संयुक्ता नेहमी प्रमाणे तिच्या ऑफिसमध्ये आली.. खरंतर तिचा मूड नव्हताच...रात्रभर झोपली सुद्धा नव्हती ती.. स्वतःच्या डेस्कवर येताच तिने मोबाईल काढला आणि आदित्यला कॉल लावू लागली... "आपण ज्या नंबरवर कॉल करत आहात तो सध्या बंद आहे.... कृपया..." तिने पुढचं काही न ऐकताच कॉल कट केला... काही क्षण विचारात गेले.. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि कामात स्वतःला बिझी करून घेण्याचा प्रयत्न करू लागली...
साधारण अर्ध्या तासाने तिच्या मोबाइलची रिंग वाजली... कॉम्प्युटर मधून लक्ष हटवून तिने मोबाईल हातात घेतला... आदित्यचा कॉल आला होता... तिने पटकन कॉल रिसिव्ह केला... "हॅलो... आदित्य कुठे आहेस तू?? मी काल रात्रीपासून कॉल ट्राय करतेय तुला... हॅलो... आदित्य... बोलणार आहेस का काही??..." संयुक्ता बोलत होती पण आदित्य काहीच बोलत नव्हता.. संयुक्त त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करू लागली... "ऐक ना आदी... मला कळतंय मी... मी काल तुला असं एकटं सोडून यायला नको हवं होतं... हॅलो... आदी... तूला माझा राग आलाय.. कळतंय मला... पण प्लीज... खरंतर माझं चुकलं रे.. मला कधी तू आवडलासच नाहीस... पण मला प्रवीण आवडायचा तु माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी पासून... खरंतर त्या मूर्खाला कळतच नव्हतं कि आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते... जेव्हा आपण रिलेशनमध्ये आलो आणि त्याला जाणीव झाली त्याचं माझ्यावर असलेल्या प्रेमाची... मला कळतंय रे तुला या सगळ्याच त्रास होतोय ते... पण.....
आदित्यने कॉल कट केला... संयुक्ता पुन्हा विचारांच्या गर्दीत हरवली.. कालचा प्रसंग तिला आठवू लागला... काल ती ऑफिसमधून निघायला तिला जरा उशीरच झाला... तो पर्यंत आदित्यचे 15 मिस कॉल्स येऊन गेले होते... मिटिंग मध्ये असल्याने तिला त्याचा एकही कॉल रेसिव्ह करता आला नाही... ती ऑफिस मधून बाहेर आली आणि पुन्हा आदित्यचा कॉल आला... संयुक्ता "बोल आदी... सॉरी यार एका मिटिंग मध्ये अडकले होते... जस्ट फ्री झाले आणि आता तुलाच कॉल करणार होते..." आदित्य "संयुक्ता यार गेला दीड तास वाट बघतोय तुझी... तुला उशिर होणार होता तर तसं कळवायचस तरी..." संयुक्ता "सो सॉरी यार... कुठेयस तू आता???" "कुठे असणार आपल्या नेहमीच्याच ठिकाणी... जिथे आपण भेटतो.. पार्कात..." आदित्य म्हणाला...संयुक्ता " आदी r u gone mad or what??? वाजलेत बघ किती??? एवढ्या रात्री पार्कात काय करतोयस???" "एका परीची वाट बघतोय... ये लवकर..." असं म्हणून आदित्य ने फोन ठेवून दिला.... त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं होतं....
रात्रीचे साधारण नऊ वाजत आले होते... संयुक्ता पार्कात आली.. तिने आदित्यला पाहिलं... एका बेंचवर तो बसला होता... तो त्यांचा नेहमीचा बेंच... त्यामागच्या दिव्याच्या खांबाचा अंधुक प्रकाश त्या बेंचवर पडलेला... शुकशुकाट होता पार्कात... रातकिड्यांची किरकिर स्पष्ट ऐकू येत होती... आदित्य एकटाच काहीतरी लिहित बसला होता.. संयुक्ता त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली याचं पण भान नव्हतं त्याला... तिने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला... एखाद्या खोल विचारांच्या तंद्रीतून जागं व्हावं तसा तो रिऍक्ट झाला... त्याला काहीसा गोंधळलेलं बघून तिला हसू आलं... एवढा काय घाबरतोस तू... भित्रा...
