तोच चंद्रमा नभात - भाग ९
परी जशी लग्न होऊन गेली तसे निधीला घरात खूप एकटे एकटे वाटू लागले. तिला सारखी परीची आठवण यायची आणि ती अचानक तिच्या नावाने आवाज द्यायची, तेव्हा अभी जाऊन तिला सावरायचा. कधी कधी तर निधी एकटीच रडत बसायची परीच्या आठवणीत.
"निधी, काय करतेय?"
अभी तिला आवाज देतो.
"काही नाही रे, परीच्या आवडीची भाजी केली बघ."
असे म्हणून तिने ताट वाढायला घेतले.
"अरे वाह! मस्त भरल्या वांग्याची भाजी."
अभी पण खुश होऊन जेवू लागला.
निधीने ताटाचा फोटो काढून परीला पाठवला आणि फोन सुद्धा केला. परी थोडा वेळ बोलली पण तिने घाईघाईने फोन ठेवून दिला लगेच आणि इकडे निधी हॅलो हॅलो करत राहिली.
"काय झालं?"
अभीने तिच्याकडे बघत विचारले.
अभीने तिच्याकडे बघत विचारले.
"परीने लगेच कट केला फोन."
निधी उदास होत बोलली.
निधी उदास होत बोलली.
"अरे कामात असेल ती म्हणून जास्त बोलली नसले."
अभी सहज बोलून गेला.
अभी सहज बोलून गेला.
"हो, तिकडे ती कामात आणि इकडे तुम्ही सुध्दा कामात असतात. मीच एकटी रिकामी बसलेली असते. कुणालाच वेळ नाही माझ्यासाठी."
निधी खरंतर आता चिडली होती.
निधी खरंतर आता चिडली होती.
"अरे आता माझं काय ह्यात. असेल तिला काम काही नसेल बोलता आले जास्तवेळ. मग इतकं काय चिडायच त्यात? हल्ली तू ना खूप चीडचीड करायला लागली आहेस."
अभी पण तिला बोलू लागला.
अभी पण तिला बोलू लागला.
"जा मला बोलायचंच नाही तुझ्याशी तर."
असे म्हणून निधी निघून गेली झोपायला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. निधीने छान सगळे आवरले आणि अभी सोबत गप्पा मारायला जाऊन बसली. नेहमीप्रमाणे अभीच्या हातात पेपर किंवा फोन तरी असतोच. इकडे निधी तिची तिची बडबड सुरूच ठेवते.
थोडा वेळाने तिला समजते की अभी तिच्याकडे लक्ष देत नाहीये, मग ती पुन्हा परीला मेसेज करते. एका मागोमाग मेसेज करतच असते, पण परी ऑनलाईन नसल्याने तिला काही उत्तर देत नाही; त्यामुळे निधी पुन्हा उदास होते.
"काय करतेय निधी? तू पण फोन घेऊन बसलीस माझ्यासारखी."
अभी तिच्याकडे बघून हसत बोलला.
"अरे परीलाच मेसेज करत होते, पण ती काही बघेना माझा मेसेज."
निधी फोन खाली ठेवत बोलली.
"कशाला तिला मेसेज करून त्रास देतेस? नवीन नवीन लग्न झालं आहे तिचं."
अभी तिच्याकडे बघत बोलला.
अभी तिच्याकडे बघत बोलला.
"अभी, परीला फोन करून बघुया का? काय करत असेल बरं ती?"
निधी खूप खुश होऊन बोलत होती.
"अरे कशाला? तिला आठवण आली की करेन ना ती फोन. तू उगाच नको तिला डिस्टर्ब करत जाऊ."
अभी तिला आता समजावून सांगत असतो.
अभी तिला आता समजावून सांगत असतो.
"अरे अशाने तर ती कधीच फोन नाही करणार."
निधी पुन्हा निराश होऊन बोलली.
