"मावशी, कित्ती रडतोय हा? सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतलंय याने. पण आवाज अगदी खणखणीत आहे हं!" आनंदी बाई म्हणाल्या.
"अगं, रडणारच. बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो बाळांना. ते आपल्याला सांगतील कसं? मग रडण्याशिवाय ते तरी काय करणार? ते फॉर्म्युला दूध पाज त्याला. होईल शांत." मावशी म्हणाली.
दूध पाजून झाल्यावर बाळ शांत झोपलं.
दूध पाजून झाल्यावर बाळ शांत झोपलं.
"स्वीटू, झोप लागते का?"
"नाही. पाय खूप जड झालेत. पोट, कंबर सगळं अंग दुखतंय."
"दोन दिवस गेले की हळूहळू दुखायचं कमी येईल." मावशीने समजावलं.
"दोन दिवस गेले की हळूहळू दुखायचं कमी येईल." मावशीने समजावलं.
दुसऱ्या दिवशी अभिषेकची मित्रमंडळी बाळाला बघायला हॉस्पिटलमध्ये आली. त्यांचा गलका ऐकून बाळ रडायला लागलं. तशी नर्स म्हणाली, "बाळाला इन्फेक्शन होईल. इतक्या जणांनी त्याला हाताळायचं नाही. आईच्या कुशीत ठेवा त्याला. कोणी हात लावता कामा नये." हे ऐकून बाळाचे ओठ रुंदावले. आईच्या कुशीत गेल्यावर त्याचं रडणं थांबलं. जणू त्याला नर्सचं बोलणं कळालं होतं.
"बघितलं, कसा आगाऊ आहे तो! मावशी कौतुकाने म्हणाली.
पुढचं दोन दिवस पाहुणे -रावळे येतच राहिले. मग हॉस्पिटलने बाळांना बघायला येणाऱ्या पाहुण्यांची एक वेळच ठरवून टाकली.
पाचव्या दिवशी स्वीटीला घरी सोडलं. बाळाचे स्टिकर्स, फुगे लावून मस्त घर सजवलं होतं. आपल्या घरात बाळाचं छान स्वागत झालं. पाचवीची पूजाही झाली.
----------------------
पाचव्या दिवशी स्वीटीला घरी सोडलं. बाळाचे स्टिकर्स, फुगे लावून मस्त घर सजवलं होतं. आपल्या घरात बाळाचं छान स्वागत झालं. पाचवीची पूजाही झाली.
----------------------
बारावा दिवस उजाडला. घरात बारशाची तयारी सुरू होती. "नाव काय ठरवलंस?" इरावती आपल्या भावाला विचारत होती.
"मल्हार." तो तिच्या कानात हळूच म्हणाला. "आषाढी एकादशी दिवशी जन्माला आला ना तो म्हणून!"
"मग?" इरावतीला काही कनेक्शन लागेना.
"मल्हार वारी मोतियान.. ते गाणं नाहीय का?.." अभिषेक मस्करी करत म्हणाला.
"ए, काहीही. नको रे. जुनं वाटत नाही का नाव?"
"हल्ली तशीच फॅशन आहे. तुला हे नाव ठेवायचं तर ठेव. नाहीतर मी ठेवतो. त्यात काय इतकं?"
"नाहीतरी बाळाचं नाव त्याच्या बाबांनीच ठेवायचं असतं." मावशी म्हणाली.
अशा तऱ्हेने बारसं पार पडलं. बाळासाठी खेळणी, कपडे, पैसे अशा कितीतरी भेटवस्तू आल्या. "स्वीटू, पाळण्याला पाठ लाव नि हलकेच झोका दे." कोणीतरी म्हणालं. "म्हणजे पाळणा लांबतो म्हणतात. नाहीतर पुढच्या वर्षी लगेच दुसरा नंबर हजर होईल हं." यावर सगळेच हसले.

"आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं?" निहार हळूच इरावतीला म्हणाला.
"ए, गप रे." ती छान लाजून म्हणाली आणि स्वीटूने दोघांची चोरी पकडली.
बघता बघता दोन महिने उलटले. बाळ आता मोठं दिसायला लागलं. कधी कधी ते रात्री इतकं रडायचं की सगळ्यांची पळता भुई थोडी व्हायची. स्वीटी पॅनिक व्हायची तर कधी चक्क रडायची. पण आनंदी बाई खमक्या होत्या. त्या बाळाला जवळ घेऊन बसायच्या.
बाळ रडतंय म्हणून एक दिवस डॉक्टरकडे नेलं. ते म्हणाले," हे नॉर्मल आहे. बऱ्याचदा पोटात गॅस धरतो. त्यानेही मुलं रडतात. पण यासाठी कोणतेही अघोरी उपाय करायचे नाहीत." असं म्हणत त्यांनी काही औषधं लिहून दिली.
बाळ रडतंय म्हणून एक दिवस डॉक्टरकडे नेलं. ते म्हणाले," हे नॉर्मल आहे. बऱ्याचदा पोटात गॅस धरतो. त्यानेही मुलं रडतात. पण यासाठी कोणतेही अघोरी उपाय करायचे नाहीत." असं म्हणत त्यांनी काही औषधं लिहून दिली.
हळूहळू आई आणि बाळाचं रूटीन बसत होतं. घरातला प्रत्येक जण बाळाशी खेळायला उत्सुक होता. बाळ आईला सोडत नव्हता. आईचा स्पर्श हवा असायचा त्याला. एरवी नट्टापट्टा करून फिरणारी स्वीटी आता सतत बाळाची काळजी घेत होती. आई म्हणून वाढलेलं वजन अभिमानाने मिरवत होती. तिला बघून अभिषेक नेहमी म्हणे, "ही तर टिंगू नानाची करामत!"
"टिंगू नाना सारखं झोपतो काय?" अभिषेक तक्रार करू लागला.
"अरे, बाळं झोपतातच. तुम्हीही हेच करत होता." अभिषेकची आत्या म्हणाली. "उठला की कसा टुकूटुकू बघत असतो. आईला बरोबर ओळखतो. आताशी नजर स्थिर व्हायला लागली आहे. चेहरा, रंग बदलला आहे." आत्या कौतुकाने नातवाकडे पाहत होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा