Login

तो आणि ती

एकमेकांना पसंत नसताना घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न करतात आणि दोघे सुखी संसार करतात. अश्या "तो आणि ती" ची गोष्ट...
तो गावाकडचा ती शहरातली

तो शरीराने किरकोळ ती सुदृढ

तो शिक्षणाने B.A. ती M.A.

तो रंगाने सावळा ती गोरीपान

तो स्वभावाने शांत ती तापट

तो मितभाषी ती बडबडी

तो ६ बहिणींमध्ये एकटा ती आणि तिची बहीण दोघीच

तो नास्तिक ती आस्तिक

दोघेही नोकरी करणारे. दोघांच्या घरी स्थळ शोधणे चालू होते. त्याला गावाकडून पुण्यात येऊन सेटल व्हायचे होते तर तिला फार श्रीमंत नाही पण समजूतदार जोडीदार हवा होता.

तिची मावस बहीण आणि त्याचा भाचे जावई एकत्रच काम करत होते. तेव्हा बोलता बोलता "त्याचा आणि तिचा" लग्नाचा विषय निघाला. त्यांनी आपापल्या घरी विषय काढले आणि बघून तर घेऊ पुढचे पुढे पाहता येईल असे म्हणून बघण्याचा कार्यक्रम ठरवला.

कांदे पोहे कार्यक्रमा नंतर दोघेही शांतच. दोघांना पसंत नव्हतेच कारण तो काळा सावळा आणि ती सुदृढ... कुठेच सुसंगती नव्हती. दोघांना एकमेकांच्या घरच्यांनी समजावले.

तो पूर्णपणे निर्व्यसनी आणि ती पुण्यात राहणारी शिकलेली... म्हणून बैठकीचा कार्यक्रम ठरला तो तिच्या मावशीच्या घरी.

दोघांच्या घरचे नातेवाईक मध्यस्थी साठी आले होते. सर्वांचे जेवण आटोपल्यावर बैठक बसली. त्यांना मुलीच्या घरच्यांकडून कसलीच अपेक्षा नव्हती फक्त लग्न करून द्यायचे होते.

बैठक जेवण झाल्यावर दोघांना बोलण्यासाठी बाहेर पाठवले दोघे बाहेर गेले पण काही न बोलताच परत घरात आले. दोघांना काय बोलायचे तेच कळत नव्हते कारण दोघांच्या मध्ये एक
मावशी पाठवल्या होत्या त्या मावशी दोघांना सोडतच नव्हत्या. त्यांच्या समोर काय आणि कसे बोलणार होते ते दोघं. त्याच दिवसानंतर लगेच ५ दिवसांनी त्या दोघांचे लग्न होणार होते.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all