विनिताने गॅसवर चहा ठेवला. तितक्यात विराज सुद्धा उठला. दोघांनी गरमा गरम चहा घेतला. आणि नाष्टा मात्र बाहेरून ऑर्डर केला. थोड्यावेळात नाष्टा आला. दोघे खायला बसणार तितक्यात परत दाराची घंटी वाजली. "परत कोण आलं असेल?" ह्या विचारात विराजने दार उघडलं. समोर पोस्टमन होता. त्याच्या हातात विराज आणि विनिताच्या नावाचं एक टपाल होतं. विराजने ते बघितलं. पाकिटावरून लक्षात आलं की टपाल कोर्टाकडून आलं आहे. "घेऊ कि नको टपाल?" ह्या विचारात असताना पोस्टमनने त्याच्या हातात ते टपाल दिलं आणि सही घेऊन निघून गेला.
"विनिता कोर्टा कडून नोटीस आली आहे. तू डिवोर्सेची नोटीस पाठवलीस मला?” ... विराज विचारत होता.
“ नाही रे अजून मी विचार करते आहे. उघडून बघ काय नोटीस आहे ते.? थांब मीच बघते आन इकडे. तूच तर नाहीस ना पाठवली डिवोर्से ची नोटीस? .” असं म्हणत विनिताने विराजच्या हातातून टपाल घेतलं. एका बाजूने उघडून आतील कागद तिने बाहेर काढला आणि वाचायला लागली.
“ मिस्टर विराज देसाई अँड मिसेस विनिता देसाई.”विनिता वाचतच होती आणि एकदम जोरात ओरडली.
“ अरे विराज हे बघ हे काय आहे.!”... विनिता
“काय गं काय झालंय इतकं ओरडायला? बघू आण तो कागद.”... विराज विनीताच्या हातातून कागद घेत बोलत होता.
त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. दोघे सुद्धा एकमेकांना पकडुन उभे होते. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
"Emancipation of a minor! अरे काय आहे हे विराज? माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासाचं बसतं नाहीये.”.. .. विनिता.
“ विनू अगं माझा पण विश्वास बसतं नाहीये गं. “... विराज
“ म्हणजे म्हणून ती मुद्दामहून आई बाबांकडे निघून गेली कालच. पण ती अशी नेहमीच जाते त्यांच्याकडे त्यामुळे मला असं काही वेगळं वाटलं नाही रे. की तिच्या मनात असं काही सुरू असेल.”... विनिता
“ हो ना मला पण नाही जाणवलं काही. सगळं अगदी प्लान करून केलं तिने.”.... विराज
“ का असं वागली रे ही? नक्कीच आई बाबांची फुस असणार हिला म्हणून एवढी हिम्मत झाली तिची. थांब तिला जाबच विचारते.”... विनिता
विनिता आणि विराजला प्रचंड मानसिक धक्का लागला होता. कारण त्यांच्या मुलीने म्हणजे मैत्रीने त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवली होती की, “तिला आता त्यांच्या सोबत रहायचं नाहीये. तिला तिच्या पालकांन कडून डिवोर्स हवा आहे.” म्हणजे कायद्याच्या भाषेत Emancipation of a minor.
पुढील भागात बघू विनिता ची प्रतिक्रिया काय असेल.
क्रमशः
© वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा