तोच चंद्रमा नभात - भाग ५
"अभी... मी तुझी काळजी समजू शकते, पण आपल्याला परीच्या लग्नाचा विचार कधी ना कधी करावा तर लगणारच आहे ना!"
निधी त्याचा हात हातात घेऊन बोलत होती.
"तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. आपल्याला तिच्या लग्नाचा विचार तर करावाच लागेल."
अभीला पण आता निधीचे म्हणणे योग्य वाटतं होते.
रात्री उशिराने परी घरी आलेली तरीही अभी आणि निधी तिच्यासाठी जेवायचे थांबले होते. हे बघून तिला खूप वाईट वाटले. पहिले जाऊन ती फ्रेश झाली आणि मग बाहेर डायनिंग टेबल जवळ जेवायला आली.
"अरे काय तुम्ही दोघं, इतका वेळ झाला तरी कशाला माझ्यासाठी जेवायचे थांबले?"
परी त्या दोघांकडे बघून बोलली.
"अग त्यात काय एवढं, किमान रात्रीचे जेवण तिघांनी सोबत करायचे असे ठरले आहे ना आपले आणि आम्हाला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं म्हणून थांबलो."
निधीने सरळ मुद्द्याला हात घातला.
"ते जाऊ दे, आजचा दिवस कसा होता तुझा? खूप वेळ झाला तुला घरी यायला."
अभी तिला थोडं नॉर्मल करत बोलत होता.
"हो ना पप्पा, आज खूप काम होतं हॉस्पिटलमध्ये. दमायला झालं मला खूप."
परी तिची दमलेली अवस्था सांगत होती.
"ओ माझा बच्चा, दमला का खूप?"
निधी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.
"पण तुम्ही इतका वेळ नका थांबत जाऊ माझ्यासाठी. तुम्हाला माहितीये ना मला किती वेळ होईल ते सांगता येत नाही."
परी दोघांना ओरडत होती.
"परी, अग आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं."
निधीने पुन्हा विषय काढला.
"हा बोल ना आई, काय झालं?"
परी जेवता जेवता बोलत होती.
"तुझ शिक्षण पूर्ण झालं आणि आता तू स्वतःच्या पायावर देखील उभी आहेस. तर मग."
अभी तिच्याशी बोलत होता.
"हो मग त्याच काय?"
परीला काही समजत नव्हते त्यांना नेमकं काय बोलायचं होतं.
परीला काही समजत नव्हते त्यांना नेमकं काय बोलायचं होतं.
"अरे आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करत होतो."
निधीने आता सरळ बोलून टाकले.
निधीने आता सरळ बोलून टाकले.
"काय?"
परी त्यांचं बोलण ऐकून शॉकच झाली.
"अरे मग काय? हेच योग्य वय आहे."
निधी तिला पटवून देऊ लागली.
निधी तिला पटवून देऊ लागली.
"तिचं नको ऐकू बेटा, तू तुझं चालू ठेव. तुला हवा तितका वेळ घे."
अभी तिला प्रोत्साहन देत बोलला.
"अरे काय सांगतोय अभी तू? मला बोलू तर दे तिच्याशी."
निधी आता अभीवर चिडली होती.
"परी, तुला कोणी आवडतं का? तुझ्या मनात आहे का कोणी? तसे काही असेल तर अगदी मनमोकळेपणाने सांग आम्हाला."
अभी तिच्याशी अगदी प्रेमाने बोलत होता.
"नाही पप्पा, अजूनतरी माझ्या मनात असे काहीच नाहीये."
परीने असे बोलताच निधी खूप खुश झाली.
"परी बाळा, आपल्या घरी पुढच्या आठवड्यात काही पाहुणे येणार आहेत. तुला बघायलाच येताय ते असे समज."
निधीने जे काही ठरवले होते ते तिला सांगू लागली.
"हो, पण तुला समजा तो मुलगा नाही आवडला तर तसे तू स्पष्ट सांग आम्हाला, काही प्रोब्लेम नाही."
अभी तिच्या बाजूने बोलत होता.
छान गप्पा मारत तिघांची जेवणं झाली. अभी आणि निधी दोघांनी मिळून परीला तयार केले. आठवडा भराने परीला बघायला पाहुणे येणार होते. मुलगा डॉक्टरच असल्याने दोघांचे चांगले जमणार हे निधीला चांगलेच ठाउक होते... आणि तसेही आता नवीन ट्रेंडच निघालाय ना, मुलगा इंजिनियर असेल तर त्याला इंजिनियरच बायको पाहिजे, डॉक्टर असेल त्याला सुद्धा डॉक्टरच बायको हवी असते. यानुसार निधीने पण तोच विचार केला असावा, कारण दोघांचे प्रोफेशन सारखे असले म्हणजे अडचणी पण समजून घेतील एकमेकांच्या जेणेकरून त्यांच्यात वाद होणार नाही.
परीला तर हे लग्नाचे ऐकल्यापासून काळजात धडकीच भरली होती. तिने कधीच तिच्या लग्नाचा विचार केला नव्हता, की कुठला मुलगा तिला आवडला नव्हता. म्हणजे तिने कधी त्या नजरेने पाहिलेच नव्हते कोणाला. तिने फक्त तिच्या शिक्षणावर आणि करीयर वरती फोकस केले.
परी एक शांत आणि समंजस मुलगी होती; त्यामुळे तिच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते तिचे आई वडील ठरवतील आणि ते तिच्यासाठी योग्यच असेल हे तिला चांगले माहिती होते. तिची प्रत्येक गोष्ट तिच्या आई वडिलांना माहिती असायची. एकुलती एक आहे त्यामूळे निधी आणि अभीने सुद्धा तिला पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांना त्यांच्या संस्कारावर पूर्ण विश्वास होता.
लग्नाचा विषय निघताच घरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. निधी तर तिच्या पुढच्या तयारीला आतापासूनच लागलेली दिसत होती. अभी पण मनातल्या मनात काही ना काही ठरवत असायचा आणि परी... तिला तर त्या दोघांकडे पाहून टेंशन यायचे.
'माझे लग्न झाल्यावर हे दोघे एकटे पडतील. त्यांची काळजी कोण घेणार? मला हॉस्पिटल मधून घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी दोघेही किती काळजी करतात, मग माझे लग्न झाल्यावर कसे होणार?'
मनातल्या मनात परीला ही काळजी वाटणे साहजिक होते. प्रत्येक मुलगी हाच विचार करत असते.
वरवर तिने जरी मुलगा पाहण्याच्या कार्यक्रमाला होकार दिला असला तरी मनातून ती सुद्धा थोडी घाबरलीच होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं घडणार होतं. हॉस्पिटलमध्येही तिचे सहकारी मित्र मैत्रिणी तिला चिडवत असतं, पण ती मात्र लाजून बाजूला व्हायची.
क्रमशः
©®तृप्ती कोष्टी
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा