दुस्वास ३
"काय ग ? तुला केव्हाचा आवाज देत आहे. कानात बोळे भरून ठेवले का? ऐकायला येत नाही का?"
तरीसुद्धा अवनीने लक्ष दिले नाही.
पाहुया पुढे...
आशीष तिच्या जवळ आला. तिचे केस हातात पकडले.
"ए काय ग. जास्त मस्तीत आली आहे का? जा
माझ्यासाठी चहा नाश्ता आण. एकतर मला ऑफीसला लवकर जायचे आहे. त्यात तुझी नाटक चालली आहे काकूबाई."
माझ्यासाठी चहा नाश्ता आण. एकतर मला ऑफीसला लवकर जायचे आहे. त्यात तुझी नाटक चालली आहे काकूबाई."
"अहो, काय करता ? सोडा मला. "
"आशीष, काय चाललंय तुझं? तिच्याशी असं का वागतोस? सगळ्या मर्यादा ओलांडत चालला आहे ? नेमकं काय हवं आहे तिच्याकडून तुला? "
"बाबा, आज माझे कंपनीचे सीईओ येणार आहे. तेव्हा आत्ता मला बिलकुल वेळ नाही. मी आल्यावर बोलतो सगळ्यांशी."
"नाही, तू कुठेही जाणार नाही."
"बाबा, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे?"
अवनी सारख्या गुणी मुलीच्या आयुष्यात आगीची चिंगारी पेटवून दिली. तिचं आयुष्य पणाला लागले आहे आणि तुला वेळ नाही."
"बाबा, जाऊ द्या त्यांना. माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होता कामा नये."
"माझ्यासाठी कपभर चहा करायला वेळ नाही. आली मोठी सांगणारी." असे म्हणत तो घराच्या बाहेर पडला देखील.
"आई, बाबा तुम्ही काळजी नका करू. होईल त्यांचा राग शांत. आपण आपले काम करू या."
"देवा, आशीषला चांगली बुध्दी दे रे." मालतीबाई
नेमकं काय झाल आशीषला? आदेश होईपर्यंत तर सगळं ठीक होते. पण आकृतीच्या जन्मानंतर.... अवनीला एक एक मिनिट जड जात होता. काही केल्या दिवस जात नव्हता. आशीष रात्री आल्यावर काय सांगेल याचाच विचार ती करत होती. तिने पटापट कामे आवरली आणि आराम करायला गेली.
संध्याकाळचे चार वाजत आले. तेवढ्यात आशीषचा फोन आला. की आज आपल्या घरी नताशा सात वाजता जेवायला येत आहे. "जरा चांगले जेवण बनव. आज पार्टी करायची आहे आम्हांला. नंतर परत बाहेर जायचे आहे. "
"मी स्वयंपाक करणार नाही. आधी तुम्ही सरळ घरी या. मला बोलायचे आहे तुमच्याशी."
अवनीने स्वयंपाक करण्यासाठी दिलेला नकार आशीष पचवू शकला नाही. त्यामुळे काम आटोपून तो सरळ घरी आला.
"अवनी काय आहे तुझ? असं कोणी वागत का? "
"मी काय केल?"
मी माझ्या मैत्रीणीसाठी तुला स्वयंपाक करायला सांगितला ना तुला. मग तू नाही का म्हणालीस? "
"तुमच्या मैत्रिणी पेक्षाही आपलं बोलणं महत्वाचं आहे?
"परत सुरू झाले हे दोघ. लहान पोरं घरात आहे. याच सुध्दा भान राहील नाही."
"अहो, तसंही आज आशीष सोबत बोलायचेच आहे ना आपल्याला."
प्रकाशराव आणि मालतीताईं बाहेर आल्या. त्या दोघांच्या आवाजाने आदेश आणि आकृती घाबरले होते. ते आजी आजोबांना चिकटून बसले.
"आशीष आधी शांत हो आणि नीट सांग काय झाले ते."
"बाबा, अवनीने माझ्या मैत्रिणीसाठी जेवण बनवायला नकार दिला. ती माझ सध्या काहीच ऐकत नाही."
"पण तू कसा वागतो आहे आधी ते बघ." प्रकाशराव
"मी काय केल आता?"
"अहो, तुम्ही हल्ली बिथरल्या सारखे वागत आहात? "
"मला शिकवते का?" असे म्हणत त्याने तिच्यावर हात उचलला.
"आशीष."
बाबांचा आवाज ऐकताच तो भानावर आला.
"तुम्ही माझ्यावर हात उचलता, केस ओढता, काकूबाई म्हणता. हे काय आहे सगळं?"
"त्यालाही एक कारण आहे. "
"कोणते कारण?"
"हे बघ मला तू अजिबात आवडत नाहीये. तुला बाहेर सोबत नेण्याची मला लाज वाटते. आमच्या ऑफीसमध्ये कपल पार्टी असते. तू तेव्हा सुध्दा माझ्या सोबत येत नव्हती. आता तर तुला न्यायला सुध्दा कंटाळा येतो मला. त्यात तुझी तब्येत बघ, सगळ कस सुटलेलं शरीर, वरतून ती गुंडाळलेली साडी बघ, तो अवतार बघ. जरा या आरश्यात बघ स्वतःला. तुझ्या त्या साडीला कधी दुधाचा, कधी सू चा वास येतो. तुझ राहणीमान बदलले, तुझी वागण्याची पद्धत बदलली. तुझं ते थुलथुलीत झालेले शरीर बघीतले तरी मला राग येतो. ती नताशा बघ जरा. किती सुंदर दिसते."
"अहो, हे काय नवीन. माझी तुलना तुम्ही त्या माॅर्डन नताशा सोबत करता. ती कशी आहे हे तुमच्यापेक्षा जास्त मला माहीत आहे आणि आता मी एक आई आहे. हे विसरू नका तुम्ही.तुम्ही माझा अपमान करत आहात?"
"मग जगात काय तू एकटीच आई आहे का?"
"तुम्ही जरा जास्त बोलत आहात आणि नको नको ते बोलत आहात?"
"अवनी मला उलटून बोलायला कुठे शिकली गं?"
"आशीष थांबव हे सगळ."
"तुझ म्हणण बरोबर आहे. की अवनी तुला आधी प्रमाणे वेळ देऊ शकत नाही. तिचं राहणीमान बदलले आहे. पण म्हणून तू तिच्या सोबत कसंही वागला तर ते आम्हाला चालणार नाही."
"पण आई बाबा..."
पाहुया पुढे...
©® अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा