मागील भागात आपण पाहिलं कि सुनिधी मृदुलाच्या घरी जाते, पण तिला संशय येतो कि खरच मृदुलाने आत्महत्या केली असावी का?? आता पाहूया पुढे,
ती पुन्हा त्याच खोलीत गेली. तिने बारकाईने पुन्हा एकदा तिथल्या भिंती, जमिन, दोरी, स्टूल सगळं काही नीट पाहिलं.पण तिला कुठेही घाई, गडबड,किंवा झटापट दिसत नव्हती. पण तरीही काहीतरी चुकत होतं.
तिने पोलिसांना सांगायचा प्रयत्न केला,पण त्यांचं उत्तर ठरलेलं होतं
“आत्महत्येचीच केस आहे मॅडम, तुम्ही उगाच जास्त विचार करत आहात.”
त्यावर सुनिधी गप्प झाली. कारण तिच्याकडे पुरावा नव्हता.तिला फक्त शंका आलेली आणि शंका कधीच पुरेशी नसते.
सुनिधी गप्प बसली नाही. तिने पोलिसांना
त्या मुलाचे आणि तिच्या मैत्रिणीचे फोटो दाखवले. त्यात दोघे एकत्र हसताना, फिरताना दिसत होते. पोलिसांनी फोटो पाहिले.पण त्यातून काही निष्पन्न होत नव्हते.
“हे बघा, सर.. कदाचित ह्याला काही ठाऊक असेल किंवा त्याच्यामुळेच.....”
सुनिधी म्हणाली पण तिला मधेच अडवत पोलीस म्हणाले,
“मॅडम, नातं असणं गुन्हा नाही, आणि तुम्ही ह्याच्यावर गंभीर आरोप करत आहात.. तुम्हाला ठाऊक आहे ना.. ह्याचे परिणाम वाईट होतील.....जर तस काही नसेल तर... "
“अहो सर, तिने त्याच्यासाठी घरच्यांशी भांडण केलं होतं.
तुटल्यानंतर ती पूर्ण बदलली होती,”
ती म्हणाली.
तुटल्यानंतर ती पूर्ण बदलली होती,”
ती म्हणाली.
पोलिसांनी चौकशी केली.त्या मुलाला बोलावलं गेलं.
तो खूप शांत होता, त्याला काहीच फरक पडलेला नव्हता..
तो खूप शांत होता, त्याला काहीच फरक पडलेला नव्हता..
“सर आमचं ब्रेकअप झालं होतं, दोघांच्या मर्जीने... काही दिवस आम्ही संपर्कात नव्हतो...आता तिने स्वतःच टोकाचं पाऊल का उचललं ह्या बद्दल मला ठाऊक नाही कि त्यांचीशी माझा काही संबंध नाही.”
तो म्हणाला, त्यावर सुनिधीला राग आला.पण तिच्याकडे पुरावा नव्हता. पोलिसांना देखील काहीच सापडलं नाही ना धमकीचा मेसेज,ना कॉल रेकॉर्ड,ना काही लिहिलेलं.
थोड्याच दिवसांत सगळं हळूहळू थंड पडलं. कारण त्या मुलाच्या वरच्या ओळखी होत्या. फोन झाले वरच्या शिफारशी झाल्या.फाइल तिथेच बंद पडली....व केस “क्लोज” करण्यात आला. फाईलवर लिहिलं गेलं
“आत्महत्या.कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही.”
सुनिधीच्या डोळ्यांत पाणी होतं, पण आवाज फुटत नव्हता. तिला कळून चुकलं होत, सत्य नेहमीच पुरेसं नसतं. पुरावा हवा असतो, ओळखी असतील,
तर प्रश्नही सुटतात.
तर प्रश्नही सुटतात.
आजही तो मुलगा मोकळा फिरतो आणि तिच्या मैत्रिणीचं नाव फक्त आईवडिलांच्या तोंडात असत.
लोक आजही म्हणतात...“तीने आत्महत्या केली म्हणे…”
पण सुनिधीच्या मनात आजही तोच प्रश्न आहे,
जर तिला त्या टोकापर्यंत ढकललं गेलं असेल,
तर तोही गुन्हाच नाही का?
तर तोही गुन्हाच नाही का?
आयुष्यात कधी कधी असं होतं की प्रेम तुटतं, विश्वास उडतो आणि सगळं जग आपल्या विरोधात उभं आहे
असं वाटू लागतं. त्या क्षणी मुलींनाही, मुलांनाही एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा क्षण कायमचा नसतो.
ज्यांच्यासाठी आपण जगतो, ज्यांच्याशी भांडतो.. ते आपल्याला हवे असतात मान्य आहे, पण त्यांनाच आपण नको असू तर मागे होणेच योग्य..त्यात ज्यांना आपण समजून घेत नाही ते म्हणजे आपले आईवडील
त्यांना आपल्याशिवाय काहीच महत्वाचे नसते.

आपण हरलो तर त्यांचं पूर्ण आयुष्य बदलत...
चूक झाली असेल, नातं तुटलं असेल,
समाज काय बोलेल याची भीती वाटत असेल
तरीही एक पाऊल मागे थांबा. कुणाशीही बोला.
रडा. मदत मागा.पण आयुष्य संपवणं हा काही उपाय नाही.आईवडिलांसाठी आपणच त्यांचं सगळं असतो.
कसलंही दुःख असो, टोकाचं पाऊल उचलू नका.
तुमचं आयुष्य अमूल्य आहे. त्या मुलाला किंवा मुलीला दुसरा पार्टनर मिळेल पण तुमच्या आईवडिलांच काय??? ह्याचा विचार एकदा नक्की करावा...

@हर्षला " सान्वी "
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा