चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025
नाती उमलताना
भाग दुसरा
दुसऱ्या आठवड्यात तर घरातील वातावरणच बदलून गेलं. सकाळचा गोंधळ आणि नुसती धावपळ सुरू होती. अर्चना अजूनही थकलेली होती कारण मागच्या रात्री ऑफिसमधले काम पूर्ण करण्यासाठी ती पहाटे चारपर्यंत जागी होती. म्हणूनच सकाळी उठायलाही उशीर झाला. हाताशी वेळ नव्हता त्यामुळे तिने स्वतःच फक्त आवरले, नाश्ता केला आणि घाईगडबडीत सर्वात महत्त्वाचं काम तर राहून गेलं ते म्हणजे अमोलसाठी डबा.
अर्चनाचं मन घाबरून गेलं, “अरेरे… आज तुझा टिफिन बनवायचा राहिला.” ती अपराधीपणे अमोलकडे पाहत म्हणाली .
अमोल मात्र हसून शांतपणे म्हणाला,
“काही हरकत नाही अर्चु, आज मी बाहेरच काहीतरी खाईन. ऑफिसजवळचे कॅन्टीन इतकेही वाईट नाहीत.”
“काही हरकत नाही अर्चु, आज मी बाहेरच काहीतरी खाईन. ऑफिसजवळचे कॅन्टीन इतकेही वाईट नाहीत.”
त्याच्या या सहज बोलण्यातून समजूतदारपणा दिसत होता; पण इतक्यात सासूबाई गीता मात्र रागाने तावातावाने बोलल्या,
“हा काय प्रकार आहे? नवऱ्याला डबा नाही द्यायचा म्हणजे काय? आमच्या काळात आम्ही वीस-तीस माणसांसाठी रोज स्वयंपाक करायचो, तेही कोणतीही तक्रार न करता. आणि तू एक डबा सुद्धा नाही बनवू शकलीस? हेच का तुझ्या आईने शिकवलं?”

सासूबाईंच्या या शब्दांनी अर्चनाचं मन दुखावले गेले. रात्रभर काम करून थकलेलं शरीर आणि डोक्यावर नोकरीची जबाबदारी या सगळ्यात ती आधीच दबली गेली होती. पण सासूबाईंच्या बोलण्यामुळे तिच्यातला राग सुद्धा उफाळून वर आला तरी शांत स्वर राखण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली,
“आई, मी रोज बनवते. पण एक दिवस राहिले तर त्यात एवढं काय मोठं? अमोलला बाहेर खायला काही अडचण नाही, तो स्वतःही ते सांगतोय. मग एवढा राग का?”
“आई, मी रोज बनवते. पण एक दिवस राहिले तर त्यात एवढं काय मोठं? अमोलला बाहेर खायला काही अडचण नाही, तो स्वतःही ते सांगतोय. मग एवढा राग का?”
गीता तोंड मुरडतच म्हणाल्या “बायकोनेच नवऱ्याला नीट सांभाळलं नाही तर घर उद्ध्वस्त होईल वेळ लागत नाही.तसेही आमच्या घरात असा प्रकार कधी घडलाच नाही. आम्ही कधी नवऱ्याला उपाशी ठेवले नाही.”
त्यांच्या कठोर शब्दांनी अर्चनाचं संयम सुटायला लागलं. तिचा आवाज किंचित कापरा झाला,“आई, काळ बदललाय. आज बायको आणि नवरा दोघेही नोकरी करतात. मग सगळी जबाबदारी फक्त एका स्त्रीवर का टाकायची? घर हे सगळ्यांनी मिळून सांभाळायचं असते पण अजूनही बहुतेकांना वाटत की हे फक्त सूनचे कर्तव्य आहे. हा अन्याय नाही का?”
क्षणभर घरभर शांतता पसरली. अमोलने मध्ये पडून शांत करण्याचा प्रयत्न केला.
“आई, अर्चना बरोबर बोलतेय. एवढ्यासाठी वाद घालून काय उपयोग? आज खरंच तिच्याकडून राहिले. पण ती रोज आपल्यासाठी सगळं करतेच ना. तिच्या मेहनतीचा विचार नाही का करायचा?”
“आई, अर्चना बरोबर बोलतेय. एवढ्यासाठी वाद घालून काय उपयोग? आज खरंच तिच्याकडून राहिले. पण ती रोज आपल्यासाठी सगळं करतेच ना. तिच्या मेहनतीचा विचार नाही का करायचा?”
अमोलच्या शब्दांनी वातावरण थोडे निवळेल असे वाटले, पण उलट त्याचा काही परिणाम झाला नाही. गीता गप्प राहिल्या, पण त्यांच्या डोळ्यांत नाराजी स्पष्ट दिसत होती. अर्चनाही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली.
त्या रात्री जेवायला बसल्यावरही फारसे बोलणे झाले नाही. अर्चनाने सुद्धा गप्प राहाणं पसंत केले. सासूबाई मात्र मुद्दाम तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होत्या. अमोलचं मन दोन्हीकडे अडकून पडले एकीकडे आईची नाराजी, तर दुसरीकडे पत्नीचं दुःख.
अर्चना पलंगावर बसून सर्व गोष्टीचा विचार करत होती “माझे खरंच चुकले का?” असा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. तिला माहिती होते सासूचे मन जिंकणं सोपं नाही, पण स्वतःला नेहमी दोष देत राहणे हे ही चुकीचे आहे.
गीता सुद्धा आपल्या खोलीत विचार करत होत्या “आमच्या काळातल्या सुना आणि आताच्या मुली यांच्यात फरक आहे. पण तिची काहीच चूक नव्हती का? आजच्या पिढीला जास्त काम म्हणजे ओझं वाटते, हे मान्य करायलाच हवे.”
आई–सुन या मधील दरी अधिकच वाढत चालली होती. घरातले दिवस हळूहळू शांततेपेक्षा तणावात जाऊ लागले.
क्रमश:
©️®️जान्हवी साळवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा