Login

तिरस्काराचा शेवट गोड ४

जलदकथा
दुस्वास ४

"आशीष, बस कर आता. अरे, अवनीसारखी बायको तुला शोधून सापडणार नाही आणि तिच्या तब्येतीच म्हणशील तर ती एका लहान बाळाची आई आहे. हे विसरू नको. अरे, आकृती फक्त दीड वर्षांची आहे. आदेश सुध्दा लहानच आहे. अरे, मुलांचं करता करता दिवस निघून जातो तिचा. इकडे आकृतीचे कपडे बदलले की लगेच सू शी सुध्दा करते. ते आवरण्यासाठी तिचा बराचसा वेळ जातो. त्यामुळे ती व्यवस्थित तयार होऊ शकत नाही. ती दमते रे फार आणि साडी का घालते तर यावं उत्तर म्हणजे तिला बाळाला पाजतांना व्यवस्थितपणे पदर झाकता यावा म्हणून. अरे, कोणत्याही बाईला हौस नसते. उगाचच स्वतः च शरीर खराब करून घ्यायची. पण आई होण ही एक देणगी आहे. ती तुम्हा पुरूषांना नाही मिळाली. जगातलं सगळ सुख जरी समोर आलं ना तरी आईच सुख हे वेगळंच असतं. ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. तू तिचा तिरस्कार करतो, दुस्वास करतो. पण तिने जर आई होण्यासाठी नकार दिला असता तर तू सुध्दा बाप झाला नसता. तू आज जे तोंड मारत बाहेर फिरत आहे ना. एकदा विचार त्या नताशाला माझ्या बाळाची आई होशील का?"

"आई, काही काय बोलतेस?"

"बरोबर बोलत आहे आई. अरे, अवनीवर आमची सुध्दा जबाबदारी आहे. आला गेला पाहुणा तीच बघते. मुलांचे दुखणे खुपणे तिच बघते. तुला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचे असते म्हणून, नीट झोप यावी म्हणून, तुला मुलांच्या रडण्याचा, लाईटचा त्रास होऊ नये म्हणून ती आकृतीला बाहेर घेऊन बसते. आतापर्यंत तू कधी एक रात्र तरी जागलास का? तू तर कितीतरी रात्र त्या नताशा बरोबर घालवल्या आहे. यापुढे जर तू अवनीवर हात उचललास किंवा तिला काही वाईट बोललास तर याद राख."

"पण बाबा."

"अजूनही तुझे पण आहेच का?"

"हो कारण नताशावर माझे प्रेम आहे. ती माझ्या सोबत कोणत्याही परिस्थितीत राहायला तयार आहे."

"खरच, असं असेल तर तिला उद्या भेटायला घेऊन ये‌ ."

"बाबा, "

"अहो, काय झाल तुम्हाला ‌?"

प्रकाशराव काहीही बोलले नाही. पण आशीष मात्र मनातल्या मनात खूप आनंदी झाला होता. कधी एकदाचा दिवस उजाडतो कधी नाही. असे त्याला झाले होते.

दुसऱ्याच दिवशी सकाळी तो नताशाला घरी बोलावतो.

"ये नताशा,"

तिचे औपचारिक स्वागत केले जाते.

प्रकाशराव डायरेक्ट विषयाला हात घालतात.

"नताशा माझा मुलगा तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे तुझेही त्याच्यावर प्रेम आहे."

"हो अंकल. हे अगदी खर आहे."

"म्हणजे तू कोणत्याही परिस्थितीत त्याच्या सोबत राहू शकते."

"अंकल प्रेम हे माणूस पाहून होते. त्याची परिस्थिती नुसार नाही."

"आशीष थोडावेळ बाहेर जा. आम्ही नताशा सोबत बोलतो."

"बर ठीक आहे."

"बर, पण तुला आमच्या सोबत या घरात राहायचे असेल तर घरातली सगळी कामं करावी लागेल. आमच्याकडे कोणत्याही कामाला बाई नाही. आम्ही दोन वयस्कर मंडळी आहोत घरात. आमची कसल्याही प्रकारे मदत होणार नाही. शिवाय ही दोन छोटी मुले आहेत. त्यांचाही सगळ करावे‌ लागेल. सू ,शी त्यांचे कपडे , डबा वगेरे वगेरे....कारण आता अवनी परत नोकरी करणार आहे. त्यामुळे तुलाच सगळ बघावे लागेल.अजून एक आला गेला पै पाहुणा तुलाच बघावे लागेल."

"काय म्हणजे ? "

"हो . अवनी जे आतापर्यंत करत आहे. ती सगळी कामे नताशाला करावी लागणार."

"काय? घरातली एवढी सगळी कामे करून ऑफीसला जाऊ शकेल का खरच. नाही अंकल. आम्ही दोघे एखादे नवीन घर घेऊ आणि दोघेच जण राहू."

"नाही ते शक्य नाही. तुला आशीष सोबत लग्न करायचे असेल तर संपूर्ण घराची जबाबदारी तुला पार पाडावी लागेल. तरच हे लग्न आम्हाला मान्य आहे."

तेवढ्यात आशीष बाहेरून चक्कर मारून आला तर त्याच्या कानावर नताशाचे शब्द पडले.

"नाही अंकल मला या जबाबदारीत पडायचे नाही. मला फक्त आशीष हवा आहे. त्याची संपत्ती, प्राॅपर्टी यावर मला हक्क गाजवायचा आहे. आम्ही दोघे राजा राणी सारखे राहणार आहोत. मला हे लचांड मागे नको आहे. मला मुल बाळ, छे! यांचा तर जवळ जवळचा संबंध नाही. माझी झिरो फिगर मला खराब करून घ्यायची नाही. माझे सौंदर्य मला बिघडवायचे नाही. मला एवढा मोठा पगार आहे. माझं लाईफ असं मी वाया जाऊ देणार नाही अंकल. आशीष माझा फक्त एक बाॅयफ्रेंड आहे."

आशीष बाहेर आला होता. तो नताशाचे सगळ बोलणं ऐकत होता. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. की आता पर्यंत जी मुलगी आपल्या सोबत आनंदी होती. ती आता अचानक बदलली...

पाहुया पुढे ‌‌....