दुस्वास ५
अवनी आणि मालतीताई प्रकाशरावांकडे आणि अवनीकडे आश्चर्यकारक बघत होत्या. तेवढ्यात आशीष आत येतो.
"नताशा काय बोलत आहे. तू माझा वापर ...."
"आय मेट यू."
'आशीष, बेबी तू कधी आला. साॅरी आशीष. माझा उद्देश तुला हर्ट करायचा नव्हता."
"नताशा गेट आऊट फ्रॉम माय हाऊस अँड माय लाईफ."
"आशीष, प्लीज, आय ॲम साॅरी."
"रियली."
"यस रियली बेबी. नताशा तू जाऊ शकतेस."
"अंकल, आंटी प्लीज आशीषला सांगा ना. खरच माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. या तुझ्या चाईल्डची पण मी काळजी घेईल. मी मी.... आशीष प्लीज.... माझं एकदा घेऊन घ्या ना. अवनी तू तरी सांग ना."
पण अवनी तिच्या गालफडात लगावते.
"अग तू तर माझा संसार मोडायला निघाली होती आणि आशीषचा तुझ्यावर जास्त विश्वास होता. तुझ्यामुळे तो माझ्याशी खूप वाईट वागत होता. मारझोड करत होता. पण आज तुझा खरा चेहरा त्यांच्या समोर आला हे बरंच झालं. कोण खरं वागत होते आणि कोण खोटं हे तरी त्यांना कळलं. तो फक्त तुझ्या रुपालाच नाही तर तुझ्या राहणीमानाला भुलला. तुझ चालणं ,बोलण, कपडे त्यांना खूप आवडले. पण तुझ मन ओळखण्यात त्यांची चूक झाली. आज तुझ खर रूप त्याला कळलं. इतके दिवस तू त्याची दिशाभूल करत होती. पण आता नाही....."
नताशा सगळ्यांची हात जोडून पाया पडून माफी मागते. पण यावेळी आशीष तिचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढतो.
"साॅरी बाबा, साॅरी आई. मी यापुढे असं वागणार नाही. मी माझा संसार माझ्याच हाताने मोडायला निघालो होतो."
"अरे, तू फक्त आमचीच नाही तर तू अवनीची सुध्दा माफी माग."
"हो बाबा."
"अवनी, मला माफ कर. मी खरंच भरकटलो होतो. मी त्या नताशाच्या नादाला लागून तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. तुझा सतत दुस्वास करत राहीलो. तुला ओळखण्यात माझी मोठी चूक झाली.मी नवरा म्हणून एक बाप म्हणून वागण्यात चुकलो. हो, पण आता यापुढे असं होणार नाही. तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. मी आता लवकर घरी येत जाईल. तुला सुध्दा माझी मदत होईल. मुलांना सुध्दा माझे प्रेम मिळेल.'
"अहो, माफी मागू नका. तुम्हाला सत्य काय आहे. याची जाणीव झाली. हेच माझ्यासाठी खूप आहे. पण एक लक्षात ठेवा. विश्वासाची होळी जर झाली तर सत्य कितीही ओरडून सांगितले तर ते व्यर्थ ठरते.
अवनीने सुध्दा त्याला माफ केले. चुकीच्या मार्गाने गेलेला आशीष आता नव्याने अवनीकडे बघू लागला. तिला समजून घेऊ लागला. तिचं आईपण स्वतः अनुभवू लागला.
नकारात्मकतेचा एक प्रवास सकारात्मकडे झाला.
©® अश्विनी मिश्रीकोटकर