चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
भाग ४
दरवाजातून बाहेर येऊन ती बागेत त्या झाडा जवळ पोहोचली. त्या झाडासमोर उभी राहून ती एकटक त्या झाडाला पाहू लागली. पाहता पाहता ती बोलू लागली,
"कोण आहे इथे? काय हवंय तुला? का माझ्या नवऱ्याला घाबरवत आहेस?"
"कोण आहे इथे? काय हवंय तुला? का माझ्या नवऱ्याला घाबरवत आहेस?"
तिच्या बोलण्याला समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. पण काही क्षणातच तिथे जोराचा वारा वाहू लागला. वातावरणात गारवा जाणवू लागला. तिच्या समोरचे ते झाड वाऱ्याने जोर जोरात हलू लागलं. हलणाऱ्या त्या फुलं नसणाऱ्या झाडातून किती तरी फुले तिच्यावर बरसू लागली.
ती काही न बोलता तशीच स्थिर उभी राहिली. तिला आता तिथे तिच्या शिवाय आणखी कोणाचं तरी अस्तित्व जाणवू लागलं. पण ते कोणाचं? हे तिला कळत नव्हतं.
ती काही न बोलता तशीच उभी राहून प्रतीक्षा करू लागली, तेव्हा अचानक वाहणारा तो वारा थांबला आणि तिच्या काना जवळून हळूच एक वाऱ्याची झुळूक गेली. त्यात तिला लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून तिच्या काळजात धडकीच भरली.
पण ती घाबरून मागे न जाता तशीच तिथेच उभी राहिली. पुन्हा तिच्या दुसऱ्या काना जवळून तशीच वाऱ्याची झुळूक गेली आणि पुन्हा तिला तसाच आवाज ऐकू आला. ह्या वेळेस तो आवाज तिला जरा स्पष्ट ऐकू आला.
त्या आवाजात काही मुलं आपापसात खेळत असल्याचं तिला समजलं. तिने मग आपले डोळे बंद केले. आता ते आवाज तिच्या दोन्ही कानांमध्ये स्पष्ट ऐकू येऊ लागले. त्या आवाजांसोबत ती हळू हळू तिच्या भूतकाळात हरवत गेली.
" नलू नवरी आणि मी नवरा होणार नेहमी सारखा. तुम्ही सगळे वऱ्हाडी व्हा हा."
छोटा रितेश तिचा हात पकडून सगळ्यांना सांगू लागला.
छोटा रितेश तिचा हात पकडून सगळ्यांना सांगू लागला.
सुट्टीत लहान मुलांचा छान खेळ रंगला होता. त्यात त्यांचा हा लग्नाचा खेळ नेहमीचा ठरलेला होता. त्यात नवरा-नवरी ठरलेलेच होते, पण काही दिवसांनी ती गाव सोडून बाबांच्या नोकरीसाठी दुसऱ्या गावी गेली आणि त्यांचा तो खेळ कायमचा थांबला.
ती गावातून गेली असली, तरी त्याच्या मनात घर करून राहिली होती, पण इतकुसा लहान मुलगा काहीच करू शकत नव्हता. तो मोठा झाला. दुसऱ्या शाळेत जाऊ लागला, पण तिचा विचार काही त्याच्या मनातून जात नव्हता.
त्याने घरच्यांसोबत देखील तिच्या विषयी बऱ्याच वेळा बोलायचा प्रयत्न केला, पण ती कुठे असू शकते ह्याचा त्याला काहीच पत्ता लागला नाही.
तरी त्याच्या मनात कायम एक आस होती की, ती कधी ना कधी त्याच्यासाठी परत येईल आणि ते दोघे लग्न करून आयुष्यभर एकत्र राहतील. खरेखुरे नवरा बायको म्हणून! शेवटी मृत्यू त्याच्या जवळ आला, पण ती मात्र कधीच आली नाही.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा