ही आराम करा."

"अगं वहिनी एकतर तू ना अरे तूरे कर मी तुला कितीवेळा म्हटले आहे. अगं लहान नणंद आहे मी तुझी आणि मला तर तुझ्या रूपात एक छान मैत्रीण मिळाली आहे असचं वाटतं." रोहिणी तरीही काहीच बोलत नाही हे पाहून निकिता पुन्हा म्हणते,


" वहिनी तू आई कायं म्हणेल हा विचार करतेयं का? अगं आईच मनावर नको घेऊ.. तू मला अरे तूरे करायचं आणि चल आता आराम करायला " निकिताने रोहिणीला ओढतच हॉलमध्ये आणले. सर्वजण तिथे गप्पा मारत बसले होते. रोहिणी आणि निकिता ही त्या गप्पांमध्ये सामील झाल्या.

खूप दिवसानंतर लेक माहेरी रहायला आल्यामुळे मालती ताईंसोबत, सदानंद राव, नितीन अगदी आनंदी होते. रोहिणी देखील अगदी मनापासून तिच्या नणंदेची काळजी घेत होती. रोज तिच्या आवडीनिवडी जपत होती. त्या दिवशी रात्री रोहिणी जेवण बनवत होती तेव्हा स्वयंपाकघरात येऊन मालती ताई सारखं तिला मध्ये मध्ये येऊन सुचना देत होत्या. निकिता रोजच हे पाहत होती. शेवटी न रहावून ती बोललीच,

"अगं आई वहिनीला स्वयंपाक येतो.. तू तिला तिच्या पद्धतीने करू दे ना. ती फार शांत आहे बोलतं नाही तुला उलट काहीच पण तिला त्रास होत असेल गं तुझ्या बोलण्याचा." निकिता रोहिणीची बाजू घेते तसा मालती ताईंचा रागाचा पारा चढतो.

"मी तिला स्वयंपाक येत नाही असं नाही म्हटलं हो.. मी आपली अनुभवाने चार गोष्टी सांगते.. तेल, तिखटाचे प्रमाण इतकच. " एवढ बोलून त्या तिथून निघून जातात.

" निकिता अगं तू आईंना का बोललीस? "

" अगं वहिनी मी रोज पाहतेय ना आई काही ना काही सांगत असते.. किंवा दादाला हेच हवं तेच हवं..अगं मान्य आहे आईला इतके वर्ष केल्यामुळे माहित आहे सगळे पण तू सुद्धा हळूहळू शिकशील. " निकिताचे बोलणे ऐकून रोहिणीचा उर भरून येतो ती मिठी मारते निकिताला."

"रोहिणी, निकिता कुठे आहात?" रोहिणी निकिताला काही बोलणार इतक्यात नितीनचा मोठ्याने आवाज ऐकू येतो तशा दोघीही लगबगीने स्वयंपाकघरातून हॉलमध्ये येतात.