Login

वेळेची महती

वेळेचे महत्त्व


वेळेने वेळेवर
सर्व काही दिले
होते जे माझे
ते माझ्याजवळीच उरले

नव्हते जे माझे
ते वेळेने परत घेतले
उगाच नसत्या मोहात पाडून
वेळेने वेळेत सावरले

वेळच शिकवते
वेळच घडविते
नव्या नव्या आव्हानांना
वेळच घेऊन येते

वेळच आपला गुरू
अन वेळच आपला शत्रू
वेळेला पाहून
वेळेने शिकविले

वेळेवर घडले
ते योग्य ठरवते
अवेळी कामाचा
धिंगाणा घालून ठेवते

वेळेवर वेळेने
स्वतः ची ओळख करून दिली
नव्या नव्या या
आधुनिकतेच्या जगात
वेळेवर जगणाऱ्याची
किंमत वेळेनेच केली.