"असं कसं, करणार ती फोन पण तू तिला थोडा वेळ तरी दे आठवण यायला. सारखं आपलं घेतला फोन की लाव कानाला. नेहमी फोटो पाठव मेसेज पाठव... तिला तिचं राहू दे ना. आता लग्न होऊन कितीसे दिवस झाले असे? तिला सेट तर होऊ दे तिकडे."
अभी आता चांगलाच चिडलाच होता.
"आता झाला ना लग्नाला महिना, मग अजून किती सेट होणार ती? आणि मी काय त्रास देते का तिला फोन मेसेज करून?"
निधी पण पेटली होती.
"हो, एक प्रकारे त्रासच देतेय तू. नवीन लग्न झालं म्हंटल्यावर दोघे कुठेतरी फिरायला गेले असतील. वेळ घालवत असतील एकमेकांसोबत, एकमेकांना समजून घेत असतील. तुला समजायला पाहिजे ह्या गोष्टी निधी, मी हे सगळं बोलून दाखवायला नको. अरे इतकं सगळं माहिती असूनही तू तेच तेच करत असतेस. मला इथे बसून किती त्रास होतोय तुझ्या अशा वागण्याचा तर तिला किती होत असणार? जरा विचार कर ना तू स्वतःच."
अभीने भले मोठे लेक्चर दिले निधीला. ती रडत रडत चिडून पुन्हा निघून गेली.
आतमध्ये गेल्यावर निधीने परीला पुन्हा मेसेज केला आणि तिला सांगितले की तुझे पप्पा हल्ली माझ्यावर खूप राग राग करत असतात.
इकडे अभीला पण वाईट वाटले, पण काय करणार पर्याय नव्हता त्याच्याकडे. निधीचा जरा जास्तच जीव आहे परीमध्ये हे त्याला माहिती आहे आणि म्हणूनच तो तिलाही समजून घेतोय, पण आजकाल निधी थोडी जास्तच करत होती. 'आपण कुठे कमी पडतोय का? आपले चुकले का निधीला बोलून?' असे सारखे अभीला वाटत होते.
थोडा वेळाने मम्मीचे इतके मेसेज पाहून परी तिच्या पप्पांना फोन करायचा विचार करते आणि काय झालं ते विचारून घेऊ असे ठरवते, पण इतक्यात तिच्या पप्पांचाच फोन येतो तिला.
"हा बाळा, तू बिझी नाहीस ना? बोलू शकतो ना आपण."
अभीने तसे आधीच विचारून घेतले.
"हो पप्पा बोला ना, काही काम होत का?"
तिकडून परी बोलू लागली.
"काही नाही रे, बाकी घरात कसे आहेत सगळे? आणि आमचे जावईबापू काय म्हणता?"
अभीने आपुलकीने चौकशी केली सगळ्यांची.
अभीने आपुलकीने चौकशी केली सगळ्यांची.
"हो पप्पा, सगळे खूप छान आहेत. आत्या आणि मामा माझी खूप काळजी घेतात आणि अर्जुन... ते तर अगदी तुमच्या सारखेच आहेत पप्पा."
परी खूप खुश होऊन बोलत होती. अभीला पण हे ऐकून आनंद झाला.
परी खूप खुश होऊन बोलत होती. अभीला पण हे ऐकून आनंद झाला.
"अरे वाह! खुश आहेस म्हणजे तू. छान छान."
अभी हसून बोलला.
"बाकी मम्मी काय करतेय? थोडा वेळापूर्वी मेसेज आलेला दिसला तिचा पण आम्ही जरा बाहेर होतो म्हणून नाही पहिला फोन."
परी थोडी नाराज झाली बोलताना.
परी थोडी नाराज झाली बोलताना.
"अरे हो, तेच बोलायचं होत तुझ्याशी."
अभी आता मुद्द्यावर बोलू लागला.
"काय झालं पप्पा? सगळ ठीक तर आहे ना? मम्मीला काही झालेय का?"
परी अगदीच काळजीने बोलली.
"काही नाही रे, आमचं थोडं वाजलं सकाळीच."
अभीने तिला सांगून टाकले.
अभीने तिला सांगून टाकले.
"आता कशावरून भांडले तुम्ही दोघं."
परी हसून बोलली, कारण तिला त्यांची होणारी नोक झोक माहिती होती.
"तुझ्यावरूनच."
अभी बोलून गेला.
अभी बोलून गेला.
"आता मी काय केलं?"
परीला वेगळंच वाटलं.
"तू काही नाही केलं रे, पण ती तुला सारखी फोन मेसेज करून वैताग देत असते म्हणून जरा चिडलो तिच्यावर. बाकी काही नाही."
अभीने जे झालं ते सगळं परीला सांगून टाकले.
"पप्पा, मम्मीला जशी माझी आठवण येते तशीच मला तुमच्या दोघांची पण खूप आठवण येते. खूप खूप आठवण येते."
परीला आता रडायला येत होते.
परीला आता रडायला येत होते.
"अरे मग असं रडायचं असतं का? आठवण आली की बोलायचं अर्जुन सोबत. हक्काचा जोडीदार निवडून दिला आहे ना तुला मग त्याच्याशी गप्पा मारत जा आणि भांडत पण जा... फिरायला ही जा. तो आहेच आता तुझा सोबती."
अभी एकदम फ्री होऊन बोलला.
"हो पप्पा, सगळे खरचं खूप छान आहेत. तुम्ही काळजी घ्या मम्मीची. मला तिला वेळ देता येत नाहीये आता सध्या. माझे इकडे कुठे हॉस्पिटलमध्ये काम होतेय का ते बघायला पाहिजे. त्यासाठी अर्जुन पण बरीच मदत करतोय. आम्ही दोघेही रोज तेच बघत असतो. घरात पण आत्या सगळं काही बघून घेतात, मला कसलेही कामं करू देत नाहीत. मामा तर खूप लाड करतात."
परी भरभरून कौतुक करत होती सासर मधल्या सगळ्यांचे.
"हो बाळा, मी काळजी घेईन. निधीच काय झालंय माहितीय का? तिचं जग म्हणजे तूच होतीस. आता तू लग्न होऊन गेल्यापासून ती एकटी एकटी असते घरात; त्यामुळे तिला कंटाळा येतो. कधी कधी तर तुझ्या आठवणीत खूप रडते सुद्धा ती, पण नंतर होते ठीक. माझेही कामं असतात त्यामुळे मला जास्त बघता येत नाही तिच्याकडे."
अभीने परीला सगळे सांगून टाकले.
"पप्पा, तुम्हाला दोघांना खरंतर विश्रांतीची गरज आहे. तुम्ही दोघे एक काम का नाही करत. मस्त कुठेतरी फिरून या. छान वेळ घालवा आणि मम्मीला त्रास देऊ नका. आजपर्यंत खूप केलंत माझ्यासाठी तुम्ही, आता तुम्ही एकमेकांना वेळ द्या. तुमचे आवडते छंद जोपासा, फिरायला जा. मम्मीला पण बरं वाटेल. मी होते तेव्हा काही वाटत नसेल पण आता मी नाहीये तिकडे तर घरात तिला खूप एकटं वाटण साहजिक आहे. मलाही काळजी वाटते तिची. तुम्ही बोलत जा तिच्याशी आणि हो भांडू नका तुम्ही दोघं. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येऊन जाईन घरी."
परी अगदी बरोबर बोलते.
"हो रे, हे तर माझ्या लक्षातच आले नाही. मी बघतो कुठे जायचं ते, बास तुझी मम्मी तयार व्हायला पाहिजे. आणि मी भांडत नाही ग तिच्याशी, तिचं भांडत असते माझ्यासोबत. मी बोलतो तिच्याशी आणि माझ्याकडून होईल तितका वेळ देतो मी तिला. तरी तू काळजी नको करू मी आहे इकडे. तू तिकडे लक्ष दे आणि सगळ्यांना नमस्कार सांग माझा."
इतके बोलून अभी ने फोन ठेवून दिला. त्यालाही खूप छान वाटले लेकीशी गप्पा मारून.
क्रमशः
©®तृप्ती कोष्टी
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा