Login

तिमिरातून तेजाकडे

किल्ल्याची माहिती
लघुकथा लेखनस्पर्धा

विषय : तिमिरातून तेजाकडे

नुकताच परीक्षेचा मोसम संपवून काणे कुटुंबीय खास दिवाळीसाठी आपल्या गावाला म्हणजे कोकणातील आजरा गावी आले. गाव तळ कोकणात असल्याने तिथे फार सोयीसुविधा नव्हत्या.

बरेच वर्षानंतर सागर मुलाबाळांसह आपल्या गावी दिवाळीला आला होता. तो आल्या मुळे आईला तर आकाश ठिंगण वाटायला लागलं होतं. तीला मुलासाठी, सुनेसाठी, नातवांसाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं.

सागर नेहमीप्रमाणे आईला आवाज देतच घरात आला. पण आईने त्याला आणि सगळ्यांना दारातच उभं केलं. हे बघून समीर आणि सायली एकमेकांनकडे पाहू लागले. पण आजी हातात पोळीचा तुकडा घेऊन त्यांच्यावरून उतरवून टाकला मग सगळ्यांना घरात घेतलं. हे बघून सायलीला प्रश्न पडले होते पण तिने काही विचारले नाही.

दुपारी आजी सर्व नातवडांना घेऊन पोफळीच्या बागेत बसली होती. समीर आणि सायली निरीक्षण करत करत आजीच्या आवतीभोवती फिरत होते. मध्येच आजीला प्रश्न विचारणे चालूच होते. तेवढ्यात आजीच्या मोठ्या नातवाने म्हणजे श्रीराम ने आजीला प्रश्न विचारला,

" काय ग आजी आपण दर दिवाळीला किल्ला करतो? खूप साऱ्या पणत्या लावतो. हे कश्यासाठी करतो ग ?"

समीर म्हणाला, " हो ना ,त्या चिखलात हात घालायचा शी. त्यापेक्षा मोबाईल वर गेम्स खेळत बसायचं. हो की नाही सायली?"

" हो ना.अगदी बरोबर."

" श्रीकांत म्हणाला, " काय बरोबर. किल्ला करण्यात मज्जा आहे ती तुम्हाला कशी कळणार "

" काय मज्जा असते सांग बरं ?"

यांच्यात वाद वाढायला नको म्हणून आजीच मध्ये म्हणाली, " सायली, समीर आपण किल्ला ना का करायचं हा प्रश्न आहे ना तुमचा?" यावर दोघांनी माना हालवल्या.

पुढे आजी म्हणाली, " आपल्या शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकून आपलं स्वतंत्र राष्ट्र बनवलं . मग आपण त्यांची आठवण म्हणून किल्ला बनवतो. हे साधं उत्तर पण खरं म्हणजे आपला शेतीप्रधान देश. हो ना ?"

यावर सगळ्यांनी जोरात हो हो ssss केले.

पुढे आजी म्हणाली, "आपल्या जन्मापासून या मातीशी जोडलेली आपली नाळं. या नाळेशी एकसंध राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ही किल्ला बनवयाची मोहिम चालू केली. असं मला वाटत. आता तुम्ही शेती नाही करू शकत मग मातीत अश्याप्रकारे खेळून तुम्हाला मातीबद्दल प्रेम उत्पन्न करण्याचा एक छोटा प्रयत्न. "

श्रीकांत म्हणाला, " आजी मातीत खेळायला इतकी मज्जा येते ना काय सांगू."

सायली म्हणाली, " खरचं मज्जा येते का रे ?"

तेवढ्यात आजीने विचारले, "तुम्हाला किल्ल्यांची नावे माहिती आहे?"

श्रीकांत म्हणाला, " राजगड, रायगड ,सिंहगड, तोरणा, एवढेच माहितीय मला "

समीर म्हणाला, " मला फक्त सिंहगड माहितीय."

यावर आजी म्हणाली, " आपण फक्त शिवजयंती ला पोवाडे गातो पण त्यांनी कोणते किल्ले सर केले. त्यांनी राज्य कसे विस्तारले हे आपल्याला माहितीच नाही. शिवाजी महाराज की जय म्हणून नाही चालत. त्यांच्या विषयी माहिती करून घेण्यासाठी हे किल्ले बनवायचे.

असही तुम्हाला सुट्टी च असते मग सुट्टीचा सदुपयोग होतो आणि किल्ला तयार करताना तो कसा करायचा याचे मार्गदर्शन तुम्हाला आपोआप मिळते जर तुम्ही किल्ल्यांनविषयी माहिती गोळा केली तर... "

"खरचं ग आजी तो शेजारचा गोटू आहे ना तो दरवर्षी वेगवेगळे किल्ले बनवतो. त्यासाठी तो उन्हाळा सुट्टी एका किल्ल्यावर जातो त्याची पहाणी करतो मग दिवाळीत तो किल्ला बनवतो. " श्रीकांत म्हणाला.

"समीर ,सायली हे सगळं तुमच्या मोबाईल गेम मध्ये आहे का?" आजी म्हणाली

"नाहीये" तोंड बारीक करून म्हणाले.

" मग आता उद्या करणार ना किल्ला मातीशी एकसंध राहण्यासाठी अन् किल्ल्यांची माहिती घेण्यासाठी ?"

आजीच्या या प्रश्नावर सगळ्या नातवांडांनी होकार दर्शविला आणि सायली म्हणाली, " किल्ला करतानाच्या मज्जेचा अनुभव घेणार बरं का श्रीकांत मी "

" हो घे की. चला आपण घरी जाऊन कोणता किल्ला बनवायचा याचं नियोजन करूया."

सायली उत्साहाने म्हणाली, " हो चलं चलं लवकर. "

खरोखरचं आजीने नातवंडांच्या मनात गप्पा मारता मारता मनातील अंधार दूर केला. तिमिरातून तेजाकडे एक वाटचाल होण्यास मदत केली.