दुस्वास १
आज आशीषची महत्वाची मिटींग होती. आज बाॅसने सगळ्यांना अर्धा तास आधीच बोलावले होते. पण नेमकं आजच आशीषला वेळ झाला होता. उद्या कंपनीचे सीईओ येणार होते. सर्व तयारी झाली होती. सर्व फाईल्स रेडी होत्या. पण तरीही काही चुका व्हायला नको म्हणून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितले होते की वेळेच्या आधीच पोहोचा. कारण ते या कंपनीचे सर्वेसर्वा आहे.
"एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा सगळ्यांनी वेळ महत्वाची आहे. चला सगळे कामाला लागा. सगळ्यांना भरपूर टेन्शन आले होते. पण आशीषला जरा जास्तच. कारण त्याला कळले होते की आपले सीईओ म्हणजे एक लेडीज आहे.
आहे तर आहे. जरा ओव्हरस्मार्ट आहे म्हणे. जाऊ दे आपल्याला काय करायचे. आपण तर आपल्या कामात प्राॅम्ट आहोत. तरी एक लेडीज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफीसर असू शकते. यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. जर ती या खुर्चीवर बसली आहे तर ती किती स्मार्ट असेल, किती सुंदर असेल, किती फीट असेल. असे अनेक प्रश्न त्याच्या मनात डोकावत होते.
आहे तर आहे. जरा ओव्हरस्मार्ट आहे म्हणे. जाऊ दे आपल्याला काय करायचे. आपण तर आपल्या कामात प्राॅम्ट आहोत. तरी एक लेडीज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफीसर असू शकते. यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. जर ती या खुर्चीवर बसली आहे तर ती किती स्मार्ट असेल, किती सुंदर असेल, किती फीट असेल. असे अनेक प्रश्न त्याच्या मनात डोकावत होते.
कसाबसा धावत पळत तो ऑफीसला पोहोचला.
"अशीष, किती वेळ! अरे, माहिती आहे ना तुला . की उद्या आपल्या सीईओ येणार आहे. तू आज दहा मिनिटे लेट आला आहे. तर उद्या कसं करशील?"
"साॅरी सर, पण उद्या मी नक्की वेळेच्या आधीच येईल."
"ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्यावर कंपनीची बरीच मोठी जबाबदारी आहे. तेव्हा आपल्या कडून कोणतीही चूक व्हायला नको आहे. तुम्ही नताशा सोबत सगळ डिस्कस करा आणि काही प्राॅबलेम असल्यास मला कळवा."
"सर तुम्ही काळजी करू नका. मी तयार आहे. "
आशीषचे बाॅस मिस्टर विक्रम. कामाच्या बाबतीत थोडे कडक. पण तेवढेच मवाळ होते.
"मिस नताशा, तयार आहात ना." आशीष
"यस सर."
नताशा आणि आशीष एकाच कंपनीत काम करत होते. आशीष दिसायला स्मार्ट तर होताच. पण खूप हुशार सुध्दा आणि नताशा सुध्दा. नताशाला ऑफिस मध्ये येऊन फक्त दोन तीन वर्षे झाली होती. पण आशीष आणि नताशाचे खूप चांगले ट्यूनिंग जमले होते. कारण नताशा होतीच तशी. सुंदर, रेखीव डोळे, स्टेप कट केलेले केस, राहणीमान तर माॅडर्न, हाय हिल्स वापरणारी, शाॅट स्कर्ट घालणारी सुंदर परीच. जेव्हा नताशा पहिल्यांदाच ऑफीसला आली तेव्हाच आशीष तिच्या प्रेमात पडला.
हळुहळु त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले ते दोघांनाही कळलेच नाही. आशीष तर स्वतः चे लग्न झाले आहे आणि आपल्याला दोन मुलं सुध्दा आहे. याचा त्याला जणु विसरच पडला. दोघेही आकंठ प्रेमात बुडाले होते. आशीषला नताशा शिवाय दुसरं काहीच दिसत नव्हते. याचा परिणाम त्यांच्या संसारावर होऊ लागला. नताशालाही आशीषच्या मिठीत आनंद मिळू लागला. त्यामुळे आशीष रोज रात्री घरी उशीरा येऊ लागला. नताशा बरोबर रोज रात्री पार्टी, डान्स, हाॅटेलिंग करण्यात त्याचा वेळ जाऊ लागला.
"हे काय? आज परत कुठे निघाले?"
"तुला काय करायचंय. नको ना माझ्या भानगडीत पडू."
"अहो, सांगा तर." रात्रीचे नऊ वाजले होते.
आशीषचा आवाज ऐकून त्यांचे आईवडील बाहेर आले.
"अहो, जेवायच्या वेळेला असे कुठे निघून जाता. एक तर रात्री उशीरापर्यंत बाहेर राहता. माझी झोप मोड होते. तुमची सारखी वाट बघावी लागते. सकाळी उठायला उशीर होतो. हल्ली तुमच काय चाललंय कळतच नाही."
"काय झाले अवनी ?"
"काही नाही आई? तुम्ही चला जेवायला. यांना नेहमीप्रमाणे काम आहे. ते बाहेरच जेऊन येणार आहेत."
"आशीष तुझं काय चाललंय? घरी कमी आणि बाहेर जास्त वेळ राहतो. तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झाले आहे का?"
"आई, आधीच कामाचा लोड जास्त आहे. त्यात हिची सारखी किट किट चालू असते. आज हे आणा, उद्या ते आणा. एकतर हि मुलांमध्ये इतकी गुंतलेली असते की तिच्या जवळ माझ्यासाठी.... "
"बस आशीष. म्हणून तू सतत बाहेर राहणार का?"
"तू तुझ्या जबाबदारीपासून पळ काढतोस का?"
'पण बाबा. मलाही माझ आयुष्य आहे. जाऊ द्या. मला उद्या महत्वाची मिटींग आहे. तेव्हा एका मित्रासोबत महत्वाचे काम आहे. येतो मी."
"मित्र की मैत्रिण?!
आशीष अवनी कडे रागाने बघू लागतो.
"त्यात एवढं रागाने बघण्यासारखे काय आहे?"
आशीष मात्र काहीच न बोलता निघून जातो.
अवनीने डोळ्यातले पाणी पुसले आणि ताट वाढायला लागली. सगळ्यांची जेवणं आटोपली. आदेश आजोबांबरोबर झोपायला गेला आणि आकृतीला ती झोपवत होती. पण अवनीचे मन मात्र थाऱ्यावर नव्हते. आशीषचे वागणे हळुहळु तिच्या लक्षात येऊ लागले. आशीष तिला सतत टाळत होता. आपला नवरा सतत आपला दुस्वास करत आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती. पण का आणि कशासाठी? सगळ्यांसाठी सगळ करूनही आपलाच नवरा एवढा राग तिरस्कार कशासाठी करत आहे? अशी कोणती मोठी मी चूक केली असे?
पाहुया पुढे....
©®अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा