तोच चंद्रमा नभात - भाग ३
"हनिमून!"
हनिमून म्हंटल्यावर अभीच्या अंगात एकदम उत्साह संचारला.
"अभी, आता तू आणखी काहीच बोलू नको. मला लाज वाटतेय."
असे म्हणून निधीने लाजून चेहऱ्यावर हात ठेवला.
असे म्हणून निधीने लाजून चेहऱ्यावर हात ठेवला.
"निधी, आपण लग्नानंतर कुठे गेलोच नाही ना फिरायला?"
अभी तिला विचारू लागला.
अभी तिला विचारू लागला.
"हो ना! वेळच कुठे होता आपल्याला."
निधी पण त्याच्याकडे बघत बोलली.
निधी पण त्याच्याकडे बघत बोलली.
"सॉरी यार! हे तर मला समजलेच नाही. बाकीची जोडपी कशी लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हनिमूनला निघून जातात आणि मी तर विचारले देखील नाही तुला."
अभीला स्वतःलाच खूप वाईट वाटत होते ह्या गोष्टीचे.
अभीला स्वतःलाच खूप वाईट वाटत होते ह्या गोष्टीचे.
"अभी, आता जातोय ना आपण फिरायला."
असे म्हणून निधीने त्याच्या हातावर हात ठेवला.
असे म्हणून निधीने त्याच्या हातावर हात ठेवला.
"आता बघ तू, सगळी कसर भरून काढणार मी."
असे म्हणून अभी तिच्याकडे बघून मिश्कीलपणे हसत होता आणि निधीचे लाजून पाणी पाणी होत होते.
असे म्हणून अभी तिच्याकडे बघून मिश्कीलपणे हसत होता आणि निधीचे लाजून पाणी पाणी होत होते.
महाबळेश्वरचा घाट लागताच दोघेही खिडकीतून बाहेरचा नजरा बघून खुश झाले. हॉटेलचे बुकिंग अभीने आधीच करून ठेवले होते; त्यामुळे काहीच टेन्शन नव्हते. पोहोचल्या बरोबर दोघेही छान फ्रेश झाले आणि फिरायला निघाले.
हलका हलका पाऊस सुरूच होता; त्यामुळे वातावरण खूप छान थंडगार झाले होते. दोघांनाही फिरायला मजा येत होती. मस्त टपरीवरचा वाफाळता चहा, मक्याचे भाजलेले कणीस, स्ट्रॉबेरी शेक... असे एक ना अनेक ते बाहेरच्या पदार्थाचा आस्वाद घेत होते. रात्री हॉटेल जवळ येताच भरलेली बाजारपेठ दिसली आणि तिथेच निधीने स्वतःसाठी आणि घराच्यांसाठी भरपूर शॉपिंग देखील केली.
"अभी हे बघ, किती छान शॉल आहे ना! घेऊ का मी?"
निधी एकदम उत्साहाने त्याला विचारत होती आणि त्याचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते.
"अभी! लक्ष कुठे आहे तुझं?"
निधीने त्याच्या दंडावर एक जोरात फटका मारला तसा अभी भानावर आला.
"कुठे काय? इथला निसर्ग बघत होतो."
अभी मुद्दाम तिला जळवत बोलला.
अभी मुद्दाम तिला जळवत बोलला.
"माहितीय मला तू कोणता निसर्ग बघत होता ते! चूपचाप ह्या पिशव्या पकड आणि चल माझ्यासोबत. माझी अजून बरीच खरेदी बाकी आहे."
निधीला माहिती होते तो मुद्दाम छोटे कपडे घातलेल्या मुलींकडे बघत होता जेणेकरून निधीने पण तसे कपडे घ्यावे, पण तिला तसे काहीच आवडत नव्हते. तिने हसत हसतच त्याला मारले आणि पुढे चल म्हणून सांगितले.
निधीला माहिती होते तो मुद्दाम छोटे कपडे घातलेल्या मुलींकडे बघत होता जेणेकरून निधीने पण तसे कपडे घ्यावे, पण तिला तसे काहीच आवडत नव्हते. तिने हसत हसतच त्याला मारले आणि पुढे चल म्हणून सांगितले.
बराच वेळ शॉपिंग करून झाल्यावर दोघांना कडकडून भूक लागली आणि ते तिकडे बाहेरच जेवले. दोघांना थंडी वाजत होती; त्यामुळे ते एकमेकांना घट्ट बिलगून होते.
"अभी थंडी वाढली आहे. चल आता हॉटेलवर जायला पाहिजे."
निधी तिचे हात चोळत बोलली.
रात्री रूममध्ये येताच निधी एकदम शॉक झाली. बेडवर गुलाबाच्या असंख्य पाकळ्यांनी सजवण्यात आले होते. रंगीबेरंगी फुगे आणि सुवासिक मेणबत्यांनी वातावरण एकदम धुंद झाले होते. अभीने तिच्या आवडीच्या गाण्यांची कॅसेट देखील लावून ठेवली होती.
रूममध्ये जाताच अभीने तिला जवळ ओढले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. एकीकडे तिच्या जड होत जाणाऱ्या श्वासांचा आवाज तर दुसरीकडे रेडिओ वरती हळूवार संगीत सुरू होते.
संपूर्ण रात्र त्यांनी एकमेकांवर प्रेम करण्यात घालवली. दोघेही खूप खुश होते. बऱ्याच दिवसांनी असा निवांतपणा त्यांना मिळाला होता. निधीला तर हे दोन दिवस कधी संपूच नये असे वाटत होते.
दुसऱ्या दिवशीची सकाळ जरा उशीरानेच झाली त्यांची. हॉटेलमध्ये सकाळी छान फ्रेश होऊन भरपेट चहा नाश्ता झाल्यावर चेक आऊट केले आणि पुन्हा बाहेर भटकायला ते दोघे तयार झाले.
महाबळेश्वरमध्ये आज पाऊस नव्हता तर दोघांना छान फिरायला मिळाले. बरीच ठिकाणं त्यांनी बघितली आणि पुढे तसेच घरी जायला निघणार होते. जाता जाता रस्त्याने लागणारी बरीच दुकानं त्यांना आकर्षित करत होती. तिथली स्ट्रॉबेरी, फळांचा ज्यूस, जॅम आणि असे बरेच पदार्थ त्यांनी खरेदी केले.
"निधी झालं का तुझं सगळं घेऊन? आता मी नॉनस्टॉप जाणार आहे. पुन्हा म्हणू नको मला हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं! मी पुन्हा गाडी थांबवणार नाही."
घरी जायला उशीर होईल म्हणून अभीने असे म्हंटले होते.
घरी जायला उशीर होईल म्हणून अभीने असे म्हंटले होते.
"हो, झालं माझं सगळ घेऊन."
असे म्हणून निधीने हातातले सामान मागच्या सीटवर ठेवले आणि गाडीत बसली.
"किती छान वाटले ना अभी, आता मला तर एकदम रिलॅक्स वाटतेय. एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखे."
निधी खरचं खूप खुश दिसत होती ह्या दोन दिवसांच्या सुट्टीत पण. अभीलाही छान वाटले तिच्याकडे असे पाहून.
"आता आपण नेहमी जवळपास असे कुठेतरी दोन दिवस का असेना फिरायला जात जाऊ."
अभीने पण तिच्याकडे बघून म्हंटले.
अभीने पण तिच्याकडे बघून म्हंटले.
"हो ना, घरी गेल्यावर एकदा का कामात बुडालो की दुसरे काहीच सुचत नाही."
निधी फोन मध्ये बघत बोलली.
निधी फोन मध्ये बघत बोलली.
झालं... निधी जे बोलली होती ते खरंच होतं. घरी गेल्यावर दोघेही पुन्हा आपापल्या कामात गढून गेले. सुट्ट्या मिळायच्या पण तेव्हा ते त्यांच्या दोघांच्या कुटुंबीयांना जाऊन भेटत असे. घरातले पण असेच काही ना काही सुरूच होते. वर्षभराने त्यांच्या घरी गोड बातमी आली आणि एका गोंडस परीने जन्म घेतला. दोघेही खूप खुश होऊन सगळा वेळ तीच्यातच घालवू लागले.
परीला वाढवताना कुठलीही हलगर्जी व्हायला नको म्हणून निधीने तिची नोकरी सोडून पूर्ण वेळ बाळाच्या संगोपनात घालवला. तिला वाढवताना त्यांनी कसलीच कमी ठेवली नाही. स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेवून पहिले तिच्यासाठी काय गरजेचं आहे ते बघितले.
इवले इवले पाऊल घरभर दुडूदूडू धावू लागले. तिची प्रत्येक हालचाल, तिचे बोबडे बोल ह्या सगळ्याचा ते दोघे आनंद घेत होते. परी नंतर आता दुसरे मुलं नको म्हणून निधीने तसे अभीला आधीच सांगितले होते. एकालाच आपण चांगले मोठे करू, त्याला चांगले शिक्षण देऊ, ह्याच एका बाळासाठी जे काही सर्वोत्तम असेल ते देण्याचा प्रयत्न करू... असे म्हणून त्यांनी दोघांनी पुन्हा कधी दुसऱ्या अपत्याचा विचार देखील केला नाही.
आज त्यांची छोटीशी परी एक मोठी डॉक्टर झाली होती. निधी आणि अभीने तिला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप काही केले. आईवडील म्हणून त्यांनी कसलीच कसर सोडली नाही.
बरीच वर्ष उलटली, परीला मोठं करताना दोघांची चांगली कसरत झाली. आई वडील स्वतःच्या ईच्छा अपेक्षा बाजूला ठेवतात. एका मुलीला मोठं करण्यात जी धन्यता मिळते ती कशातच नाही.
आपल्या बाळासाठी प्रत्येक आई वडील दिवसरात्र झटत असतात. त्याच्यासाठी काय योग्य आहे तेच त्याला वेळेवर दिलं गेलं पाहिजे. मग भलेही रात्रीचा दिवस करावा लागला तरी देखील काहीच फरक पडत नाही, पण आपल्या बाळाला वाढवण्यासाठी त्याचा पोषण आहार, शिक्षण आणि इतरही काही गोष्टी असतात त्या सगळ्या त्याला वेळेवर दिल्या जाव्या इतकीच ईच्छा. त्याला न दुखावता त्याचा लाड करणे, अगदी हवे ते करणे आणि भरभरून प्रेम देणे यातच आई वडिलांचा सगळा कस लागून जातो.
क्रमशः
©®तृप्ती कोष्टी
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा