तिसरी माळ: देवी चंद्रघंटा
“या देवी सर्वभूतेषु माँ चंद्राघंटारुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”
आज नवरात्रीचा तिसरा दिवस. नवदुर्गेतले चंद्रघंटा देवी दुर्गेचे तिसरे रुप होय. मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र, दहा बाहू असलेल्या या देवीच्या हातात खड्ग व धनुष्यबाण शोभून दिसतात.
आजच्या युगातील आपल्याला चंद्रघंटा देवीची अनुभूती देणारी म्हणजे पॅरा तिरंदाज शीतलदेवी. तिच्या असामान्य खेळाने “जोर का झटका धीरे से लगे” म्हणत तिने जागतिक पातळीवर सर्वांना सुखद धक्का दिला. तिच्या खेळातील एकाग्रता, संयम व इच्छाशक्ति बघून डोळे दिपणार नाहीत असे अशक्य.
जन्मतः दोन्ही करांनी पाठ फिरवली पण, या रणरागिणीने दांत व पाय ह्यांनाच दहा हात मानून आपले लक्ष्य अचूकपणे साधले. चंद्रघंटा देवीप्रमाणे हिच्या दात व पायरूपी हातात धनुष्य व बाणाची जोडी ही नेहमी उंच भरारी घेणारी आहेत असे वाटते.
वय हे फक्त नंबर दर्शवणारे मोजमाप आहे हे शीतलदेवीने पॅरिसमधल्या पॅरालिम्पिकमध्ये मिळवलेल्या यशाने सार्थ केले. चंद्रघंटा देवीमधल्या कणखर बाणाचे तंतोतंत पालन करत, श्री राकेश कुमार यांच्या साथीने शीतलदेवीने कांस्य पदकाची मौल्यवान कमाई केली व भारतातील सर्वांत वयाने लहान पदक धारकाचे मालकत्व स्वतःकडे मिळवलं.
या १७ वर्षीय नवोदित व कीर्तिमान पॅरा तिरंदाजपटूला तिचं वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य धनुष्यासारखं अचूक व बाणासारखा भेदक रहो हीच प्रार्थना.
“ इच्छाशक्ती व उत्साह, बनेल तुमचे कर,
आणेल दहा हत्तींचे बळ, पदकांची होऊ दे लयलूट.”
आणेल दहा हत्तींचे बळ, पदकांची होऊ दे लयलूट.”
प्राजक्ता जोशी सुपेकर
०५|१०|२०२४
०५|१०|२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा