दुस्वास २
आशीष तिला सतत टाळत होता. आपला नवरा सतत  आपला दुस्वास करत आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती. पण का आणि कशासाठी? 
पाहुया पुढे....
अवनीचे डोळे पाणावले होते. मनात विचारांचे काहूर माजले होते. काय करावे सुचत नव्हते. तिच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. एक गोंडस मुलगा आणि एक गोड छोटीशी परी आपल्या आयुष्यात आहे. मुलीप्रमाणे प्रेम करणारे सासु सासरे आहे. मग आशीष आपल्या सोबत असे का वागतात. त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी तर...."
'छे! मी पण काय विचार करते?'
विचारांच्या तंद्रीत तिचा डोळा लागला. कधीतरी दारावरची बेल वाजली. पण झोपेच्या गुंगीत असल्याने तिला जाग आली नाही. मग आशीषने तिच्या मोबाईलवर फोन केला. दोन तीन वेळा रिंग गेल्यावर तिने फोन बघीतला. तर आशीषचा फोन होता. 
रात्रीचे दोन वाजत आले होते. 
"ए बाई दार उघडं ना. मला बाहेर ठेवायचा विचार आहे का ?"
"ए बाई दार उघडं ना. मला बाहेर ठेवायचा विचार आहे का ?"
तिने दार उघडले. 
त्याने मागचा पुढचा विचार न करता तिच्या गालफडात लगावली. 
अचानक झालेल्या फटाकाऱ्याने तिला काहीच सुचले नाही. 
" आई ग. ती क्षणार्धात खाली कोसळली. अहो, काय हे? मला का मारताय? "
तिच्या आवाजाने प्रकाशराव आणि मालतीबाई बाहेर आल्या. 
"काय झालं अवनी? का ओरडली आणि अशी खाली का बसली आहे?"
"काही नाही आई." म्हणत ती खोलीत निघून गेली.
"हे काय आशीष? तू तिला मारल का आणि परत  तू दारु पिऊन आला आहेस ?"
पण आशीष काहीही न बोलता खोलीत निघून जातो. 
"अहो, आशीषला काय झाल आहे ? अवनी सोबत कसा वागतो आहे?"
"जाऊ दे .आपण सकाळी बोलू या. चल झोपायला." प्रकाशराव आणि मालतीबाईं विचारात पडले.
अवनी एका सामान्य कुटुंबातील मुलगी. इंजिनीअरिंग करत असतांनाच तिला आशीषचे स्थळ सांगून आले. तिच्या आई वडिलांनी तिच्या साठी खूप स्वप्न पाहिली होती. लगेचच होकार मिळाला त्यामुळे शिक्षण पुर्ण होताच लग्न उरकले. 
अवनीच्या संसाराची सोपी वाटचाल सुरू होती. सुरुवातीचे दोन तीन वर्षे तिने नोकरी केली. सुरुवातीला सगळ काही  ठीकठाक होत. त्यानंतर तिला बाळाची चाहूल लागली. त्यामुळे तिने नोकरीतून एक ब्रेक घेतला होता. आशीषची सावली बनून आलेला आदेश हळुहळु मोठा होऊ लागला. तो चार वर्षांचा होताच की अवनीला पुन्हा डोहाळे लागले. पण ती यासाठी तयार नव्हती. 
पण डॉक्टरांनी ॲबार्शान करण्यासाठी मनाई केली आणि मग त्यांच्या जीवनात आली एक छोटीशी परी आकृती.  दोन मुलांची जबाबदारी आली. तशा मालतीताई आणि प्रकाशराव बराच हातभार लावत होते. पण तरीही  तिला मोकळा वेळ मिळतच नव्हता. आकृतीचा जन्म होताच  आदेशही आता मोठ्या दादासारखा वागू लागला. पण या सर्व अवस्थेतून जात असतांनाच अवनीचे मात्र स्वतः कडे दुर्लक्ष होऊ लागले. मुलांचे आवरणे, त्यांना न्हाऊ घातले, त्यांना खाऊ पिऊ घालणे, परत घरातील इतर कामे  यामुळे तिची फार धावपळ होत होती. तिची तब्येत जरा सुटलीच होती. जिन्स आणि टाॅपमध्ये फिरणारी अवनी हल्ली साडी घालत होती. आदेशचा जन्म झाल्यापासूनच तिचे राहणे बदलले. ती सतत आदेश मध्ये गुंतली होती. त्यामुळे दिवसभराचा आलेल्या थकव्यामुळे ती रात्री लवकर झोपत होती. कारण आदेश केव्हाही रडत असायचा. आता आदेश जरी  मोठा झाला असला तरी  आकृती मुळे सतत तिची झोपमोड व्हायची. अर्थातच आशीष आणि अवनी मध्ये दुरावा निर्माण झाला. फक्त मनानेच नव्हे तर शरिराने सुध्दा ते दूर झाले. याचाच परिणाम दोघांच्याही संसारावर होऊ लागला. आशीष सतत चिडचिड करत होता. तो अवनीशी नीट बोलत सुध्दा नव्हता.  
पण याचा परिणाम अवनीवर होऊ लागला. सतत आतल्या आत कुढत होती. नको नको ते विचार करत होती.
आज तर हद्दच पार केली होती. आशिषने हात उगारून मोठी चुक केली होती.  डोळ्यातून टपटप अश्रु वाहू लागले. एवढ्या रात्री लवकर उठली नाही, लवकर दार उघडले नाही म्हणून मारले. ही काय पद्धत आहे वागण्याची? इतका तिरस्कार कोणी करत का? तेही आपल्याच बायकोचा. जसं काही मी फार मोठा गुन्हा केला आहे. रडून रडून , विचार करून ती थकली होती. सकाळी जाग आली ते आकृतीच्या रडण्याने. 
"किती वाजले?  बापरे ! साडेसात.
आज जरा उशीरच झाला. असं म्हणत तिने आकृती साठी दूध गरम करून आणले आणि तिला मालतीताईंजवळ खेळायला सोडले. मग बाकीची कामे करायला लागली. आदेशाची शाळेची तयारी, त्याच्या साठी डबा केला . नंतर स्वयंपाकाच्या  तयारीला लागली. आशीषने आवाज दिला. पण तिने त्याला कसलाही प्रतिसाद दिला नाही. 
"काय ग ? तुला केव्हाचा आवाज देत आहे. कानात बोळे भरून ठेवले का? ऐकायला येत नाही का?"
तरीसुद्धा  तिने लक्ष दिले नाही. 
पाहुया पुढे...
©® अश्विनी मिश्रीकोटकर 