काही वेळा भीती मनात घर करून बसली ना कि हळक्याश्या चाहुलीने पण भीती दाटून येते मनात... काहीसं ओशाळून त्याने उत्तर दिलं... संयुक्ता "कसली भीती??" "तुला गमावण्याची" आदित्य म्हणाला... "आदित्य... मला ना..." संयुक्ताचं बोलणं मधेच तोडत तो म्हणाला "सोड ना यार... मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय... Just wait... I will show you... असं म्हणत त्याने त्याच्या बॅगेतून एक छोटंसं गिफ्ट तिच्या हातात ठेवलं... संयुक्ताचा चेहरा खुलला आणि इतक्यात तिचा मोबाईल वाजला... प्रवीणचा कॉल होता... तिने एकवार आदित्यकडे पाहिलं आणि मोबाईल ऑफ करून पर्स मध्ये ठेवला.. आदित्यच्या आनंदाला ग्रहण लागल्यासारखं झालं... त्याचा चेहरा उतरलेला... तो बेंच वर बसला.. कुठेतरी शून्यात हरवून... संयुक्ता बोलू लागली " आदी अरे आम्ही फक्त मित्र आहोत... प्रवीण फक्त माझा छान मित्र आहे बस... पण हल्ली त्याला हँडल करणं कठीण जातंय मला... कळत नाहीये त्याला कसं समजावू मी...
एक विचारू मी संयुक्ता तुला??? तू Confused आहेस का प्रवीण आणि माझ्या मध्ये???? आदित्य काहीसा खचलेल्या आवाजात म्हणाला... संयुक्ता शांतपणे उभी होती... नेमकं काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नव्हतं... कारण प्रवीण तिला आधीपासून आवडायचा पण तो कधीच मैत्री या नात्याच्या पलीकडे गेलाच नव्हता... आणि त्याची एक गर्लफ्रेंड होतीच आणि तिच्या बद्दल त्याच्या घरी पण माहित होतं... तरी आपलं मन तो संयुक्ता समोर व्यक्त करायचा... दोघे इतके close होते कि एकमेकांपासून ते काहीही लपवत नसत.. आदित्य संयुक्ताच्या आयुष्यात तीन महिन्यांपूर्वी आला होता... दोघे आधी छान मित्र झाले आणि मग एकदा आदित्यने संयुक्ताला प्रपोज केलं... ती त्याला हो म्हणाली... छान चालू होतं दोघांच... पण प्रवीण मात्र बैचेन झाला... आदित्य आणि संयुक्ता यांना एकत्र पाहिलं आणि त्याला जाणवू लागलं कि त्याचं सुद्धा संयुक्तावर प्रेम आहे...
"आपण निघूयात का आदित्य??" संयुक्ता हळूच बोलली..." नको जा तू मी थांबतो इथे थोडावेळ..." आदित्य... काय करणार आहेस इथे थांबून??? संयुक्ता काहीशी वैतागून बोलली... " भेटायचंय कुणालातरी... तू निघ.. तुला उशीर होत असेल ना... आदित्य शून्यात कुठेतरी बघत बोलला... ती रागातच निघाली... पार्कसमोरच एका रिक्षात बसली... आणि अचानक तिला आठवलं.. ती निघण्याआधी आदित्य काहीतरी म्हणाला... भेटायचंय कुणालातरी... तिने पर्स मधला मोबाईल काढून ऑन केला... आणि प्रवीण ला कॉल लावला... तिला ऐकू येत होतं... " आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहेत ती व्यक्ती सध्या व्यस्त आहे...." काही वेळाने प्रवीण आणि आदित्य दोघांचेही फोन बंद झाले... संयुक्ता रात्रभर दोघांना कॉल ट्राय करत राहिली...
पुन्हा संयुक्ताच्या मोबाईलची रिंग वाजली... ती विचारातून बाहेर आली... आपण ऑफिस मध्ये आहोत याचं भान आलं... पण आता प्रवीण चा कॉल आला होता... तिने तो रिसिव्ह केला... संयुक्ता "हॅलो... प्रवीण... काल रात्रीपासून तुला कॉल करतेय मी... आहेस कुठे तू??? आणि आधी मला सांग तू काल रात्री आदित्यला भेटला होतास का पार्कात????" प्रवीण काही वेळ काही बोललाच नाही... "प्रवीण प्लीज सांग मला आदित्य कुठेय???" संयुक्ताचा रागाचा पारा चढला होता... प्रवीण बोलू लागला "संयुक्ता आपल्यातला काटा मी कायमचा दूर केलाय... आदित्य... आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही... कुणीच नाही... आणि...." तो बोलत होता... संयुक्ताच्या हातातून मोबाईल खाली पडला.... मेंदू सुन्न झाल्यासारखं वाटू लागलं तिला... तेवढयात पुन्हा रिंग वाजली... तिने खाली पडलेल्या मोबाईल कडे पाहिलं.... स्क्रीनवर नाव दिसत होतं... Aditya Calling..... संयुक्ताचे हात पाय जणू गोठून गेले होते... तिला आता कळून चुकलं होतं की आदित्य आता तिचा पाठलाग कधीच सोडणार नाही ते.... तो आता या जगात नसला तरी ही......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा