चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
तो, ती आणि... ते?
भाग १
" नलिनी... नलिनी..."
निशांतला मध्यरात्री अचानक जाग आली आणि तो अर्ध्या झोपेतच बेडवर त्याच्या शेजारी हात फिरवून तिचं नाव घेत तपासू लागला. तिथे त्याच्या बाजूला कोणीच नसल्याचं त्याला जाणवलं.
निशांतला मध्यरात्री अचानक जाग आली आणि तो अर्ध्या झोपेतच बेडवर त्याच्या शेजारी हात फिरवून तिचं नाव घेत तपासू लागला. तिथे त्याच्या बाजूला कोणीच नसल्याचं त्याला जाणवलं.
त्याने पूर्ण डोळे उघडून पाहिले, तर त्याची बायको त्याच्या बाजूला नव्हती. तेव्हा त्याची नजर समोरच्या खिडकी जवळ गेली. त्याची बायको नलिनी खिडकी जवळ पाठमोरी उभी होती. केस मोकळे सोडून एका बाजूला घेतले होते आणि ती खिडकी बाहेर एकटक बघत उभी असल्याची त्याला दिसली. त्याने तिथूनच तिला बोलवलं; पण तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही.
तिचं आपल्याकडे लक्ष नाही हे समजल्यावर निशांत आपल्या जागेवरून उठून तिच्या जवळ जाऊ लागला. तिच्या जवळ जाऊन त्याने हळूच मागून तिला मिठीत घेतले. त्याच्या स्पर्शाने ती दचकली. मग तो निशांत असल्याचं कळताच स्मित करत तशीच त्याला टेकून उभी राहिली.
तो तिला मिठीत घेऊन हळूच तिच्या कानात बोलू लागला,
" इतक्या रात्री इथे काय करताय राणी सरकार?"
" इतक्या रात्री इथे काय करताय राणी सरकार?"
त्यावर ती त्याला हसतच म्हणाली,
" ते बघा ना... मी आपल्या लग्नात सोबत आणलेलं रातराणीचं रोप आता किती मोठं झालंय. किती छान सुगंध दरवळतोय त्याचा. त्याला किती सुंदर फुले आले आहेत, खरंच! रातराणीची फुले म्हणजे माझी आवडती अगदी पहिल्या पासून. म्हणून मी माहेरून येताना आमच्या बागेतूनच हे रोप आणलं आणि आपल्या बागेत लावलं. आता ते छान तयार पण व्हायला लागलं आहे. त्याचा हा सुगंध मला वेड लावतो. आता पण झोपेत मला तो सुगंध जाणवला आणि मी तशीच उठून इथे आली. बहुतेक आपल्या झाडाला आज पहिली बहर आली आहे. मी बाहेर जाऊन बघू का ते?"

तिचं ते बोलणं तो शांतपणे तिच्या मागे उभा राहून तिला जवळ घेऊन ऐकत होता.
तिचं बोलणं झाल्यावर तिचा प्रश्न ऐकून तो तिला बोलू लागला,
" इतक्या रात्री बाहेर जायची काहीच गरज नाही सकाळी जाऊन बघ."
त्याचं ते बोलणं ऐकून ती त्याला हसतच बोलू लागली,
" अहो रातराणीची फुले आहेत ती रात्रीचीच उमलतात सकाळची नाही."
" अहो रातराणीची फुले आहेत ती रात्रीचीच उमलतात सकाळची नाही."
तिचं बोलणं ऐकून तो तिला बोलू लागला,
" ते मला काही माहीत नाही आता झोपा चला. खूप उशीर झाला आहे, सकाळी लवकर उठायचं पण आहे आपल्याला."
" ते मला काही माहीत नाही आता झोपा चला. खूप उशीर झाला आहे, सकाळी लवकर उठायचं पण आहे आपल्याला."
इतकं बोलून त्याने तिच्या दोन्ही खांद्यांना धरून मागे आणून बेडवर झोपायला सांगितलं आणि तो पुन्हा खिडकी बंद करण्यासाठी खिडकी जवळ आला. ती बंद करण्याआधी त्याने एक नजर खाली त्या झाडाकडे पाहिले. तिथे त्याला कसलीच फुले दिसत नव्हती आणि त्याला उठल्यापासून कसलाच सुगंध येत नव्हता.
'मग नलिनीला कसला सुगंध येत असावा ? आणि कोणती फुले दिसत असावीत ? '
असा विचार करत त्याने खिडकी बंद करून घेतली आणि बेडवर तिच्या बाजूला जाऊन तिला मिठीत घेऊन झोपला.
असा विचार करत त्याने खिडकी बंद करून घेतली आणि बेडवर तिच्या बाजूला जाऊन तिला मिठीत घेऊन झोपला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा