तोच चंद्रमा नभात - भाग २
अभी आणि निधी... दोघांचे काही दिवसांनी कोर्ट मॅरेज झाले, पण दोन्ही घरच्यांच्या पसंतीनेच. दोघेही चांगले शिकलेले आणि एकाच ऑफिसमध्ये काम करता करता कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचे त्यांनाच समजले नाही. दोघांना फिरायची भारी हौस; त्यामुळे चांगलेच जमायचे दोघांचे. वर्षभरात चार रूमचा फ्लॅट घेतला, गाडी देखील घेतली. त्यांची प्रगती बघून घरच्यांना पण छान वाटायचे. दोघांना थोडा वेळ हवा म्हणून घरच्यांनी स्वतःच त्यांना वेगळं रहा म्हणून सांगितले, जेणेकरून त्यांच्या रोजच्या कामात अडथळा यायला नको. सगळेच कसे अगदी समजुतीने घेत होते.
दोघांची रोज सकाळी सकाळी धावपळ व्हायची. निधी भराभर आवरून दोघांचे डबे पॅक करून सोबत घ्यायची आणि अभी बाकीची घरातली कामं बघत होता. एकंदरीत सगळं छान चाललं होतं.
लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस असे भुर्रकन उडून गेले आणि दोघेही आपापल्या कामाला जुंपले. हल्ली दोघांची एकमेकांवर चिडचिड होऊ लागली. रोज तेच तेच करून त्यांना कंटाळा यायला लागला. ऑफिसचे काम मग घरी आल्यावर घरातले कामं. दोघेही अक्षरशः वैतागून जायचे. संध्याकाळी घरी येताना भाजी घ्यायची तर कधी वडापाव खाऊन घरी आल्यावर दोघेही तसेच झोपून जायचे. घरच्यांना पण त्यांच्याबद्दल फार सहानुभूती वाटायची. इतक्या कमी वयात त्यांनी बरेच काही करून दाखवले होते. कधी कधी होणारी लुटूपुटूची भांडणं दोघांच्या घरापर्यंत पोहोचत होती. त्यांनीही कुठेतरी फिरून या, एकमेकांना जरा वेळ द्या म्हणून सांगितले होते. लग्न झाल्या झाल्या संसाराला लागलेल्या त्या दोघांना थोडा निवांतपणा हा पाहिजेच होता.
"अभी, आपली इतकी का चिडचिड होतेय माहितीये का तुला?"
निधी अभीच्या कपाळावर हात फिरवत बोलली.
"का?"
अभीने पण तिच्याकडे बघत विचारले.
अभीने पण तिच्याकडे बघत विचारले.
"आपण दोघेही एकमेकांना वेळच देत नाहीये. आपला सगळा वेळ ऑफिसच्या कामात नाहीतर घरच्या कामात निघून जातो. तुला आठवत पण नसेल तू मला शेवटचे कधी फिरायला घेऊन गेला ते!"
निधी त्याच्याकडे बघून थोडे लाडिकपणे बोलली.
निधी त्याच्याकडे बघून थोडे लाडिकपणे बोलली.
"हो रे खरचं! आपल्या दोघांना तर फिरायला किती आवडते. आधी किती फिरायचो आपण बाईकवर. वाटेल तिकडे भटकायचो किती वेळ झाला ह्याचे भानही नसायचे. किती वेळा तर अर्धी रात्र उलटून जायची फिरण्यात आणि आता फक्त वाण्याच दुकान ते भाजी मंडई... इतकचं काय ते फिरतोय."
अभीला पण हे लक्षात आले.
अभीला पण हे लक्षात आले.
"मग काय तर, चल ना जाऊया आपण कुठेतरी लांब फिरायला. बाहेर बघ किती छान वातावरण झालंय."
निधी त्याच्या आणखी जवळ येत बोलली.
निधी त्याच्या आणखी जवळ येत बोलली.
"लांब काय? चल तुला कुठं जायचं तिथे घेऊन जाईन."
अभी तर एकदम उठून तयार झाला.
अभी तर एकदम उठून तयार झाला.
"आता जाऊया मस्त लाँग ड्राईव्हला."
निधी लगेच उठून त्याला सांगू लागली.
निधी लगेच उठून त्याला सांगू लागली.
"आत्ता! आता नको ना खरचं. मी खूप दमलोय रे, ऑफिसमध्ये किती काम आहे माहितीय ना तुला."
अभी दमलेल्या स्वरात तिला बोलला तसा तिची खुललेला चेहरा लगेच पडला.
अभी दमलेल्या स्वरात तिला बोलला तसा तिची खुललेला चेहरा लगेच पडला.
"अभी... तू असेच करतोस नेहमी."
निधीने चिडून त्याच्याकडे पाठ फिरवली.
निधीने चिडून त्याच्याकडे पाठ फिरवली.
"बरं मॅडम, सांगा कुठे जायचं? पण आज नाही हां, उद्या जाऊया आपण."
अभी लगेच तिची समजूत काढत बोलला.
अभी लगेच तिची समजूत काढत बोलला.
"अभी, मला महाबळेश्वर बघायचं आहे. आपण तिकडे कधी गेलोच नाही. मस्त बाईक राईड करत जाऊया."
निधीने तर सगळा प्लॅन आखून ठेवलेला होता.
निधीने तर सगळा प्लॅन आखून ठेवलेला होता.
"ओके मॅडम, उद्या तसेही शनिवार आहे. दोन दिवस जाऊन येऊ या आपण."
असे म्हणून अभीने निधीच्या ओठांचा ताबा घेतला.
असे म्हणून अभीने निधीच्या ओठांचा ताबा घेतला.
दुसऱ्या दिवशी अभी आणि निधीने सगळी तयारी केली, पण अचानक आलेल्या पावसाने सगळे फिसकटले. निधीला पाऊस खूप आवडायचा, पण लांबचा रस्ता आहे म्हणून अभी बाईकवर जायला नको म्हणाला; त्यामुळे चार चाकी गाडीत बसून जावे लागणार होते.
क्लास तर केला होता निधीने, पण गाडी चालवताना मनातली भीती काही गेली नव्हती; त्यामुळे गाडी चालवताना तिचा स्पीड अगदी वीस ते चाळीस वरच असायचा. तरीही आज उत्साहाने ती अभी यायच्या आधी ड्राईव्हिंग सीटवर बसली होती. तिच्याकडे बघूनच अभीला हसू आवरत नव्हते.
"असा रे काय करतोस अभी! अशाने कधी शिकणार मी?"
निधी त्याच्याकडे बघून गाडीतून खाली उतरली.
"जानू, आता पाऊस पडतोय म्हणून मी प्लॅन तर नाही ना कॅन्सल केला, पण तू पावसात गाडी चालवणार असशील तर नक्कीच प्लॅन कॅन्सल करावा लागेल."
काही केल्या अभीला हसू कंट्रोल होत नव्हते.
काही केल्या अभीला हसू कंट्रोल होत नव्हते.
"चालव तूच! मी बसते मागे."
असे म्हणून निधी मागे बसायला गेली.
असे म्हणून निधी मागे बसायला गेली.
"अरे ए, मला काय ड्रायव्हर म्हणून ठेवले आहे का तू? चल ये पुढे बस."
अभी तिला मनवू लागला.
"आधी सॉरी म्हण."
निधी पण तशी हुशार होती.
निधी पण तशी हुशार होती.
"बरं बाबा सॉरी, आता तरी ये पुढे."
अभीने अगदी कान पकडून तिला सॉरी म्हंटले आणि त्यांची गाडी सुरू झाली.
अभीने अगदी कान पकडून तिला सॉरी म्हंटले आणि त्यांची गाडी सुरू झाली.
लग्नानंतर पहिल्यांदाच दोघेही असे फिरायला जाणार होते. निधीला तर खूप छान वाटत होते. ना कसले काम ना कसले टेन्शन, नुसती मजा करायची म्हणून तिने मनात बरेच काही ठरवले.
"अभी गाणे सुरू करू का? नाही म्हणजे तुला डिस्टर्ब नसेल होत तर."
निधीला पण गाणी खूप आवडायची ऐकायला आणि गुणगुणायला, पण अभीला तर गाडीत बसल्यावर जास्त करून धांगडधिंगा असणारी गाणी आवडत.
"अरे हे काय विचारणं झालं! लाव की तुला आवडेल ते."
अभीने तिच्याकडे हसून म्हंटले तशी ती गालात गोड लाजली.
अभीने तिच्याकडे हसून म्हंटले तशी ती गालात गोड लाजली.
"अरे वाह! आताच फिरायला निघालो आणि तुझ्या अशा लाजण्याने मला पुन्हा घरी जावेसे वाटेल."
अभी एकदम बिनधास्त बोलत होता आणि तशी ती आणखी लाजत होती.
अभी एकदम बिनधास्त बोलत होता आणि तशी ती आणखी लाजत होती.
"अभी, आपण लग्नानंतर पहिल्यांदाच असे बाहेर फिरायला जातोय ना!"
निधीने हीच गोष्ट त्याला दुसऱ्यांदा सांगितली.
"हो मग, त्यात काय इतकं."
अभीला कळलेच नाही तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते.
अभीला कळलेच नाही तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते.
"अभी... जा बाबा."
निधी पुन्हा एकदा लाजली.
निधी पुन्हा एकदा लाजली.
"अरे मग त्यात काय? मला नाही समजले."
अभी अजूनही तिच्याकडे प्रश्न चिन्ह असल्यासारखे पाहू लागला.
अभी अजूनही तिच्याकडे प्रश्न चिन्ह असल्यासारखे पाहू लागला.
"अरे म्हणजे आपण हनिमूनला जातोय असेच झाले ना ते."
निधीने आता संकोच न करता सांगून टाकले.
निधीने आता संकोच न करता सांगून टाकले.
"काय?"
अभी तर जवळ जवळ जोरात ओरडलाच.
अभी तर जवळ जवळ जोरात ओरडलाच.
क्रमशः
©®तृप्ती कोष्टी
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा