अभिषेक हल्ली ऑफिसमधून लवकर यायचा. आल्या आल्या बाळाजवळ बसायचा. त्याचे कपडे, लंगोट बदलायलाही तो शिकला. रात्री मात्र बाळासोबत जागं राहणं त्याला अवघड वाटायचं.
सवय झाल्याने स्वीटी आता जागायची. बाळाला मांडीवर घेऊन झोपवायची. अंगाई गीत म्हणायची. बऱ्याचदा तिची चिडचिड व्हायची. आपल्याला बाळाचं काही करायला जमत नाही असं वाटायचं. पण आनंदी बाई नावाप्रमाणे आनंदी असल्याने आपल्या सुनेला धीर द्यायच्या, तिला शिकवायच्या.
सवय झाल्याने स्वीटी आता जागायची. बाळाला मांडीवर घेऊन झोपवायची. अंगाई गीत म्हणायची. बऱ्याचदा तिची चिडचिड व्हायची. आपल्याला बाळाचं काही करायला जमत नाही असं वाटायचं. पण आनंदी बाई नावाप्रमाणे आनंदी असल्याने आपल्या सुनेला धीर द्यायच्या, तिला शिकवायच्या.
सोबतीला अभिषेकच्या आत्या, मावशी होत्या. एरवी या दोघी घरात नुसत्या डोकावून जायच्या. पण बाळाच्या निमित्ताने त्यांचा मुक्काम वाढला होता. घराला घरपण आलं होतं. सारं घर हसत होतं, खेळत होतं. दंगा, मजामस्ती करत होतं. दिवस की रात्र! काही कळत नव्हतं. वेळ भराभर पळत होता. खरचं ही छोट्याशा टिंगू नानाची करामत होती.
"अभि, बाळाचं नाव ठेवलंय ना? मग सारखं टिंगू नाना काय म्हणतोस?" एक दिवस आत्या रागावली.
"अगं, टिंगू मी लाडाने म्हणतो आणि तो आपल्या नानांच्या सारखा दिसतो म्हणून टिंगूनाना." यावर अभिने आत्याचा एक फटका खाल्ला. "हळू गं, मारतेस काय मला?"
"तुला बाळ झालं असलं तरी आमच्यासाठी तू अजून लहानच आहेस."
----------------------------------------
----------------------------------------
चौथा महिना संपला आणि बाळ पालथं पडायला लागला. निरनिराळे आवाज काढायचा प्रयत्नही करत होता. आता त्याला वेगवेगळे आवाज आवडायला लागले. आई - बाबांचा आवाजही ओळखायला लागला. आजी -आजोबा समोर दिसले की हसायला लागला. वस्तू हातात पकडायला शिकला. जे हातात येईल ते तोंडात जाई. स्वीटी आई म्हणून बाळाच्या गमती -जमती रोज एन्जॉय करत होती.
पाचवा महिना सरला आणि बाळ थोडंसं पुढं सरकायला लागलं. आपली माणसं समोर दिसताच त्यांच्याकडे झेपावायला लागलं. स्वीटी आता घरातली कामं करत होती. बाळ आणि कामाची सांगड घालताना तिची दमछाक होत होती. आनंदी बाई मदतीला होत्याच.
इरावती एक उत्साही आत्या होती आणि निहार बडबड्या मामा होता. स्वीटीने एक दिवस दोघींची चोरी हळूच घरच्यांना संगितली. सुरुवातीला आनंदी बाई नाराज झाल्या. पण निहारमध्ये नावं ठेवण्यासारखं काही नव्हतं आणि बाळामुळे फारसा विचार करायला त्यांना फुरसत नव्हती. त्यांनी होकार दिला आणि लवकरच इरावती अन् निहारचा साखरपुडा पार पडला. दोघे फार खुश होते. " ही तर टिंगू नानाची करामत!" दोघं त्याला जवळ घेत एकदमच म्हणाले.
सहा महिने उलटले आणि स्वीटीची रजा संपली. कामावर हजर व्हायची वेळ आली आणि तिच्या पोटात खड्डा पडला. 'आपल्या बाळाला सोडून जायचं तरी कसं? तो रडला तर? माझ्याशिवाय खाणं -पिणं नीट होईल ना त्याचं? आईच्या आठवणीने तो व्याकूळ झाला तर? माझ्याविना तो राहील ना? आणि माझं तरी कामात लक्ष लागेल का?' असे अनेक प्रश्न तिच्या मनात दाटून आले.
आनंदी बाई म्हणाल्या, "मी आहे, तू काळजी करू नकोस. बघ, सुरुवातीला तू काही वेडावाकडा निर्णय घेतला असतास तर? हा आनंद तुला मिळाला असता? आईपण अनुभवता आलं असतं? नाही ना?"
"आई, चुकलं माझं." आपल्या सासुबाईंना पुन्हा एकदा आई म्हणताना स्वीटीला आईची किंमत कळाली होती. ती ऑफिसला गेली खरी. पण घरी येताना मात्र आणखी दोन महिन्याची सुट्टी टाकून आली.
आता पुढचे दोन महिने काळजीचं काही कारण नव्हतं. बाळ आपल्या डोळ्यासमोर मोठा होईल याचा मनसोक्त आनंद स्वीटूला घेता येणार होता. ती खूप खुश होती. त्यामुळे बाळही खुश होतं. या आनंदाची लहर पुन्हा एकदा घरभर पसरली. यावर सगळेच हसून म्हणाले, "ही तर टिंगु नानाची करामत!"
आता पुढचे दोन महिने काळजीचं काही कारण नव्हतं. बाळ आपल्या डोळ्यासमोर मोठा होईल याचा मनसोक्त आनंद स्वीटूला घेता येणार होता. ती खूप खुश होती. त्यामुळे बाळही खुश होतं. या आनंदाची लहर पुन्हा एकदा घरभर पसरली. यावर सगळेच हसून म्हणाले, "ही तर टिंगु नानाची करामत!"
बाळाच्या करामती अजून बाकी आहेत. बाळ मोठा होईल तशी त्यात भरच पडत जाणार. तुम्हाला तुमच्या बाळाचा काय, काय करामती आठवतात त्या नक्की कळवा.
समाप्त.
©️®️ सायली जोशी.
सदर कथा इतर कुठेही वापरू नये.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा