चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
भाग २
निशांत आणि नलिनीचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यांच्या घरच्यांच्या पसंतीने त्यांनी लग्न केलं. लग्ना नंतर निशांतची बदली ह्या गावात झाली. त्याच्या घरच्यांनी इथे दोघांसाठी जागा घेऊन छान घर बांधलं. शेतीची कामं असल्यामुळे त्याच्या घरची इथे राहायला येऊ शकत नव्हते, म्हणून इथे फक्त ते दोघेच राहत होते.
दुसऱ्या दिवशी निशांत कामावरून थकून थोडा लवकरच घरी आला. दरवाज्या जवळ येताच त्याला दरवाजाला कुलूप दिसले. त्याने नलिनीला फोन करून कुठे असल्याचे विचारले. तेव्हा तिने ती जवळच भाजी आणण्यासाठी गेली असल्याचं सांगून लवकरच परत येत असल्याचं त्याला कळवले. तिला सावकाश सांभाळून यायला सांगून त्याने फोन ठेवून दिला आणि तो चालत त्यांच्या घरच्या मागच्या बाजूला असलेल्या त्यांच्या बागेत गेला.
सूर्य आता पूर्णपणे मावळतीला गेला होता. बाहेर बऱ्यापैकी अंधार पसरू लागला होता. तो बागेत मधोमध उभा राहून त्यांच्या बागेतील झाडे फुले पाहू लागला. बघता बघता त्याचे लक्ष त्या रातराणीच्या झाडावर गेलं.
तो तसाच एक टक त्याला पाहू लागला. त्याला ते पाहताना रात्रीची गोष्ट आठवली. नलिनीच्या म्हणण्यानुसार त्या झाडाला फुलं आली होती; पण आता त्याला त्यावर एकही फुल दिसत नव्हतं. बहुतेक तिने काढून घेतली असावी. असा विचार करून त्याने तो विचार तिथेच सोडून दिला.
तो तसाच त्या झाडाकडे पाहत असताना अचानक त्याला त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला आणि त्याने दचकून मागे बघितले. मागे त्याची बायको नलिनी उभी होती.
ती आल्यावर दोघे घरात गेले. घरात जाऊन तिने दोघांसाठी छान जेवण बनवले. मग जेवण बनवून झाल्यावर त्यांनी एकत्र जेवायला घेतलं. जेवता जेवता त्यांच्या छान गप्पा रंगल्या. दोघांनी एकमेकांच्या संपूर्ण दिवसाची विचारपूस केली. गप्पा करत करत त्यांनी जेवण संपवलं. मग सगळं आवरून ते आपल्या खोलीत झोपायला गेले.
निशांत आधीच जाऊन बेडवर पडला तर नलिनी सगळ्या खिडक्या, दरवाजे आणि लाईट बंद करून त्यांच्या खोलीत आली आणि खोलीची लाईट बंद करून ती बेडवर त्याच्या कुशीत जाऊन शांत झाली. बघता बघता त्यांना कधी झोप लागली त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
आज रात्री पुन्हा निशांतला अचानक जाग आली. त्याने उठून बघितलं, तर आज पुन्हा नलिनी तिच्या जागेवर नव्हती. त्याने मग खिडकीच्या दिशेला पाहिलं; पण ती तिथे देखील नव्हती.
तो तसाच जागेवरून उठला. त्याला त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडा दिसला. तो दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर त्याने नलिनीला हाका मारत सगळीकडे शोधले; पण ती घरात कुठेच नव्हती.
तो मग घाई घाईत थेट घराच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजा जवळ गेला. तो दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर सगळीकडे तिचा शोध घेऊ लागला. शोध घेताना त्याला अचानक काही तरी आठवले आणि तो तसाच धावत घराच्या मागच्या दिशेला जाऊ लागला.
तिथे पोहोचून त्याने समोर पाहिलं, तर त्याला नलिनी त्या झाडा जवळ उभी असलेली दिसली. त्याने तिथूनच तिच्या नावाने तिला जोरात हाक मारली. त्याची हाक ऐकून तिने लगेच मागे वळून बघितले.
मागे फिरल्यावर तिने तिच्या हातात इशारा करून त्याला तिथे बघायला सांगितले. त्याने तिच्या हाताची ओंजळ पहिली आणि तो थक्क झाला. तिच्या हातात ओंजळ भरून रातराणीची फुले होती.
तो लगेच तिच्या आणि त्या झाडाच्या जवळ गेला आणि थोडा वेळ तो तसाच भीतीदायक नजरेने त्या झाडाला बघू लागला.
तिथे त्याला झाडाच्या बुंध्यावर एक काळी आकृती आणि तिचे लाल भडक डोळे दिसू लागले. ते बघून क्षणभरही वाया न घालवता त्याने तिचा हात धरला आणि तसा तिला आपल्या सोबत घरात घेऊन गेला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा