Login

तो आणि ती - २

"तो आणि ती" एकत्र येण्यास विरोध करणारे एकटे तिचे वडील. समाजातील एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती...
पुढे चालू...

लग्नाआधी मुलाचे घर घरातली माणसं बघण्यासाठी "तिच्या" घरचे मामा मामी, आत्या मामा, मावशी, मावस बहीण, सख्खी बहिण आणि आई त्यांच्या गावी गेले. जेवण करून घरच्यांच्या गाठीभेटी झाल्या त्या लोकांनी "तिच्या" घरच्यांना त्याच्या मोठ्या बहिणीच्या घरी नेले होते त्यामुळे गाठीभेटी जेवणावळी गप्पागोष्टी सगळे काही त्याच्या बहिणीच्या घरीच केले.मुलाने तिथेच जागा घेऊन ठेवली होती घरचे बांधकाम झालेले नव्हते त्यामुळे "त्याला" इतक्या लवकर लग्न नको होते
पण "त्याच्या आणि तिच्या" घरच्यांच्या आग्रहापुढे त्याचे काही चालले नाही.

या संपूर्ण प्रकरणात "तिचे" वडील व्हिलन ठरले होते. कारण ते या सगळ्याच्या विरोधातच होते. त्यांना हे काहीच पटत नव्हते. त्याचे कारण असे की तयनी त्याच्या मुलींना पुण्यासारख्या ठिकाणी वाढवले मोठे केले. ते उच्चभ्रू वर्गातील लोकांमध्ये मिसळणारे आणि समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते त्यांना हे गावाकडचे स्थळ न पटणारे होते त्यातच मुलाची अत्यंत साधी सिंपल ८-१०,००० ची नोकरी.. त्यांनी राजकुमारी सारखे ठेवलेल्या आपल्या मुली साठी खूप वेगळी स्वप्न पहिली होती. त्यातील एकही अपेक्षा पूर्ण करणारा "तो" त्यावेळी नव्हता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all