चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद लेखन
जलद लेखन
"नितीन कायं झालं अरे?" निकिता घाईघाईत विचारते.
"हो ना नितीन बोल बाबा पट्कन.. तुझा आवाज ऐकून जीव खाली वर झाला नुसता."
मालती ताई बोलतात.
मालती ताई बोलतात.
"होs सांगतो.. अगं कंपनीच्या ज्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होतो ते आम्हाला मिळाले आहे आणि आता दोन दिवस आम्हाला ऑफिसकडून महाबळेश्वर येथे जायचे आहे सेमिनार आणि पार्टीसाठी. " नितीनचे बोलणे ऐकून सर्वांच्या चेहर्यावर हसू फुलतं.
" व्वा.. अभिनंदन नितीन.. तुझी मेहनत पाहत होतो आम्ही त्या प्रोजेक्टसाठी.. आज त्या मेहनतीचं फळ तुला मिळालं. " सदानंद आपल्या मुलाला उराशी कवटाळून घेत अभिमानाने बोलतात.
मालती ताई, निकिता आणि रोहिणी देखील नितीनचे कौतुक करतात.
"ए दादा आता पार्टी पाहिजेss" निकिता जोरात ओरडते.
"ए दादा आता पार्टी पाहिजेss" निकिता जोरात ओरडते.
"लग्न झालं तरी तुझ्यात काही सुधारणा नाहीss" नितीन निकिताची थट्टा करतो तसे सर्वजण हसायला लागतात.
"झाली तेवढी खूप आहे सुधारणा बाकी मी नाही बदलणार बुवा! तू विषय नको बदलू पार्टी कधी देतोय बोल"
"मी महाबळेश्वरला जाऊन आलो की" नितीनचे उत्तर ऐकून निकिता हिरमुसते.
"हे कायं रे दादा?"
"अगं मला उद्याच निघायचे आहे म्हणून म्हटलं आल्यावर"
"कायं उद्याच?" निकिता नितीनचे बोलणे ऐकून ओरडते.
" हो ना अगं उद्या संध्याकाळी निघायचे आहे शिवाय मी विचार करत होतो की रोहिणीला सोबत घेऊन जावे कारण तिकडे फारसं अस काम नाही असेही लग्नानंतर तिला फार कुठे घेऊन गेलोच नाही " नितीन रोहिणीकडे पाहून बोलतो तसा तिचा चेहरा खुलतो, हे निकिताच्या नजरेतून सुटत नाही.
"व्वा! भारी ना दादा.. चालेल तुम्ही जाऊन या मगं आपण पार्टी करू " निकिता बोलते तेव्हा मालती ताईंच्या चेहर्यावरचा रंग उडतो.
"नितीन मी कायं म्हणते, रोहिणीला न्यायलाच हवे का? अरे म्हणजे निकिता आता पुढच्या आठवड्यात जाणार आहे मग तुम्ही जा ना कुठे जायचे तिथे आत्ता नको आणि रोहिणीला देखील निकिता सोबत रहायचेच असेल. तिला बोअर होईल तिकडे असेही तू कामाला गेल्यावर मला माहित आहे. तुम्ही नंतर जा आत्ता निकिता आहे असेही परत परत ती थोडीच येणार आहे " मालती ताई रोहिणीच्या मनाचा विचार न करता बोलून मोकळ्या झाल्या.
" हो आई निकिता आहे, ती परत थोडीच येणार " नितीनने देखील आईची री ओढली तेव्हा निकिता खूपच चिडली.
क्रमशः
©®ऋतुजा कुलकर्णी ✍️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा