Login

तिने आत्महत्या केली म्हणे.. भाग चार

सुनिधीला संशय येतो

मागील भागात आपण पाहिलं कि, मृदुलाचा एकदम कोंडमारा होतो. तिच्याजवळ मान मोकळ करण्यासाठी कोणच नसत.. आता पाहूया पुढे,

दुसऱ्या दिवशी सकाळी...ती खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर आली नाही... काळजी वाटली म्हणून आईने दरवाजा उघडला तेव्हा ती फॅनला लटकलेली होती...

पोलीस आले.....पंचनामा झाला. कोणी म्हणालं,
“आत्महत्या आहे.”

कोणी कुजबुजलं, “कोणीतरी तिला यासाठी भाग पाडलंय.. वाटतंय... आताच तर मुलगी डॉक्टर झालेली.. असं काय झालं असावं....”

आईवडील मात्र सुन्न झाले होते...त्यांच्या डोळ्यांत एकच प्रश्न होता, जर तिने सगळं सांगितलं असतं…
तर आज ती जिवंत असती???

पोलीस फाईलवर शेवटी लिहिलं गेलं,

“आत्महत्या… संशयास्पद परिस्थितीत.”

पण जे झालं होतं,ते कुणीच स्पष्ट करू शकत नव्हतं.

तीने स्वतःचा शेवट काय केला असावा?
की कोणाच्या शब्दांनी, दुर्लक्षाने, फसवणुकीने
तिला त्या टोकापर्यंत ढकललं?


कधीतरी सत्य असं पण असत काय?? कधी कधी माणूस मरत नाही…त्याला मारलं जातं.....हळूहळू.


स्वतःला सावरून सुनिधी तिच्या घरी पोहोचली तेव्हा घरात शांतता होती.लोक जमले होते,कोणी रडत होतं,कोणी कुजबुजत होतं. सुनिधीचं लक्ष मात्र
त्या खोलीकडे गेलं....जिथे सगळं घडलं होतं. ती नजर चुकवून आत गेली.

क्षणभर तिचं काळीज गोठल...तिची मैत्रीण तिथेच होती…अगदी निश्चल पडली.. तिचं दर्शन घेतलं.. आणि ती बाजूला झाली.... तिची नजर आपोआप
आजूबाजूला फिरली... तिला काहीतरी चुकीच जाणवत होत..आणि तेव्हाच...तिच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला....ती जास्त उंच नव्हती…मग तिने लटकून कसं घेतलं? सुनिधीने नीट पाहिलं....छताला दोरी होती,
पण खाली....टेबल ढकललेलं दिसत नव्हतं.खुर्चीही नव्हती.कि स्टूलही नव्हतं....खोलीत काहीच विस्कळीत नव्हतं...सगळं जसं होतं तसंच.

जर तिने स्वतः केलं असतं…तर काहीतरी हललेलं, ढकललेलं दिसायला हवं होतं ना?.सुनिधीचा संशय वाढत गेला.ती मृदुलाच्या आईजवळ गेली....“काकू तिच्या वागण्यात तुम्हाला काल काही बदल जाणवला का???"

सुनिधीने हळूच विचारलं.

तस आईने डोळे पुसत सांगितलं,
“काल रात्री तर अगदी शांत होती.आमच्यासाठी स्वयंपाक केला…आमचे पाय दाबून दिले... "

सुनिधी आणखीन गोंधळली.

मरणारां माणूस असं वागू शकतो काय??
तिच्या मनात विचार आला.... कदाचित हो...,


तिने पुन्हा आईला विचारलं,


" काकू तुम्ही पूर्ण वेळ घरातच होतात का? "

" नाही ग...., बाजूला कार्यक्रम होता... मग जेवून तिकडे गेलेलो.. आलो तेव्हा तिच्या रूमचा दरवाजा बंद होता... झोपली असेल म्हणून उठवलं नाही... सकाळी खूप वेळ बाहेर आली नाही म्हणून जाऊन बघितलं तर तिने असं केलेले... "


एवढं बोलून तिची आई अजून रडायला लागली....